Current Affairs 08 August 2019

0
480

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जींचा ‘भारत रत्न’ पुरस्काराने होणार गौरव

 • माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना आज (गुरूवार) देशाचा सर्वोच्च नागरिक सन्मान पुरस्कार ‘भारत रत्न’ देऊन गौरवण्यात येणार आहे
 • ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि जनसंघाचे नेते नानाजी देशमुख आणि ज्येष्ठ संगीतकार भूपेन हजारिका यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
 • या पुरस्कारासाठी जानेवारी महिन्यांतच या तिघांच्या नावांची घोषणा करण्यात आली होती.

पाकिस्तानने बंद केली हवाई हद्द

 • जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर आणि राज्याच्या पुनर्रचनेचा निर्णय घेतल्यानंतर पाकिस्तानचा जळफळाट झाला आहे.
 • पाकिस्तानने भारतीय राजदूतांना मायदेशी परतण्यास सांगितले असून आपल्या राजनैतिक अधिकाऱ्याला माघारी बोलावले आहे. तसेच भारताशी होणारा व्यापार पाकिस्तानने रोखला आहे.
 • त्यानंतर पाकिस्तान भारतासाठी आपली हवाई हद्द बंद करेल अशा शक्यता वर्तवल्या जात होत्या. त्यातच
 • पाकिस्तानने काही काळासाठी आपली हवाई हद्द बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
 • 6 ऑगस्ट ते 5 सप्टेंबरदरम्यान ही हवाई हद्द बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

रिझव्‍‌र्ह बँकेकडून सलग चौथी व्याजदरकपात

 • मंदावलेल्या अर्थव्यवस्थेत खालावत्या कर्ज मागणीला उभारी देण्यासाठी रिझव्‍‌र्ह बँकेने बुधवारी रेपो दरात थेट ०.३५ टक्के कपात केली.
 • याचा कित्ता गिरवून सणांच्या तोंडावर गृह, वाहन कर्जे व्यापारी बँकांकडून स्वस्त होण्याची आता प्रतीक्षा आहे. स्टेट बँकेने लगेचच कर्जस्वस्ताई करून अन्य बँकांना मार्ग मोकळा करून दिला आहे.
 • रिझव्‍‌र्ह बँकेने चौथ्या द्वैमासिक पतधोरणात रेपो दर ०.३५ टक्के कमी करत ५.४० टक्के असा गेल्या जवळपास दशकातील किमान स्तरावर आणून ठेवला. यामुळे व्यापारी बँकांचा कर्जभार कमी होणार असून त्याचा लाभ कर्जदारांना होणार आहे. पतधोरणापूर्वीच स्टेट बँक, एचडीएफसीने काही प्रमाणात दरकपात केली.
Advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here