⁠  ⁠

चालू घडामोडी : ०८ फेब्रुवारी २०२०

Chetan Patil
By Chetan Patil 4 Min Read
4 Min Read

Current Affairs 08 February 2020

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात काम करण्यासाठी जर्मनी- महाराष्ट्र शासनाचा सामंजस्य करार

Min%2BSubhash%2BDesai%2BAt%2BMOU%2B1

माहिती तंत्रज्ञान, वाहन, पायाभूत सुविधा, कला-संस्कृतीसह पर्यावरण क्षेत्रात एकत्रित काम करण्यासाठी जर्मनीतील बॅडन- -ह्युटनबर्ग तसेच महाराष्ट्र शासन यांच्यात सह्याद्री आतिथीगृह येथे सामंजस्य करार झाला.
महाराष्ट्र शासनाच्या वतीने उद्योगमंत्री सुभाष देसाई तर जर्मनीच्या वतीने बॅडन-ह्युटनबर्गच्या मंत्री थेरेसा शॉपर उपस्थित होत्या.
बॅडन आणि महाराष्ट्र शासन यांच्यात 2015 मध्ये विविध बाबींवर सामंजस्य करार करण्यात आला होता. त्याला पाच वर्षे पूर्ण झाले असून येत्या काळात दोन्ही राज्यातील संबंध अधिक दृढ करण्याचा निश्चय यावेळी करण्यात आला. नव्या सामंजस्य करारानुसार दोन्ही राज्य नवीन तंत्रज्ञान आणि डिजिटलायझेशन या क्षेत्रात परस्पर सहकार्य करणार आहेत. याशिवाय विज्ञान आणि संशोधन क्षेत्रात काम करण्याचा दोन्ही राज्यांनी निर्धार केला आहे. कला आणि सांस्कृतिक क्षेत्राला प्रोत्साहन देण्याचा निर्धार उभयंतांनी व्यक्त केला आहे.
जर्मनी आणि महाराष्ट्राची मैत्री जुनी आहे. ती यापुढेही कायम राहील.

राष्ट्रीय अजिंक्यपद कॅरम स्पर्धा : प्रशांत, अपूर्वाला राष्ट्रीय विजेतेपद

विश्वविजेत्या प्रशांत मोरे (रिझव्‍‌र्ह बँक) याने पहिला सेट गमावूनही चुरशीच्या झालेल्या अंतिम सामन्यात एअर इंडियाच्या संदीप दिवे याचे आव्हान परतवून लावत राष्ट्रीय विजेतेपदाला गवसणी घातली.
जळगाव येथे झालेल्या राष्ट्रीय अजिंक्यपद कॅरम स्पर्धेत महिलांच्या अंतिम सामन्यात विश्वविजेत्या एस. अपूर्वा (एलआयसी) हिने माजी विश्वविजेती रश्मी कुमारी (पेट्रोलियम क्रीडा मंडळ) हिला सरळ दोन सेटमध्ये पराभूत करत विजेतेपद पटकावले.ही लढत १६-२५, २५-१०, २७-७ अशा फरकाने जिंकली.
महिलांमध्ये दोन्ही विश्वविजेत्या खेळाडू अंतिम फेरीत आमने-सामने आल्यामुळे या लढतीकडे सर्वाचे लक्ष लागले होते. पण अपूर्वाने २५-११, २५-११ अशा फरकाने रश्मीचा प्रतिकार मोडून काढला. विशेष म्हणजे, अपूर्वाने स्पर्धेतील सर्व सामने दोन सेटमध्ये जिंकून प्रेक्षकांची वाहवा मिळवली.

राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत राखी हलदरला सुवर्णपदक

महिला राष्ट्रीय भारोत्तोलन स्पर्धेत राखी हलदरला सुवर्णपदक

भारताची महिला वेटलिफ्टर राखी हलदरने 72 व्या पुरुष व 35 व्या महिलांच्या वरिष्ठ राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत 64 किलो वजन गटात सुवर्णपदक पटकावले.
ऑलिम्पिक पात्रतेसाठी 19 वे मानांकन असलेल्या राखीने स्नॅचमध्ये 93 किलो तर क्लीन व जर्कमध्ये 117 किलो वजन उचलत सुवर्णपदक पटकावले. तिने एकूण 216 किलो वजन उचलले.
तिची जवळची प्रतिस्पर्धी चंदिगडच्या हरजिंदर कौलने 200 किलो वजन उचलत रौप्य मिळविले. मणिपूरच्या के. रोशिलता देवीने 187 किलो वजन उचलत कांस्य मिळविले. राखीने कतारमधील स्पर्धेत वैयक्तिक सर्वोच्च कामगिरी नोंदवत कांस्यपदक मिळविले होते. गेल्या वर्षी जूनमध्ये झालेल्या राष्ट्रकुल चॅम्पियनशिपमध्ये एकूण 214 किलो वजन उचलत सुवर्ण मिळविले होते.

बौद्धिक संपदा निर्देशांक: भारत ४० व्या स्थानी

बौद्धिक संपदा निर्देशांक: भारत ४० व्या स्थानी

भारत बौद्धिक संपदा निर्देशांकात ४० व्या स्थानी आहे. ५३ अर्थव्यवस्थांमध्ये ४० व्या क्रमांकावर आहे. जागतिक नाविन्य धोरण केंद्र (Global Innovation Policy Centre – GIPC), यूएस चेंबर ऑफ कॉमर्सने याबाबतची निर्देशांक जारी केली.
GIPC नुसार भारत सर्वात आव्हानात्मक परंतु आश्वासक बाजार, अंमलबजावणी आणि पेटंट पात्रता यांमध्ये मुख्यत्वे अडथळे निर्माण
यावर्षी निर्देशांकात भारताची १६.२२ गुणांची नोंद
मागील वर्षाच्या अहवालाच्या तुलनेत भारताच्या गुणांमध्ये ७% वाढ
सापेक्ष कामगिरीच्या आधारे भारत ४ स्थानांनी मागे
भारत गत क्रमवारी आणि आकडेवारी
२०१९: ३६ व्या क्रमांकावर
२०१८: ४४ व्या क्रमांकावर
२०१९ मध्ये कोणत्याही देशासाठी सर्वाधिक कमाई
जग क्रमवारी
अमेरिका
यूके
स्वीडन
फ्रान्स
जर्मनी
आयर्लंड
भारतीय पेटंट कायदा, २००५
कायद्यामध्ये बऱ्याच सुधारणा
हेच बौद्धिक संपत्तीच्या क्षेत्रात होणारी विकासाची गती मंदावण्याचे मुख्य कारण मानतात
कायद्याच्या प्रमुख दुरुस्तीत कलम(डी) समाविष्ट
तृतीय पक्षाला परवाना बंधनकारक
विशेषत: सार्वजनिक आरोग्याच्या हितासाठी नाविन्यपूर्ण औषध बनविण्याचा परवाना देणे अनिवार्य

‘भारतीय आंतरराष्ट्रीय समुद्री खाद्य देखावा’ होणार कोची येथे

‘भारतीय आंतरराष्ट्रीय समुद्री खाद्य देखावा’ होणार कोची येथे ७ ते ९ फेब्रुवारी २०२० (३ दिवसीय)दरम्यान होत आहे. भारतीय समुद्री खाद्य निर्यात संघटना (Seafood Exporters Association of India – SEAI) आयोजित केला आहे,
आवृत्ती २२ वी आहे.
प्रदर्शन संधी
बांधणी पद्धती
प्रक्रियात्मक मशनरी
प्रक्रिया घटक विक्रेते
पुरवठादार
२०२० सालाची थीम
निळी क्रांती- मूल्यवर्धन उत्पादनापलीकडे (Blue Revolution- Beyond Production to Value Addition)

Share This Article