⁠  ⁠

चालू घडामोडी : १३ जून २०२०

Chetan Patil
By Chetan Patil 3 Min Read
3 Min Read

Current Affairs 13 June 2020

विश्व खाद्य पुरस्कार डॉ. रतन लाल यांना

विश्व खाद्य पुरस्कार डॉ. रतन लाल यांना
  • भारतीय वंशाचे अमेरिकी मृदा वैज्ञानिक डॉ. रतन लाल (७५) यांना सन २०२०चा प्रतिष्ठित विश्व खाद्य पुरस्कार जाहीर झाला आहे.
  • छोट्या शेतकऱ्यांना त्यांच्या मातीची गुणवत्ता सुधारण्यात मदत करून जागतिक अन्नपुरवठा वाढविण्याचे मोलाचे कार्य केल्याबद्दल डॉ. लाल यांचा हा सन्मान करण्यात आला आहे.
  • कृषी क्षेत्रातील नोबेल पुरस्कार अशी ओळख असलेला विश्व खाद्य पुरस्कार आयोवा येथील विश्व खाद्य पुरस्कार फाऊंडेशनतर्फे दिला जातो. या प्रतिष्ठित पुरस्कारासाठी डॉ. रतन लाल यांच्या नावाची घोषणा गुरुवारी करण्यात आली.
  • दोन लाख ५० हजार अमेरिकी डॉलर असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. ५० हून अधिक वर्षांच्या आपल्या कारकिर्दीत डॉ. लाल यांनी मातीची गुणवत्ता कायम राखण्यासाठी नाविन्यपूर्ण तंत्रांना प्रोत्साहन दिले. त्यामुळे चार खंडांमधील ५० कोटींहून अधिक छोट्या शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारले. तसेच त्यांच्या या कार्यामुळे दोन अब्जहून अधिक लोकांच्या खाद्यान्न आणि पोषण सुरक्षेमध्येही सुधारणा झाली आहे.
  • शिवाय नैसर्गिक उष्णकटिबंधीय परिसंस्थेतील कोट्यवधी हेक्टर जमीन वाचविली, या शब्दांत फाऊंडेशनने डॉ. लाल यांचे कौतुक केले आहे.

एप्रिल: ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेत २०.४ टक्क्यांची घसरण

Sakal Saptahik Cover Story Kaustubh Kelkar Marathi Article ...
  • ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेत एप्रिलमध्ये २०.४ टक्के मोठी घसरण आली. कोरोना विषाणूमुळे देशात लागू टाळेबंदीचा हा पहिला महिना होता. ब्रिटनच्या राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालया(ओएनएस)ने शुक्रवारी फेब्रुवारीपासून एप्रिलपर्यंतच्या तीन महिन्यांची आकडेवारी जारी केली. अर्थव्यवस्थेतील ही घसरण २००८-०९ च्या मंदीपेक्षा तिप्पट जास्त आहे. फेब्रुवारी एप्रिल तिमाहीत गेल्या वर्षी समान अवधीच्या तुलनेत १० टक्के घसरण आली आहे. तज्ञांनुसार एप्रिल सर्वात वाईट महिना राहिला.

अब्जाधीश भारतीयांत दातार ८व्या क्रमांकावर

  • दुबईस्थित अल अदिल ट्रेडिंग कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, मसालाकिंग डॉ. धनंजय दातार यांनी आखाती प्रदेशातील अब्जाधीश भारतीयांच्या यादीत आठव्या क्रमांकावर झेप घेतली आहे.
  • ‘अरेबियन बिझनेस’ या नियतकालिकाने चालू र्षासाठी ‘दि इंडियन बिलीयनर्स क्लब’ या शीर्षकाखाली प्रसिद्ध केलेल्या यादीत दातारांचा आठवा क्रमांक लागला आहे. गेल्यावर्षी या यादीत डॉ. दातार सोळाव्या क्रमांकावर होते. केवळ वर्षभरात त्यांनी आखाती प्रदेशातील (जीसीसी रीजन) आघाडीच्या दहा अब्जाधीश भारतीयांमध्ये स्थान मिळवले आहे.
  • ‘फोर्ब्स मिडल ईस्ट’च्या मानांकन यादीत आखातातील आघाडीच्या १०० भारतीयांमध्ये सातत्याने झळकणारे ते बहुधा एकमेव महाराष्ट्रीय आहेत.

आयसीसीने केला काही नियमांमध्ये बदल

ICC to explore options till July to hold Men's T20 World Cup 2020 ...
  • क्रिकेटचे सामने सुरु करण्यासाठीही आयसीसीने काही नियमांमध्ये बदल केला आहे.
  • ज्यात गोलंदाजांना चेंडूला चकाकी आणण्यासाठी लाळेचा वापर न करणं, स्थानिक पंच आणि सामनाधिकाऱ्यांना प्रथम प्राधान्य, बदली खेळाडू, DRS च्या संख्येत असे अनेक नियम आखून देण्यात आले आहेत.
  • याचसोबत ऑस्ट्रेलियात आयोजित करण्यात येत असलेल्या बिग बॅश लिग स्पर्धेच्या आयोजकांनीही नियमांमध्ये बदल केला आहे.
  • यामधला सर्वात महत्वाचा बदल म्हणजे बिग बॅश लिगमध्ये आता वाईड बॉलवरही फ्री हीट दिली जाणार आहे.
  • याआधी आयसीसीच्या नियमानुसार फक्त नो-बॉलवर फलंदाजाला फ्री-हीट मिळायची.
  • याव्यतिरीक्त पहिल्या 10 षटकांत सर्वाधिक धावा करणाऱ्या संघाला बोनस गूण, परिस्थितीनुसार 10 षटकानंतर पर्यायी खेळाडूला मैदानात उतरवणं असे काही नवीन नियम बिग बॅश लिगमध्ये लागू करण्यात येणार आहेत.

Share This Article