Current Affairs 06 June 2019

0
179

Budget 2019

 • केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्मचा पहिला अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात त्यांनी इन्कम टॅक्स रिटर्न्स भरण्यासाठी पॅन कार्ड नसल्यास आधार चालू शकणार आहे ही महत्त्वाची घोषणा केली. ब्रिटिशांच्या काळापासून संध्याकाळी पाच वाजता अर्थसंकल्प सादर करण्याची प्रथा होती. मात्र २००१ मध्ये यशवंत सिन्हा यांनी ही परंपरा बदलून ११ वाजता अर्थसंकल्प सादर करण्याची नवी परंपरा सुरू केली. त्यावेळी देशात अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्त्वाखालील एनडीए सरकार होतं.
 • १ रुपया, २ रूपये, ५ रुपये, १० रुपये आणि २० रुपयांचं नाणं आणलं जाणार आहे. अंध व्यक्तींना ही नाणी ओळखता येतील अशा प्रकारची नाणी असणार आहेत.
 • इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी पॅन कार्ड नसल्यास आधार कार्ड महत्त्वाचा आधार ठरणार आहे.
 • पर्यावरणाशी संबंधित उद्योगांना करसवलत दिली जाणार आहे. येत्या काही वर्षात भारत हा देश इलेट्रिक वाहनांचे केंद्र झाला पाहिजे असं आमचं लक्ष्य आहे. जीएसटी परिषदेकडे आम्ही या वाहनांवरचा कर १२ टक्क्यांवरून ५ टक्क्यांवर आणावा अशी शिफारस केली आहे.
 • थेट करांमध्ये गेल्या दोन वर्षांत वाढ झाली आहे. केंद्र सरकारच्या प्रयत्नांमुळे ही वाढ ७८ टक्क्यांपर्यंत झाली आहे.
  स्टार्ट अप इंडियासाठी टीव्ही चॅनल सुरू करणार,याद्वारे तरूणांना मार्गदर्शन दिलं जाणार.
 • सागरमाला आणि भारतमाला हे देशातले महत्त्वाचे प्रकल्प आहेत असं निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. सागरमाला प्रकल्पामुळे जलमार्गांचा विकास होण्यास सुरूवात झाली आहे. तर भारतमला प्रकल्पांमुळे देशाचा विकास होणार आहे.
 • टीसीएस, विप्रो, डीमार्ट या बडय़ा कंपन्यांसह भांडवली बाजारात सूचिबद्ध १,१७४ कंपन्यांमधील प्रवर्तकांना त्यांचे १० टक्के भागभांडवल शुक्रवारी अर्थसंकल्पातून प्रस्तावित घोषणेमुळे सौम्य करावे लागणार आहे

१७ पर्यटन स्थळांच्या विकासामध्ये अजिंठा-वेरुळचा समावेश

 • देशभरातून विकसित होणाऱ्या १७ पर्यटन केंद्रांच्या यादीत केंद्रीय अर्थसंकल्पात अजिंठा आणि वेरुळ लेण्यांसाठी सुमारे ४५८ कोटी रुपयांच्या प्रस्तावित आराखडय़ातील बहुतांश तरतुदी मान्य करण्यात आल्याची माहिती पर्यटन विभागातील वरिष्ठ सूत्रांनी दिली.
 • ‘आयकॉनिक’ पर्यटन स्थळांच्या यादीत अजिंठा व वेरुळ येथील कोणकोणती विकासकामे करायची, याचा प्रस्ताव देण्यात आला होता तो जवळपास मान्य झाला आहे. कोणत्या उपक्रमासाठी किती निधी मंजूर झाला, हे लवकरच समजेल, असे पर्यटन विभागाच्या सचिव विनिता सिंघल यांनी सांगितले.
Advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here