Current Affairs 13 February 2018

0
0
shital-mahajan

1) नऊवारी नेसून स्काय डायव्हिंग! पुण्याच्या शीतल महाजन यांचा विक्रम

भारतीय स्काय डायव्हर शीतल महाजन यांनी थायलंडमध्ये मराठमोळी नऊवारी नेसून, तब्बल १३ हजार फुटावरून विमानातून उडी घेऊन सोमवारी सकाळी नवा विक्रम नोंदविला.

Advertisement

शीतल महाजन यांनी स्काय डायव्हिंग (पॅराजम्पर) या साहसी खेळात आतापर्यंत १७ राष्ट्रीय व ६ जागतिक विक्रम केले आहेत. मराठी संस्कृतीचे जतन व्हावे, तसेच मराठी बाणा कायम राहावा, याकरिता नऊवारी साडी परिधान करून त्यांनी हा विक्रम केला.

सातही खंडांवरून पॅराशूट जम्प
जगातील सातही खंडांतील विविध ठिकाणांवर त्यांनी स्काय डायव्हिंग केले आहे. उत्तर ध्रुव (आर्क्टिक) आणि दक्षिण ध्रुव (अंटार्क्टिका) आणि भारत व फिनलॅन्ड, अमेरिका, स्पेन, आॅस्ट्रेलिया, युरोप, साउथ आफ्रिका, साउथ अमेरिका येथे त्यांनी पॅराशूट जम्प केलेल्या आहेत. शीतल यांनी रिझोना येथे १० तासांचे व्हर्टिकल विन्ड टनलमध्ये ट्रेनिंग घेतले आहे.

– 7000 हून अधिक वेळा पॅराशूट जम्पिंग.
– एक पॅराशूट जम्प आॅक्सिजनच्या सहाय्याने तब्बल ३० हजार फुटांवरून केले आहे.

2) दुबईत जगातील सर्वांत उंच हॉटेल

दुबई जगभरातील लोकांसाठी नेहमीच आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली आहे. या देशाने पैसे आणि तंत्रज्ञानाच्या जोरावर जगातील सर्वात उंच इमारतीनंतर आता उंच हॉटेलचा विक्रमही आपल्या नावे आहे. या आधिचा हा विक्रम दुबईमधीलच जेडब्ल्यू मॅरिएट मार्किस हॉटेलच्या नावे होता. सोन्याचा मुलामा दिलेली ही 75 मजली इमारत आहे. हॉटेल गेवोरा हे आता दुबईतलेच नाही तर जगातील सर्वाधिक उंचीचे हॉटेल ठरले आहे. यापूर्वी जेडब्ल्यू मॅरिएट मार्किस या हॉटेलच्या नावावर हा विक्रम होता. हॉटेल गेवोरा हे जेडब्ल्यू मॅरिएट मार्किसपेक्षा केवळ एक मीटरने उंच आहे. हॉटेल गेवोरामध्ये 500 पेक्षा अधिक रुम्स आहेत तर आश्चर्याची बाब म्हणजे जेडब्ल्यू मॅरिएट मार्किसमध्ये 1600 पेक्षा जास्त रुम्स आहेत.

@MMCurrentAffairs स्पर्धा परीक्षा चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लीक करा.

3) स्टीव्हन स्मिथ अ‍ॅलन बोर्डर पदकाचा मानकरी

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्हन स्मिथने प्रतिष्ठेचे अ‍ॅलन बोर्डर पदक जिंकले आहे. तसेच त्याने दुसऱ्यांदा या पदकावर नाव कोरले आहे. माजी क्रिकेटपटू डॉन ब्रॅडमन यांच्यानंतर ऑस्ट्रेलियाचा सर्वोकृष्ट फलंदाज गणल्या जाणाऱ्या स्मिथला 246 मते पडली आहे. तर त्याने दोन वेळचा पदक विजेता सलामीवीर डेव्हिड वॉर्नर (162 मते) आणि फिरकीपटू नॅथन लियॉनला (156 मते) मागे टाकले आहे. ऑस्ट्रेलियाचा यंदाचा वर्षांतील सर्वोत्तम कसोटीपटूचा पुरस्कार मिळवलेल्या स्मिथने 2015 मध्ये बोर्डर पदक जिंकले होते.

स्पर्धा परीक्षा चालू घडामोडी जानेवारी २०१८ मासिक मोफत डाउनलोड करण्यासाठी येथे क्लीक करा.

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी Mission MPSC ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here