⁠  ⁠

Current affairs 10 March 2018

Saurabh Puranik
By Saurabh Puranik 4 Min Read
4 Min Read

1) फ्रान्सचे राष्ट्रपती भारत दौऱ्यावर

फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युअल मॅक्रॉन पत्नी ब्रिगिटसोबत तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत. शुक्रवारी रात्री भारतात पोहोचलेल्या मॅक्रॉन यांच्या स्वागतासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रोटोकॉल मोडून विमानतळावर त्यांच्या स्वागतासाठी गेले होते. शनिवारी सकाळी ते राष्ट्रपती भवनात पोहोचचे येथे राष्ट्रपीत रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत त्यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. या दौऱ्यात मॅक्रॉन यांचे पंतप्रधान मोदी त्यांचा मतदारसंघ वाराणसीमध्ये जंगी स्वागत करणार आहेत. नावेत बसवून त्यांना गंगेची सफर घडवणार आहेत. त्यासोबतच घाटावर घेऊन जातील. याआधी जपानचे पंतप्रधान शिंजो आबे वाराणलीला आले होते.

2) राजस्थानातही बलात्काऱ्यास फाशींची शिक्षा

राजस्थान विधानसभेत शुक्रवारी १२ वर्षांपर्यंतच्या मुलींवर बलात्कार अथवा सामूहिक बलात्कार करणाऱ्या बलात्काऱ्यांना फाशीची शिक्षा देण्याची तरतूद करणारे ऐतिहासिक विधेयक मंजूर केेले. मध्य प्रदेशानंतर अशा प्रकारचा कायदा करणारे दुसरे राज्य ठरले आहे. तथापि, राष्ट्रपतींच्या मंजुरीनंतर हा कायदा लागू होईल. गृहमंत्री गुलाबचंद कटारिया यांनी दंडविधान राजस्थान दुरुस्ती विधेयक-२०१८ विधानसभेच्या पटलावर ठेवले. भादंवि कलम १८६० मध्ये नवे कलम ३७६ क जोडून १२ वर्षांपर्यंतच्या मुलींवर जो कोणी बलात्कार करेल त्यास फाशींच्या शिक्षेची तजवीज करण्यात आली आहे. अथवा कठोर तुरुंगवासाची शिक्षाही होईल. जी १४ वर्षांपेक्षा कमी नसेल आणि ती आजन्म कारावासही होऊ शकतो. अशा प्रकारे ३७६ घ नुसार तरतूद करण्यात आली आहे. यात १२ वर्षांपर्यंतच्या मुलींवर सामूहिक बलात्कार करणारा प्रत्येक व्यक्ती गुन्ह्यात दोषी मानला जाईल. त्यास फाशी अथवा कठोर तुरुंगवास, ज्याचा कालावधी २० वर्षांपेक्षा कमी नसेल. ती अाजीवन कारावासाचीही असू शकेल.

3) भारताच्या परकीय चलनाच्या गंगाजळीत मोठी वाढ

भारताच्या परकीय चलनाच्या गंगाजळीत मोठी वाढ झाल्याचे २ मार्च रोजी संपलेल्या आठवड्याच्या आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. परकीय चलनाची गंगाजळी १६७.७ अब्ज डाँलर्सने वाढून ती ४२०.७ अब्ज डाँलर्सवर जाऊन पोहोचल्याचे रिझर्व्ह बँकेने काल स्पष्ट केले. त्यापुर्वीच्या आठवड्यात ती थोडी घटून ४२०.५ इतकी झाली होती. ९ फेब्रुवारी रोजी संपलेल्या आठवड्यात परकीय चलनाच्या साठ्याने विक्रम केला होता. त्यावेळेस ४२१.९१४ अब्ज डाँलर्स इतके चलन उपलब्ध झाले होते. आजवरच्या इतिहासातील तो विक्रम होता. मागील वर्षी ८ सप्टेंबर रोजी परकीय चलनाच्या गंगाजळीने प्रथमच ४०० अब्ज डाँलर्सचा टप्पा गाठला होता. त्यानंतर तो त्याच्या आसपास वरखाली होत राहिला. परकीय गंगाजळीबरोबर भारतीय सोन्याच्या साठ्याच्या किंमतीतही मोठी वाढ झाल्याचे रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केले आहे. सोन्याच्या साठ्याचे मूल्य ८.१ अब्ज डाँलर्सने वाढून २१.५२२ अब्ज डाँलर्स झाल्याचे बँकेने माहिती दिली आहे.

4) महापाषाण युग काळातील शीलास्तंभ आढळले

चंद्रपूर जिल्हय़ातील नागभीड तालुक्यापासून साधारण १२ किलोमीटर पूर्वेकडील रान परसोडी गावांत लोहयुगीन (महापाषाणयुग) काळातील दोन शिलास्तंभ इतिहास अभ्यासक अमित भगत यांना शोधमोहिमेदरम्यान आढळून आले आहेत. त्यांच्या मते यांचा कालखंड साधारण इसवी सन पूर्व ५०० ते इसवी सन २०० यादरम्यान असावा. शिलास्तंभांबाबत स्थानिकांत कुतुहल आहे. शिलास्तंभांना स्थानिक लोक ‘मामा-भांजा’ म्हणून संबोधतात. याचे कारण त्यांची उंची व आकारमानांत दिसून येणारा फरक होय. यातील मोठा शिलास्तंभ २ मीटर उंचीचा असून त्याची रूंदी १.६५ मीटर व जाडी ३६ सेमी आहे. या स्तंभापासून जवळच ५० फुटांवर असणारा दुसरा शिलास्तंभ ०.७५ मीटर उंच असून ०.४५ मीटर रूंद आहे. व त्याची जाडी २७ सेंमी आहे. अमित भगत यांनी यापूर्वीच नागभिड जवळील डोंगरगाव भागात ४६ शिलास्तंभ शोधून काढले होते. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने सुद्धा त्यांच्या या संशोधनाची दखल घेतलेली आहे.

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी Mission MPSC ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Share This Article