⁠  ⁠

चालू घडामोडी : १० फेब्रुवारी २०२०

Chetan Patil
By Chetan Patil 4 Min Read
4 Min Read

Current Affairs 10 February 2020

Oscar 2020 : ऑस्करमध्ये दक्षिण कोरियाने सोडली छाप; ‘पॅरासाइट’ ठरला सर्वोत्कृष्ट चित्रपट

5d1ee8e3 5329 4dc8 8e40 e9e5813aef78

सिनेसृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार म्हणून गौरवला जाणारा ऑस्कर सोहळा अखेर पार पडला. यंदाच्या ऑस्करवर ‘पॅरासाइट’ या चित्रपटाने छाप पाडली. ऑस्करच्या अंतीम फेरीपर्यंत पोहोचणारा हा पहिलाच दक्षिण कोरियन चित्रपट आहे. याव्यतिरीक्त अभिनेता जोकिन फिनिक्सने सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या पुरस्कारावर आपले नाव कोरले.
यंदाच्या ऑस्करमध्ये सर्वात जास्त अपेक्षा जोकर या चित्रपटाकडून होत्या. कारण या चित्रपटाने सर्वाधिक ११ नामांकनं मिळवली होती. परंतु या चित्रपटाला केवळ दोन पुरस्कार पटकावता आले. त्या खालोखाल 1917 या चित्रपटाला १० नामांकने मिळाली होती. मात्र त्यांनाही केवळ दोनच पुरस्कारांवर समाधान मानावे लागले.

प्रीमियर बॅडमिंटन लीग : बेंगळूरु सलग दुसऱ्यांदा अजिंक्य

Untitled 25 4

तब्बल तीन हजार चाहत्यांच्या पाठिब्यांचा पुरेपूर लाभ उचलत गतविजेत्या बेंगळूरु रॅप्टर्सने प्रीमियर बॅडमिंटन लीगच्या पाचव्या पर्वातील अंतिम सामन्यात नॉर्थ ईस्टर्न वॉरियर्सवर ४-२ असा विजय मिळवून सलग दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावले.
बेंगळूरुच्या बी. साईप्रणीतने पहिल्या पुरुष एकेरीत ली चेक यिऊला पिछाडीवरून १४-१५, १५-९, १५-३ असे पराभूत केले. मात्र पुरुष दुहेरीत बोदिन इसारा आणि ली याँग यांनी अरुण जॉर्ज-रियान सपुत्रो या जोडीवर १५-११, १३-१५, १५-१४ असा निसटता विजय मिळवून वॉरियर्सला २-१ अशी आघाडी मिळवून दिली. ही ‘ट्रम्प’ लढत असल्याने वॉरियर्सने २ गुण मिळवले. महिला एकेरीच्या लढतीत मातब्बर ताई झू यिंगने मिशेल ली हिला १५-९, १५-१२ अशी सहज धूळ चारून बेंगळूरुला २-२ अशी बरोबरी साधून दिली.
त्यानंतर बेंगळूरुच्या ‘ट्रम्प’ लढतीत चॅन सून आणि ईऑन वॉन यांनी कृष्णाप्रसाद आणि किम हा ना यांचा कडवा प्रतिकार १५-१४, १४-१५, १५-१२ असा मोडून काढला आणि बेंगळूरुच्या जेतेपदावर शिक्कामोर्तब झाले.

U19 CWC ; बांगलादेश ठरले विश्वविजेते! विश्वचषक जिंकणारा ठरला सातवा संघ

Image result for icc-u-19-world-cup-final-bangladesh

बांगलादेशच्या युवा संघाने रविवारी एेतिहासिक कामगिरीची नाेंद केली. शहादतच्या नेतृत्वात बांगलादेश संघाने अायसीसीच्या १९ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेत विश्वविजेता हाेण्याचा बहुमान पटकावला. बांगलादेशचा युवा संघ पहिल्यांदा विश्वविजेतेपदाचा मानकरी ठरला अाहे. टीमने स्पर्धेत १२ वेळा सहभागी हाेताना २२ वर्षात पहिल्यांदा ही वर्ल्डकपची ट्राॅफी पटकावली अाहे. यादरम्यान बांगलादेश संघाने किताबाच्या फायनलमध्ये चार वेळच्या वर्ल्ड चॅम्पियन भारतीय संघाला पराभूत करण्याचा पराक्रम गाजवला.
अाशियाई संघ १३ पैकी सात वेळा विश्वविजेते
बांगलादेश संघाने पहिल्यांदाच विश्वविजेता हाेण्याचा बहुमान पटकावला अाहे. याशिवाय वर्ल्डकप ट्राॅफी जिंकणारा बांगलादेश हा सातवा संघ ठरला. अाशियाईतील संघांनी अातापर्यंत १३ पैकी सात वेळा विश्वविजेता हाेण्याचा पराक्रम गाजवला अाहे. यामध्ये भारतीय संघ सर्वाधिक चार वेळा या ट्राॅफीचा मानकरी ठरला अाहे. याशिवाय पाकिस्तान अाणि श्रीलंका संघाला प्रत्येकी एक वेळा हा वर्ल्डकप जिंकता अाला अाहे. त्यानंतर अाता बांगलादेश यशस्वी संघ ठरला.

मोहम्मद तौफिक अलावी इराकचे नवे पंतप्रधान

Image result for मोहम्मद तौफिक अलावी इराकचे नवे पंतप्रधान

इराकचे अध्यक्ष बरहामसालेह ह्यांनी मोहम्मद तौफिक अलावी यांची इराकचे नवे पंतप्रधान म्हणून नियुक्ती केली आहे.
बरहाम सालेह यांनी आपल्याला सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रित केले असल्याचे इराकचे माजी संवाद मंत्री असलेल्या मोहम्मद तौफिक यांनी सांगितले.यामुळे इराकमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून सुरु असलेला राजकीय पेच सुटला आहे.
दरम्यान इराकमध्ये गेल्या चार महिन्यांपासून आणि माजी पंतप्रधान आदेल अब्दुल माहदी यांनी राजीनामा दिल्यानंतरही दोन महिन्यांपासून नागरिकांनी सरकारविरोधात सुरू केलेले आंदोलन सुरूच आहे. राजकीयदृष्ट्‌या स्वतंत्र पंतप्रधान, भ्रष्टाचार आणि आंदोलनाशी संबंधित हिंसाचाराच्या उत्तरदायित्वाची मागणी करणाऱ्या सरकारविरोधी आंदोलनाच्या चार महिन्यांत प्रामुख्याने बगदाद आणि परिसरामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

Share This Article