Current Affairs – 1-2 October 2018

0
20
James-Allison-and-Tasuku-Honjo

Noble Prize 2018
जेम्स एलिसन, तासुकू होंजो यांना मेडिसिनचा नोबेल जाहीर

  • प्रतिष्ठित नोबेल पुरस्कारांची आजपासून घोषणा करण्यात येत आहे. मेडिसीनमधील नोबेल पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. यंदा हा पुरस्कार अमेरिकेचे वैज्ञानिक जेम्स पी. एलिसन आणि जपानचे वैज्ञानिक तासुकू होंजो यांना संयुक्तरित्या जाहीर झाला आहे. या दोघांना हा पुरस्कार कर्करोगावरील उपचारांच्या शोधासाठी देण्यात येणार आहे. या दोघांनी कर्करोगावर उपचारांसाठी अशी थेरपी शोधून काढली ज्याद्वारे कर्करोगाच्या ट्यूमरशी लढण्याची शरीरातील पेशींची प्रतिकार शक्ती वाढवता येऊ शकते.
  • आजपासून आठवडाभर विविध क्षेत्रातील नोबेल पुरस्कारांची घोषणा होणार आहे. यंदा साहित्यातील नोबेल पुरस्कार दिला जाणार नाही, असा निर्णय नोबेलच्या अकादमीने घेतला आहे. गेल्या ७० वर्षांत असे पहिल्यांदाच घडत आहे की साहित्यातील नोबेल पुरस्कार दिला जाणार नाही.

आंतरराष्ट्रीय नाणेनिधाच्या मुख्य अर्थतज्ज्ञपदी – गीता गोपीनाथ यांची नियुक्ती

  • gita-gopinathरघुराम राजन यांच्यानंतर आणखी एका भारतीय व्यक्तीची वर्णी आंतरराष्ट्रीय नाणेनिधाच्या मुख्य अर्थतज्ज्ञपदी लागली आहे. भारतीय वंशाच्या गीता गोपीनाथ यांची नियुक्ती आंतरराष्ट्रीय नाणेनिधाच्या मुख्य अर्थतज्ज्ञपदी करण्यात आली आहे.
  • आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या व्यवस्थापकीय संचालिका ख्रिस्टिन लगार्डी यांनी गीता यांची निवड केली आहे. सध्या मोरी ऑब्स्टफेल्ड आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या मुख्य अर्थतज्ज्ञपदाची धुरा सांभाळत आहेत. मोरी डिसेंबरमध्ये निवृत्त होतील झाल्यानंतर गीता गोपीनाथ कार्यभार सांभाळणार आहेत.
  • आंतरराष्ट्रीय नाणेनिधाच्या मुख्य अर्थतज्ज्ञपदी नियुक्ती झालेल्या गीता गोपीनाथ या दुसऱ्या भारतीय आहेत. याआधी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांची या पदावर नियुक्ती झाली होती. राजन 1 सप्टेंबर 2003 ते 1 जानेवारी 2007 या काळात आंतरराष्ट्रीय नाणेनिधाच्या मुख्य अर्थतज्ज्ञपदी होते.

Advertisement

२०१९ अखेर पर्यंत राज्यातील ग्रामीण भागात सर्वांना घरे : मुख्यमंत्री फडणवीस

  • स्वच्छता कार्यक्रमाच्या यशानंतर आता महाराष्ट्रात सर्वांना राहण्यासाठी घरे उपलब्ध करून देण्याच्या दिशेने पावले उचलण्यात येत असून २०१९ पर्यंत राज्यातील ग्रामीण भागात सर्वांना घरे मिळतील यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
  • दिल्ली येथे आयोजित महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय स्वच्छता परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहभागी झाले होते. ‘स्वच्छ भारत अभियान व शाश्वत विकास’ या विषयावर त्यांनी मत मांडले. २०१९ अखेर राज्यातील ग्रामीण भागात प्रत्येकाला घर व स्वच्छ पिण्याचे पाणी देण्याचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.
  • आतापर्यंत ग्रामीण भागात ४ लाख घरे बांधण्यात आली. सध्या ६ लाख घरे बांधण्यास केंद्राकडे मंजुरीसाठी प्रयत्न सुरु असून पुढील वर्षी २ लाख घरे बांधण्यास मंजुरी घेऊन डिसेंबर २०१९ पर्यंत १२ लाख घरे बांधण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.

नियमित अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज – Mission MPSC

टेलिग्राम चॅनल जॉईन करण्यासाठी पुढील लिंकवर क्लीक करा – Mission MPSC Telegram Channel

Advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here