Current Affairs 10 April 2019

0
198

भारतीय गोळाफेकपटू मनप्रीत कौरला दणका; ४ वर्षांची बंदी

 • आशियाई सुवर्णपदक विजेती भारतीय गोळाफेकपटू मनप्रीत कौर हिच्यावर २०१७ मध्ये चार वेळा उत्तेजक द्रव्य सेवन प्रकरणाचे उल्लंघन केल्याप्रकरणी राष्ट्रीय उत्तेजकविरोधी संस्थेने (नाडा) चार वर्षांची बंदी घातली आहे.
 • मनप्रीतच्या बंदीचा कालावधी हा २० जुलै २०१७ पासून सुरू होणार आहे, असे ‘नाडा’च्या उत्तेजकविरोधी शिस्तपालन समितीने २९ मार्च रोजी काढलेल्या आदेशात म्हटले आहे.
 • मनप्रीतची उत्तेजक चाचणी २०१७ मध्ये करण्यात आल्यामुळे तिला आता आशियाई अजिंक्यपद अथलेटिक्स स्पर्धेत मिळवलेल्या सुवर्णपदकाला मुकावे लागणार आहे. त्याचबरोबर तिचा राष्ट्रीय विक्रमही पुसला जाणार आहे.
 • मनप्रीत ही २०१७ मध्ये चार वेळा उत्तेजक चाचणीत दोषी ठरली होती. चीन येथील जिनुहा येथे झालेल्या आशियाई ग्रां. प्रि. स्पर्धेत ती पहिल्यांदा दोषी आढळली.

स्टेट बँकेची कर्जे स्वस्त

Advertisement
 • रिझव्‍‌र्ह बँकेने सलग दुसऱ्यांदा केलेल्या रेपो दरकपातीचा लाभ स्टेट बँकेने तिच्या ग्राहकांना करून देणारे पाऊल उचलले आहे. देशातील सर्वात मोठय़ा बँकेने आपली कर्जे आता वार्षिक ८.५० टक्के व्याजदराने देऊ केली आहेत.
 • स्टेट बँकेने निधी खर्चावर आधारित कर्ज व्याजदर (एमसीएलआर) ८.५५ टक्क्यांवरून ८.५० टक्के करण्यात आल्याचे जाहीर केले. नव्या दराची मात्रा बँकेच्या सर्वच कर्जदारांना १०पासून लागू होत असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
 • नव्या दरबदलामुळे बँकेचे ३० लाख रुपयांपर्यंतच्या कर्जाचे व्याजदर ०.१० टक्क्याने कमी झाले आहेत. ते आता ८.६० ते ८.९० टक्के दरम्यान असतील.
 • तथापि रिझव्‍‌र्ह बँकेच्या पाव टक्का रेपो दर कपातीच्या तुलनेत, बँकांकडून प्रत्यक्षात झालेली ०.०५ टक्के व्याजदर कपात करून, २० टक्के लाभच ग्राहकांपर्यंत पोहचविला गेला आहे.
 • नाणेनिधीचीही विकासावर मोहोर

जागतिक बँकेनंतर आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनेही भारताच्या विकासदराबाबत सकारात्मक अंदाज व्यक्त केला आहे. २०१८-१९ व २०१९-२० या आर्थिक वर्षात भारताचा विकासदर अनुक्रमे ७.३ व ७.५ टक्के नोंदवला जाईल, असे नाणेनिधीने म्हटले आहे.
जागतिक बँकेने दक्षिण आशियाई देशांसंबंधी प्रसिद्ध केलेल्या अहवालात चालू आर्थिक वर्षात भारताचा विकासदर ७.५ टक्के राहील, असे म्हटले होते. नाणेनिधीनेही हाच अंदाज वर्तवला आहे. वाढती गुंतवणूक व ग्राहकांची वाढती क्रयशक्ती याचा भारतीय अर्थव्यवस्थेस फायदा होईल, असे नाणेनिधीने म्हटले आहे.

बीएसएनएलचे विक्रमी उत्पन्न

 • सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएलला गेल्या आर्थिक वर्षामध्ये विविध उपक्रमांच्या माध्यमातून ६,५०० कोटी रुपयांचे उत्पन्न झाले असून हे आजवरचा सर्वोच्च उत्पन्न ठरले आहे.
 • सार्वजनिक उपक्रम विभागाने घोषित केल्यानुसार बीएसएनएलची एकूण मालमत्ता ८३ हजार कोटी रुपयांची आहे. बीएसएनएल तोट्यात असली तरी टेलिकॉम कंपन्यांमध्ये बीएसएनएलवर सर्वात कमी १४ हजार कोटी रुपयांचे कर्ज आहे

छत्तीसगडमध्ये माओवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात भाजपाचा आमदार ठार

 • छत्तीसगडमधील दंतेवाडामध्ये माओवाद्यांनी केलेल्या भूसुरूंगस्फोटात स्थानिक भारतीय जनता पक्षाचे आमदार भीमा मंडवी हे ठार झाले आहे. माओवाद्यांनी भररस्त्यात पेरलेल्या ‘आयईडी’चा स्फोट घडवून पुन्हा एकदा लोकशाही प्रक्रियेला हिंसेचे गालबोट लावले आहे.
 • बस्तर लोकसभा मतदारसंघात मोडणाऱ्या दंतेवाडामध्ये उद्या, ११ एप्रिल रोजी मतदान होत आहे. यापूर्वीही निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर छत्तीसगडमध्ये रक्तपात घडला आहे. मे, २०१३च्या विधानसभा निवडणूककाळात असाच भूसुरूंगस्फोट घडवण्यात आला होता व त्यामध्ये काँग्रेसचे माजी केंद्रीय मंत्री विद्याचरण शुक्ल; तसेच राज्यातील काँग्रेस नेतृत्वाच्या फळीसह २७ जणांना प्राण गमवावे लागले होते.
Advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here