⁠  ⁠

Current Affairs 14 March 2019

Chetan Patil
By Chetan Patil 4 Min Read
4 Min Read

पश्चिम घाटात बेडकाच्या नव्या प्रजातीचा शोध

  • जगातील जैवविविधतेचे मोठे केंद्र असलेल्या पश्चिम घाटातील पर्वतराजीत बेडकाची एक नवीन प्रजाती सापडली असून त्या बेडकाचे नाव तारांकित बटू बेडूक (स्टारी ड्वार्फ फ्रॉग) असे आहे. त्याचा पोटाचा भाग नारिंगी असून
  • पाठ करडय़ा रंगाची आहे, त्यावर तारांकित आकाशासारखे ठिपके आहेत.
  • अंगठय़ाच्या आकाराचा या लहान बेडकाला अस्ट्रोबॅट्रॉकस कुरिचियाना असे नाव नाव देण्यात आले आहे.
  • ए. कुरिचियाना ही विज्ञानासाठी बेडकाची केवळ नवी प्रजाती आहे. एवढेच नव्हे तर त्या प्रजातीला प्राचीन वारसा आहे.
  • या बेडकाशी संबंधित प्रजाती काही कोटी वर्षांपूर्वी अस्तित्वात असाव्यात असे अमेरिकेतील फ्लोरिडा म्युझियम ऑफ नॅचरल हिस्टरी या संस्थेचे डेव्हिड ब्लॅकबर्न यांनी म्हटले आहे.
  • अस्ट्रोबॅट्रॉकस कुरिचियाना बेडूक
    * पश्चिम घाटात अधिवास
    * कोटय़वधी वर्षांपूर्वीच्या प्रजातीतील दुवा
    * अंगठय़ाएवढा आकार
    * पोटाकडे नारिंगी रंग
    * पाठीवर गर्द तपकिरी रंग
    * शरीरावर तारकांसारखे निळसर ठिपके

सेवानिवृत्तीसाठी सहा महिने उरलेल्यांचा महासंचालकपदासाठी विचार करावा

  • सेवानिवृत्तीसाठी सहा महिने उरलेल्या पोलीस अधिकाऱ्यांचा विचार पोलीस महासंचालक पदासाठी करण्यात यावा, असे सर्वोच्च न्यायालयाने गेल्या वर्षी पोलीस सुधारणांबाबत दिलेल्या आदेशावर स्पष्टीकरण करताना सांगितले आहे. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी म्हटले आहे की, केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून पोलीस महासंचालकपदासाठी शिफारस केली जाते.
  • त्यासाठी एक नेमणूक समितीही असते, पण यातील निवडी या गुणवत्तेच्या आधारावर असल्या पाहिजेत.
  • उत्तर प्रदेशचे माजी पोलीस महासंचालक प्रकाश सिंह यांनी दाखल केलेल्या सुधारित याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने वरील आदेश जारी केला आहे. सिंह यांनी त्यांच्या याचिकेत असा आरोप केला होता,की ३ जुलै २०१८ रोजीच्या आदेशानुसार यूपीएससीला पोलीस महासंचालक नेमणुकीसाठी दोन वर्षे सेवा उरलेल्या पोलीस अधिकाऱ्यांचा विचार करण्यास सांगण्यात आले होते, पण त्याचा राज्य सरकारांनी गैरफायदा घेऊन सक्षम वरिष्ठ अधिकाऱ्यांना पोलीस महासंचालकपदाच्या नेमणुकांमध्ये डावलले.

राहुल बजाज यांचा ‘फिनसर्व्ह’चा राजीनामा

  • ज्येष्ठ उद्योगपती राहुल बजाज यांनी बजाज फिनसर्व्हच्या चेअरमनपदाचा राजीनामा दिल्याचे बुधवारी घोषित करण्यात आले. या पुढे ते कंपनीचे मानद चेअरमन म्हणून कार्यरत राहणार आहेत. कंपनीने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार ८० वर्षीय बजाज यांनी १५ फेब्रुवारी २०१९ला या पदाचा राजीनामा दिला.
  • बजाज फिनसर्व्हच्या संचालक मंडळाने नानू पमनानी यांची अकार्यकारी चेअरमन म्हणून नियुक्ती केली आहे. या शिवाय डी. जे. बालाजी राव, नानू पमनानी आणि गीता पिरामल यांच्यासह अन्य पाच संचालकांची पाच वर्षांसाठी कंपनीच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

“अपोलो’ ने घेतलेल्या नमुन्यांचा नासा प्रथमच अभ्यास करणार

  • अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था “नासा’ने अपोलो मिशनने पाठवलेल्या नमुन्यांचा अभ्यास करणार आहे. हा अभ्यास करण्यासाठी 9 पथके तयार केली आहेत. अपोलो मिशनने 50 वर्षापूर्वी 1970 मध्ये चंद्रावरील काही नुमने जमा केले होते. मात्र, या नमुन्याचा आजवर अभ्यास करण्यात आलेला नाही. त्यामुळे या नुमन्यावर नासाकडून प्रथमच अभ्यास केला जाणार आहे.
  • अपोलो मिशन 15, 16 आणि 17 यातील नमुन्यांचा यात समावेश आहे. अपोलो अवकाश यानाने जमा केलेल्या नमुन्यांमधील अत्यंत महत्वाचा भाग नासाच्या जॉन्सन स्पेस सेंटर येथे डिसेंबर 1972 पासून सुरक्षित ठेवण्यात आला आहे. अपोलो 15 मिशनमधील नमुने 1971 पासून हेलियम वायूत ठेवले आहेत. चंद्रापासून लांब अंतरावरीलच नमुने नासाने जमा केलेले आहेत.
  • चंद्रावरील या नमुन्यांच्या अभ्यासामुळे नवीन शास्त्रज्ञांना माहितीसाठी आणि पुढील शोधासाठी फायदा होणार आहे, असे नासाचे थॉमस झुर्बुचन यांनी सांगितले. नऊ पैकी सहा टीम उर्वरित तीन नमुन्यांचा अभ्यास करणार आहे.

Share This Article