Current Affairs 07 March 2019

0
318

माजी पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर उपलोकायुक्तपदी

 • राज्याचे माजी पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांची उपलोकायुक्तपदी निवड करण्यात आली आहे. याविषयी राज्य सरकारने पाठविलेल्या प्रस्तावावर राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी शिक्कामोर्तब केले.
 • राज्याची कायदा-सुव्यवस्था सांभाळल्यानंतर आता लोकसेवकांविरोधातील भ्रष्टाचार तसेच अन्य तक्रारींच्या प्रकरणांच्या सुनावणीची महत्त्वाची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
 • मुंबईचे पोलीस आयुक्तपद भूषकिल्यानंतर दत्ता पडसलगीकर यांनी 1 जुलै 2018 रोजी राज्याचे पोलीस महासंचालक म्हणून पदभार स्कीकारला होता.
  30 ऑगस्ट रोजी निवृत्त होणार असतानाच त्यांना राज्य-केंद्र सरकारच्या शिफारशीवरून तीन-तीन महिन्यांची दोनदा मुदतवाढ देण्यात आली.

केप्लर दुर्बिणीने शोधलेल्या पहिल्या बाह्य़ग्रहावर शिक्कामोर्तब

 • दहा वर्षांपूर्वी सोडण्यात आलेल्या नासाच्या केप्लर दुर्बीणीने शोधलेला पहिला संभाव्य बाह्य़ग्रह हा आता खरोखर बाह्य़ग्रह ठरला आहे असे वैज्ञानिकांनी म्हटले आहे.
 • या बाह्य़ग्रहाचे नाव केप्लर १६५८ बी असून तो तप्त गुरू ग्रहासारखा आहे. तो त्याच्या मातृताऱ्याभोवती ३.८५ दिवसात एक प्रदक्षिणा पूर्ण करतो, असे अमेरिकेतील हवाई विद्यापीठाच्या संशोधकांनी सांगितले.
 • मातृताऱ्याचा व्यास पृथ्वीवरून सूर्य पाहताना असतो त्याच्या साठ पट जास्त आहे. केप्लर दुर्बीणीने अनेक संभाव्य बाह्य़ग्रहांचा शोध लावला होता. ही दुर्बीण २००९ मध्ये सोडण्यात आली होती. त्यात संक्रमण पद्धतीने ग्रहांचा शोध घेण्यात आला.
 • केप्लर दुर्बीणीने २०११ मध्ये केप्लर १६५८ बी हा संभाव्य बाह्य़ग्रह शोधून काढला होता तो खडकाळ आहे.
 • केप्लर १६५९ हा तारा सूर्यापेक्षा जास्त वस्तुमानाचा व तीन पटींनी मोठा आहे. केप्लर १६५९ बी हा ग्रह त्याच्या ताऱ्यापासून कमी अंतरावरच्या कक्षेतून फिरतो. तो ताऱ्याच्या व्यासाच्या दुप्पट अंतरावरून फिरत असल्याने ताऱ्याभोवतीचा तो सर्वात जवळचा ग्रह आहे.
 • केप्लर १६५८ बी हा केप्लर दुर्बीणीने शोधलेला पहिला संभाव्य बाह्य़ग्रह
  * तो खरोखर बाह्य़ग्रह असल्याचे ताऱ्याच्या ध्वनिलहरींच्या अभ्यासातून निष्पन्न
  * ताऱ्याभोवती ३.८५ दिवसात एक प्रदक्षिणा

केंद्रीय स्वच्छता पाहणीत लागोपाठ तिसऱ्या वर्षी इंदूर शहर प्रथम

 • केंद्र सरकारच्या स्वच्छता पाहणीत लागोपाठ तिसऱ्या वर्षी इंदूरला पहिला क्रमांक मिळाला आहे. दुसरा क्रमांक छत्तीसगडमधील अंबिकापूरला, तर तिसरा कर्नाटकमधील म्हैसूरला मिळाला आहे.
 • स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार २०१९ राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी एका कार्यक्रमात प्रदान केले. नवी दिल्ली महापालिका भागास स्वच्छ लहान शहराचा पुरस्कार मिळाला असून उत्तराखंडमधील गौचरला उत्तम गंगा शहराचा मान मिळाला आहे. सर्वात मोठे स्वच्छ शहर म्हणून अहमदाबादला मान मिळाला असून रायपूर हे वेगाने वाढणारे मुख्य शहर ठरले आहे.
 • स्वच्छ मध्यम शहराचा मान उज्जनला मिळाला असून वेगाने वाढणाऱ्या मध्यम शहरात मथुरा-वृंदावन यांना गौरवण्यात आले आहे. उच्च मानांकित शहरांना महात्मा गांधींचा पुतळा व सन्मानचिन्ह देण्यात आले आहे.
 • स्वच्छ सर्वेक्षण २०१९ मध्ये देशाच्या सर्व शहरी भागातील महापालिका व पालिकांनी भाग घेतला होता.

‘स्वच्छ सर्वेक्षण’मध्ये महाराष्ट्राला सर्वाधिक पुरस्कार

 • ‘स्वच्छ सर्वेक्षण अभियान’मध्ये महाराष्ट्राने सर्वाधिक ४५ पुरस्कार पटकावून देशात अव्वल स्थान मिळविले आहे. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या राज्यांच्या यादीत महाराष्ट्राला तिसरे स्थान मिळाले. नवी दिल्लीत बुधवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
 • महाराष्ट्राला उत्कृष्ट (बेस्ट परफॉर्मिग स्टेट) राज्यांत तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
 • पहिल्या शंभरांत राज्यातील २४ शहरे
 • विज्ञान भवनातील समारंभात ‘स्वच्छ सव्‍‌र्हेक्षण-२०१९’चे निकाल घोषित करण्यात आले.
 • या अभियानात सवरेत्कृष्ट कामगिरी केलेल्या पहिल्या १०० शहरांमध्ये राज्यातील २४ शहरे आहेत. या शहरांमध्ये नवी मुंबई (७), कोल्हापूर (१६), मीरा-भाईंदर (२७), चंद्रपूर (२९), वर्धा (३४), वसई-विरार (३६), पुणे (३७), लातूर (३८), सातारा (४५), पिंपरी-चिंचवड (५२), उदगीर (५३), सोलापूर (५४), बार्शी (५५), ठाणे (५७), नागपूर (५७), नांदेड-वाघाळा (६०), नाशिक (६७), अमरावती (७४), जळगाव (७६), कल्याण-डोंबिवली (७७), पनवेल (८६), अचलपूर (८९), बीड (९४) व यवतमाळ (९६) या शहरांचा समावेश आहे.

चीनचे उपरराष्ट्रमंत्री पाकमध्ये

 • भारत-पाकिस्तानमधील तणाव दूर व्हावा, यासाठी चीनचे उपपराष्ट्रमंत्री कोंग शुआन्यू इस्लामाबादमध्ये दाखल झाले आहेत. पाकिस्तानने इतर देशांशी चांगले संबंध प्रस्थापित करावेत, यासाठी शूआन्यू पाकिस्तानमधील नेतृत्वाशी चर्चा करतील.
 • चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते लू कांग म्हणाले, ‘भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर उपपरराष्ट्रमंत्री कोंग यांचा पाकिस्तान दौरा आखण्यात आला आहे.
 • पाकिस्तानशी याबाबतीत कोंग संवाद साधतील. भारत आणि पाकिस्तानमध्ये मैत्रिपूर्ण संबंध राहतील, अशी आशा आहे.’
Advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here