⁠  ⁠

Current Affairs 11 March 2019

Chetan Patil
By Chetan Patil 3 Min Read
3 Min Read

चंद्राच्या प्रकाशित बाजूवर पाण्याचे रेणू

  • नासाच्या ल्युनर रेकनसान्स ऑर्बिटर (एलआरओ) या अवकाशयानाच्या मदतीने वैज्ञानिकांनी चंद्रावर प्रकाशित भागात पाण्याचे रेणू शोधले आहेत. आगामी चांद्र मोहिमांसाठी पाणी उपलब्ध करण्यासाठी या संशोधनाचा उपयोग होऊ शकेल, असा दावा करण्यात आला आहे.
  • ल्युनर रेकनसान्स ऑर्बिटर या अवकाशयानावर लावलेल्या लायमन अल्फा मॅपिंग प्रोजेक्ट या उपकरणाने चंद्रावरील पृष्ठभागावरील पाण्याच्या कणांचा थर टिपला असून तेथे दिवसाही पाण्याचे अस्तित्व आहे असा त्याचा अर्थ असल्याचे ‘जिओफिजिकल रीसर्च लेटर्स’ या नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या शोधनिबंधात म्हटले आहे.
  • चंद्रावरील पाणी हे इंधन तयार करण्यासाठी किंवा प्रारणांपासून बचाव करताना औष्णिक व्यवस्थापनासाठीही वापरले जाऊ शकले. पृथ्वीवरून चंद्रावर अनेक घटक पाठवावे लागतात, त्यांची संख्या यामुळ कमी होऊ शकते. त्यामुळे आगामी चांद्र मोहिमा किफायतशीर होतील असे हेंड्रिक्स यांचे म्हणणे आहे.

लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर

  • केंद्रीय निवडणूक आयोगाने दिल्लीतील विज्ञान भवन येथे २०१९ च्या लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले. या निवडणुकीचा निकाल २३ मे रोजी जाहीर होणार आहे.
  • महाराष्ट्रात लोकसभेची निवडणूक चार टप्प्यांमध्ये होणार आहे.
    ११, १८, २३, २९ एप्रिल आणि ६, १२,१९ मे रोजी मतदान होणार आहे. सर्व टप्प्यांची मतमोजणी एकत्र २३ मे रोजी होणार. २२ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचं मतदान एकाच टप्प्यात होणार. लोकसभेसह निवडणूक आयोगाने आंध्र प्रदेश, सिक्कीम विधानसभेच्या निवडणुकांचीही घोषणा केली. या दोन राज्यात लोकसभेसोबतच विधानसभेसाठी मतदान घेतलं जाईल.
  • सर्व मतदान केंद्रांवर VVPAT यंत्रे असतील. यामुळे मतदारांनी नोंदवलेलं मत त्यांनी दिलेल्या उमेदवारालाच गेलं आहे याची खात्री मतदारांना करता येणार आहे, असे अरोरा यांनी सांगितले.

ICC T20 Ranking : मराठमोळी स्मृती TOP 5 मध्ये

  • CC T20 Ranking : भारताची सलामीवीर स्मृती मानधना हिने इंग्लंडविरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिकेत शानदार कामगिरी करत आयसीसी महिलांच्या ट्वेन्टी-२० क्रमवारीत कारकीर्दीतील सर्वोच्च तिसऱ्या स्थानी झेप घेतली आहे.
  • गोलंदाजांमध्ये राधा यादव हिने पाचव्या स्थानी मजल मारली आहे. एकता बिश्त हिने ५६वे स्थान प्राप्त केले आहे. अनुजा पाटील हिने ३५व्या क्रमांकावरून ३१व्या स्थानी झेप घेतली आहे. इंग्लंडच्या डॅनियल वॅट हिनेही कारकीर्दीतील सर्वोत्तम १७वे स्थान प्राप्त केले आहे. वॅट हिने या मालिकेत १२३ धावा फटकावल्या. टॅमी ब्यूमाँट आणि कर्णधार हीदर नाइट यांनीही अनुक्रमे २६वे आणि ३३वे स्थान मिळवले आहे.

खनिज तेलाचे दर वाढण्याची शक्यता

  • ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पेट्रोल व डिझेलचे दर वाढण्याची शक्यता असून तेल मंत्री धर्मेद्र प्रधान यांनी तेलाच्या किमती आटोक्यात ठेवण्यासाठी सौदी अरेबियाला सक्रिय भूमिका पार पाडण्याची विनंती केली आहे. सौदी अरेबिया हा तेलाचा सर्वात मोठा दुसरा निर्यातदार देश आहे.
  • पेट्रोल व डिझेलचे दर एक महिन्यात लिटरला 2 रूपये वाढले असून अमेरिका व चीन यांच्यातील व्यापार युद्ध संपण्याची चिन्हे असून ओपेकचा मित्र देश असलेला रशिया खनिज तेलाचा पुरवठा कमी करणार आहे, त्यामुळे किंमती वाढणार आहेत.

Share This Article