⁠  ⁠

चालू घडामोडी – १४ जून २०१६

Tushar Bhambare
By Tushar Bhambare 5 Min Read
5 Min Read

देश-विदेश

‘आयसीएचआर’ची पहिल्या संशोधन प्रकल्पाला मान्यता
# 18 व्या शतकातील वैदिक पर्वापासून देशाने मिळविलेल्या प्राचीन वैज्ञानिक यशाचे दस्तऐवजीकरण करण्याचा प्रयत्न म्हणून भारतीय ऐतिहासिक संशोधन परिषदेने (आयसीएचआर) पहिल्या संशोधन प्रकल्पाला मान्यता दिली आहे. ऐतिहासिक संशोधनासाठी आर्थिक सहकार्य करणाऱ्या या परिषदेने बंगळुरूतील जैन विद्यापीठाचे प्राध्यापक आर. एन. अय्यंगार यांना पाच लाख रुपये उपलब्ध करून देण्याचे मान्य केले आहे. मार्च महिन्यात झालेल्या परिषदेच्या शेवटच्या बैठकीत गर्ग-ज्योतिषबाबत अभ्यास करण्यासाठी हा निधी उपलब्ध करून देण्यात आला. तसेच या बैठकीचे इतिवृत्त ‘दी इंडियन एक्स्प्रेस’कडे आहे, त्यामध्ये म्हटले आहे की, अनुदान दोन वर्षांसाठी देण्यात आले आहे. वृद्ध-गर्ग-संहिताच गर्ग-ज्योतिष म्हणून ओळखली जाते, या प्राचीन ग्रंथात 800 अध्याय आहेत आणि त्याचा आर्यभट्टांच्या गणितीय खगोलशास्त्रावर प्रभाव आहे, असा दावा अय्यंगार यांनी केला आहे.

‘संसदरत्न’ पुरस्काराने राजीव सातव यांचा सन्मान
# सोळाव्या लोकसभेत प्रथमच निवडून येणाऱ्या खासदारांमध्ये अष्टपलू कामगिरी केल्याबद्दल राजीव सातव यांना संसदरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. आयआयटी, चेन्नईच्या प्राईम पॉइंट फाउंडेशनच्या वतीने रिझव्‍‌र्ह बँकेचे माजी गव्हर्नर डॉ. सी. रंगराजन यांच्या हस्ते हा सन्मान करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष के. श्रीनिवास, आयआयटीचे प्रमुख भास्कर राममूर्ती, भाजपचे प्रतोद खासदार अर्जुन मेघावाल या वेळी उपस्थित होते.

भ्रष्टाचाराच्या आरोपांनंतर केजरीवाल सरकारमधील गोपाल राय यांचा राजीनामा
# भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर दिल्लीतील अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्त्वाखालील सरकारमधील परिवहन मंत्री गोपाल राय यांनी मंगळवारी प्रकृतीच्या कारणामुळे आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. गोपाल राय यांच्याकडील खाती आता दिल्लीचे सार्वजनिक बांधकाम मंत्री सत्येंद्र जैन यांच्याकडे देण्यात आली आहेत.

महाराष्ट्र

विनाअनुदानित शाळांना २० टक्के अनुदान देण्यास मंत्रिमंडळाची तत्त्वतः मंजुरी
# राज्यातील विनाअनुदानित शाळांपैकी पात्र शाळांना २० टक्के अनुदान देण्यास राज्य मंत्रिमंडळाने मंगळवारी तत्त्वतः मंजुरी दिली. या निर्णयामुळे राज्य सरकारवर १९४ कोटींचा भार पडणार आहे. राज्यातील विनाअनुदानित शाळांमध्ये गेली १५ वर्षे विनावेतन काम करणाऱ्या शिक्षकांना तातडीने वेतन अनुदान द्यावे, या मागणीसाठी गेल्या काही दिवसांपासून राज्यात मुंबईसह आठ ठिकाणी शिक्षकांचे आंदोलन सुरू होते. औरंगाबादमध्ये एका आंदोलनकर्त्याचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यूही झाला होता. या सर्व पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

अर्थशास्त्र

याहू मेसेंजर आता नवीन मेसेंजरमध्ये अपडेट
# याहू मेसेंजर हे सगळ्यात जुन्या मेसेंजर पैकी एक आहे. 1998 साली याहू पेजर या नावाने सुरु झालेला याहू मेसेंजरचा प्रवास भल्याभल्याना थक्क करणारा असच होता. एके काळी लोकप्रियतेच्या शिखरावर आरूढ असलेल्या मेसेंजर पैकी एक म्हणजे याहू मेसेंजर. युझर्सला स्वत:च्या चाट रूम तयार करता येणे तसेच वेगवेगळे इमोशन्स पाठविता येणे यामुळे नेटकरी लोकांमध्ये याहू मेसेंजरने एक वेगळे स्थान निर्माण केले होते. मात्र जसजसा काळ बदलला तसतसा मेसेंजर मध्ये स्पर्धा निर्माण होत गेली. फेसबुक मेसेंजर ,व्हॉट्सअ‍ॅप,आदी मेसेंजरच्या स्पर्धेत याहू मेसेंजर काहीसे मागे पडल्याचे चित्र निर्माण झाले. त्यामुळे याहू मेसेंजर चे अनेक युझर्स इतर मेसेंजरकडे शिफ्ट झाले. तसेच याचा परिणाम म्हणून याहू मेसेंजरने स्वत:मध्ये अनेक बदल घडवत नवीन याहू मेसेंजर डिसेंबर 2015 साली लॉंच केले. आता मात्र याहूने त्यांचे 18 वर्ष जुने याहू मेसेंजर बंद करण्याचा निर्णय घेतला असून त्याजागी नवीन याहू मेसेंजर अधिक फीचर्स सह आणणार आहे.

लिंक्डइन साइट ही मायक्रोसॉफ्टला जोडली जाणार
# सोशल मीडियावर प्रसिद्ध असलेली लिंक्डइन ही साइट मायक्रोसॉफ्ट खरेदी करणार आहे. जगभरातल्या व्यावसायिकांसाठी संपर्काची सर्वात मोठी साइट म्हणून लिंक्डइन परिचित आहे. मायक्रोसॉफ्ट ही साइट 26.6 बिलियन डॉलरला खरेदी करणार आहे. 26.6 बिलियन डॉलरची भारतीय रुपयामध्ये किंमत 1,78,485 कोटी रुपये एवढी होती. लिंक्डइन खरेदी करण्यासंदर्भात रिड आणि जेफशी ब-याच काळापासून बोलत होतो, असंही यावेळी नाडेला यांनी सांगितलं आहे. खरेदीसंदर्भातला करार 2016 मध्ये होणार असल्याचं कंपन्यांनी संयुक्त निवेदनात म्हटले आहे. लिंक्डइन ही साइट मायक्रोसॉफ्टच्या उत्पादकता आणि व्यावसायिक प्रक्रियेचा भाग होणार असल्याची माहिती सत्या नाडेला यांनी दिली आहे.

क्रीडा

युवा भारतीय संघाने मालिका जिंकली :
# धोनीच्या नेतृत्वाखालील युवा भारतीय संघाने दुसऱ्या सामन्यात यजमान झिम्बाब्वेचा 126 धावांत बाद केल्यानंतर 127 धावांचे आव्हान 26.5 षटकात आणि 2 गड्यांच्या मोबदल्यात पार करत 3 सामन्याची मालिका 2-0 ने जिंकली. कर्णधार धोनीने नाणेफेक जिंकून झिम्बाम्वेला प्रथम फलंदाजीस आमंत्रित केले. झिम्बाब्वेने प्रथम फलंदाजी करताना 34.3 षटकात सर्वबाद 126 धावा केल्या. के राहूल आणि करुन नायर यांनी 14.4 षटकात 58 धावांची सलामी दिली.

हॅमिल्टनकडून जेतेपद मोहम्मद अली यांना अर्पण
# फॉम्र्युला-वन शर्यतीमधील अव्वल दर्जाचा खेळाडू लुइस हॅमिल्टनने कॅनेडियन ग्रां. प्रि. शर्यतीत मिळवलेले विजेतेपद दिवंगत महान बॉक्सिंगपटू मोहम्मद अली यांना अर्पण केले आहे. हॅमिल्टनने येथील शर्यत जिंकल्यानंतर मोटारीवर उभे राहून अली यांना श्रद्धांजली वाहताना सांगितले की, ‘‘फुलपाखरासारखे स्वच्छंदी व मधमाशीसारखी अचूकता हे अली यांचे वैशिष्टय़ होते. खरे तर आजपर्यंत माझा विजय कोणालाही अर्पण केला नाही. मात्र मला त्यांच्यापासून खूप प्रेरणा लाभली. त्यामुळेच मी त्यांच्या स्मृतीस अभिवादन केले.

TAGGED:
Share This Article