Current Affairs 06 March 2019

0
290

भारतीय उत्पादनांवर अमेरिकेचे निर्बंध

 • भारताचा व्यापार अग्रक्रमाचा दर्जा काढून घेण्यासाठी अमेरिकेचे पावले उचलली आहेत. यामुळे भारताकडून अमेरिकेला होणारी ५.६ अब्ज डॉलर्सची निर्यात आता करमुक्त राहाणार नाही.
 • भारतीय उत्पादनांवरील या र्निबधाचा मोठा फटका देशातील लघु आणि मध्यम उद्योगांना बसण्याची भीती असली, तरी या निर्णयाची आम्हाला मोठी झळ बसणार नाही, असा निश्चिंत पवित्रा भारताने घेतला आहे.
 • अमेरिकेला भारताच्या बाजारपेठेत समान आणि व्यवहार्य संधी मिळायला हवी, यासाठी अमेरिका करीत असलेल्या प्रयत्नांना अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने भारताचा व्यापार अग्रक्रम दर्जा देणारी ‘जनरलाइजड् सिस्टिम ऑफ प्रेफरन्सेस’(जीएसपी) ही सवलत रद्द करण्याची पावले उचलली जात आहेत.
 • जीएसपी व्यवस्थेनुसार भारतातील वाहनांचे सुटे भाग, कापड उद्योग यासारख्या दोन हजार उत्पादनांना अमेरिकेत करमुक्त प्रवेश मिळतो.
 • २०१७ मध्ये अमेरिकेत ५.७ अब्ज डॉलर्सच्या भारतीय मालाची करमुक्त आयात केली गेली.

सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांचे नाव

Advertisement
 • सोलापूर विद्यापीठाचा अखेर नामविस्तार झाला असून विद्यापीठाला अहिल्याबाई होळकरांचे नाव देण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. (दि.५) मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
 • सोलापूर विद्यापीठाचे नाव आता ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर’असे करण्यात आले आहे. मात्र, त्यामुळे विद्यापीठाला ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराज यांचे नाव देण्याचा विषय मागे पडला आहे.

मँचेस्टर सिटीची गुंतवणुकीची योजना

 • इंग्लिश प्रीमिअर लीगमधील बलाढय़ समजला जाणारा मँचेस्टर सिटी हा क्लब आता भारतातील फुटबॉल क्लबमध्येही गुंतवणूक करणार आहे. या वर्षांच्या अखेरीस भारतातील फुटबॉल क्लबमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार असल्याचे मँचेस्टर सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी फेरान सोरिआनो यांनी सांगितले.
 • गेल्या वर्षी जमशेदपूर आणि मुंबई सिटी यांच्यातील सामना पाहण्यासाठी आम्ही भारतात आलो होतो. गेल्या आठ महिन्यांपासून सुरू असलेली मुंबई सिटीबरोबरची बोलणी एका वेगळ्या टप्प्यावर गेली आहेत,’ असे मँचेस्टर सिटीच्या पदाधिकाऱ्याने सांगितले.
 • मँचेस्टर सिटीचे मालक अबूधाबीचे शेख मन्सूर यांनी अलीकडेच चीनमधील सिचूआन जिनियू हा क्लब खरेदी केला आहे. त्यांच्याकडे न्यू यॉर्क सिटी, मेलबर्न सिटी, जपानमधील योकोहामा एफ मरिनोस, अ‍ॅटलेटिको टॉक्र्यू तसेच गिरोना या संघांची मालकी आहे.
 • ‘ज्या देशात फुटबॉल हा खेळ लोकप्रिय आहे आणि ज्या देशांत व्यापारासाठी संधी आहे, अशा चीन आणि भारतासारख्या देशांत गुंतवणूक करण्याची आमची योजना आहे.

राष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धेत राजेंद्र बंडबेला सुवर्णपदक

 • केरळमधील कन्नूर येथे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धेत राजेंद्र बंडबे याने 55 किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावण्याचा मान मिळवला आहे. हे यश मिळवणारा तो कोकणातील पहिलाच शरीरसौष्ठवपटू ठरला आहे.
 • रत्नागिरीतील गद्रे मरीन एक्स्पोर्ट्स कंपनीमध्ये सेवेला असलेल्या राजेंद्रने यापूर्वी स्थानिक आणि राज्य पातळीवरील विविध शरीरसौष्ठव स्पर्धामध्ये यश मिळवले होते. पण भारतीय बॉडीबिल्डर्स असोसिएशनतर्फे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत तो प्रथमच उतरला आणि सुवर्णपदकाला गवसणी घातली.

रॉजर फेडररचे शंभरावं विजेतेपद

 • टेनिसचा अनभिषिक्त सम्राट म्हणून ओळख असलेल्या रॉजर फेडररने आपल्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. काही दिवसांपूर्वी दुबई एटीपी टेनिस स्पर्धेत रॉजर फेडररने स्टेफॅनो त्सित्सिपासला 6-4, 6-4 असं पराभूत करत आपल्या कारकिर्दीतलं शंभरावं विजेतेपद पटकावलं.
 • 20 वेळा ग्रँडस्लॅम स्पर्धेची विजेतेपदं जिंकणाऱ्या 37 वर्षीय फेडररने अमेरिकेच्या जिमी कॉनर्सनंतर 100 विजेतेपदं जिंकणारा टेनिसपटू म्हणून फेडररने टेनिसच्या इतिहासात आपला ठसा उमटविला आहे. कॉनर्सच्या खात्यात 109 विजेतेपदं आहेत. त्सित्सिपासविरुद्धच ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये फेडररला चौथ्या फेरीत पराभव स्वीकारावा लागला होता.

२० पैकी १५ प्रदूषित शहरे भारतात

 • जगभरातील सर्वाधिक प्रदूषित २० शहरांपैकी १५ शहरे भारतात असून गुरुग्राम, गाझियाबाद, फरिदाबाद, नोएडा आणि भिवाडी ही शहरे पहिल्या सहा प्रदूषित शहरांमध्ये आहेत. या यादीत दिल्ली ११व्या स्थानी आहे. तर राष्ट्रीय राजधानी परिसर (एनसीआर) हा जगभरातील सर्वाधिक प्रदूषित विभाग ठरला आहे.
 • नपीस आग्नेय आशिया या पर्यावरणाच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या संघटनेच्या सहकार्याने तयार करण्यात आलेल्या आयक्यूएअर एअर व्हिज्युअल २०१८ वर्ल्ड एअर क्वालिटी रिपोर्टमध्ये ही बाब उघड झाली आहे. सर्वाधिक प्रदूषित २० शहरांमध्ये पाकिस्तान आणि बांगलादेशातील ३ शहरांचाही समावेश आहे. या अहवालाने सूक्ष्मधूलिकणांच्या (पीएम२.५) सरासरी प्रमाणावर प्रकाश टाकला आहे. ग्रीनपीस संस्थेने जगातील तीन हजार शहरांचे सर्वेक्षण केले आहे. फिनलँड, ऑस्ट्रेलिया, स्वीडन, इस्टोनिया, आइसलँड हे देश सर्वांत कमी प्रदूषण करीत आहेत.
 • सर्वांत प्रदूषित शहरे वातावरणातील सूक्ष्मधूलिकणांचे सरासरी प्रमाण (पीएम २.५) (मायक्रोग्रॅम क्युबिक मीटरमध्ये)
 • गुरुग्राम -(भारत) १३५.८
 • गाझियाबाद (भारत)१३५.२
 • फैसलाबाद (पाकिस्तान) – १३०.४
 • फरिदाबाद (भारत) -१२९.१
 • भिवाडी (भारत) -१२५.४
Advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here