⁠  ⁠

चालू घडामोडी : १२ ऑक्टोंबर २०२०

Chetan Patil
By Chetan Patil 3 Min Read
3 Min Read

विजयाराजे शिंदे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्ताने १०० रुपयांच्या नाण्याचं अनावरण100 rupees coin

राजमाता विजयाराजे शिंदे यांना केंद्र सरकार अनोख्या पद्धतीनं अभिवादन करणार आहे.
विजयाराजे शिंदे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्ताने १०० रुपयांच्या नाण्याचं अनावरण करण्यात येणार आहे. १२ ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी या नाण्याचं अनावरण करणार आहेत.
प्रधानमंत्री मोदी (PM Narendra Modi) या नाण्याचं अनावरण करणार आहेत.
१०० रुपयांचं हे नाणं चार धातूंपासून तयार करण्यात आलं आहे. या नाण्याच वजन ३५ ग्रॅम आहे. या नाण्यामध्ये चांदीचा वापर ५० टक्के करण्यात आला आहे. तर इतर धातूचं प्रमाण ५० टक्के आहे.

नदालने फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेचे ऐतिहासिक १३ व्यांदा जेतेपद पटकावलेspt88

लाल मातीच्या कोर्टवरील आपली एकाधिकारशाही स्पेनच्या स्पेनच्या राफेल नदालने रविवारी पुन्हा दाखवून दिली.
सर्बियाच्या नोव्हाक जोकोव्हिचला तीन सेटमध्ये पराभूत करीत नदालने फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेचे ऐतिहासिक १३ व्यांदा जेतेपद पटकावले. तसेच ‘विजेतेपदाला नसे विसावा’ हे सिद्ध करताना रॉजर फेडररच्या पुरुष एकेरीतील विक्रमी २० ग्रॅँडस्लॅम विजेतेपदांची बरोबरीसुद्धा साधली.
दुसऱ्या मानांकित नदालने यंदाच्या फ्रेंच स्पर्धेत एकही सेट गमावला नाही.
या कामगिरीची पुनरावृत्ती नदालने अंतिम फेरीत अग्रमानांकित जोकोव्हिचसारख्या प्रतिस्पध्र्याविरुद्धही कायम राखली. नदालने ही लढत ६-०, ६-२, ७-५ अशी दोन तास आणि ४१ मिनिटांत जिंकली. पहिल्या सेटमध्ये नदालने एकही गेम जिंकण्याची संधी जोकोव्हिचला दिली नाही.
दुसऱ्या सेटमध्ये जोकोव्हिचने दोन गेम जिंकले, मात्र नदाल सरस ठरला. तिसऱ्या गेममध्ये मात्र जोकोव्हिचने पहिल्या गेमपासून नदालला चुरस दिली. तिसऱ्या सेटमध्ये ५-४ या आघाडीवर जोकोव्हिच होता. मात्र तेथून सलग तीन गेम जिंकत नदालने विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.
योगायोग म्हणजे अंतिम फेरीतील नदालचा विजय हा फ्रेंच स्पर्धेतील १००वा विक्रमी विजय ठरला.

आमच्या सर्व Updates एका Click वर Mission MPSC Telegram Channel – जॉईन करा

तिमाहीत देशाच्या कृषी निर्यातीत ४३ टक्के वाढ

जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत देशाच्या कृषी क्षेत्राच्या निर्यातीमध्ये ४३ टक्क्यांहून अधिक वाढ झाल्याची सुखद माहिती केंद्रीय कृषी मंत्रालयाने दिली.
केंद्रीय कृषी मंत्रालयातर्फे चालू आर्थिक वर्षातील जुलै ते सप्टेंबर या तिमाहीतील निर्यातीची माहिती शनिवारी जाहीर करण्यात आली.
या तीन महिन्यांत एकूण ५३,६२६.६ कोटी रुपयांची निर्यात करण्यात आली. मागील वर्षीच्या याच कालावधीशी तुलना करता त्यामध्ये ४३.४ टक्क्यांची वाढ झाली असल्याचे मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले.
मागील वर्षाच्या जुलै ते सप्टेंबर या तिमाहीमध्ये देशातून कृषी क्षेत्राची ३७,३९७.३ कोटी रुपयांची निर्यात झाली होती. त्यामध्ये यंदा ४३.४ टक्क्यांनी वाढ होऊन ही रक्कम ५३,६२६.७ कोटी रुपयांवर पोहोचली असल्याचे कृषी मंत्रालयातर्फे जाहीर करण्यात आले आहे.
सप्टेंबर २०१९ या महिन्यात देशाच्या कृषी क्षेत्राची निर्यात ५११४ कोटी रुपयांची होती. त्यामध्ये या वर्षात ८१.७ टक्क्याने वाढ झाली असून, सप्टेंबर २०२० या महिन्यात ती ९,२९६ कोटी रुपयांवर पोहोचली आहे.

Share This Article