Current Affairs 06 February 2019

0
58

इस्त्रोची आणखी एक भरारी, GSAT-31 उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण

 • भारताचे संदेशवाहक उपग्रह जीसॅट-३१चे (GSAT-31) युरोपीयन कंपनी एरियन स्पेसच्या एरियन रॉकेटने बुधवारी पहाटे अडीचच्या सुमारास फ्रेंच गयाना येथील अंतराळ केंद्रातून यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले.
 • प्रक्षेपणाच्या ४२ व्या मिनिटानंतर ३ वाजून १४ मिनिटांनी उपग्रह जिओ-ट्रान्सफ ऑर्बिटमध्ये स्थापित झाला. या रॉकेटमध्ये भारताच्या जीसॅट-३१ सह सौदी जियो स्टेशनरी उपग्रह १/ हेलास उपग्रह ४ यांचेही प्रक्षेपण करण्यात आले आहेत. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्त्रो) सांगितलेल्या माहितीनुसार, या उपग्रहाचे वजन २५३५ किलोग्रॅम आहे. जीसॅट-३१ ४० वा संदेशवाहक उपग्रह आहे. यामुळे भू-स्थैतिक कक्षेत कू-बँड ट्रान्सपाँडर क्षमता वाढवेल. जीसॅट-३१ चा कार्यकाळ १५ वर्षे आहे.
 • जीसॅट ३१चा वापर व्हीसॅट नेटवर्क, टेलिव्हिजन अपलिंक, डिजिटल सॅटेलाईट, न्यूज गॅदरिंग, डीटीएच टेलिव्हिजन सर्व्हिस आणि इतर सेवांसाठी होईल. त्याचबरोबर हे उपग्रह आपल्या व्यापक बँड ट्रान्सपाँडरच्या मदतीने अरबी सागर, बंगालची खाडी आणि हिंद महासागराच्या विशाल समुद्री क्षेत्राच्यावर संदेशवहनासाठी विस्तृत कव्हरेज देईन.

‘चीन-अमेरिकेतील व्यापार युद्धाचा भारतीय अर्थव्यवस्थेला फायदा’

 • अमेरिका आणि चीन यांच्यात सुरू असलेल्या व्यापार युद्धाचा भारतीय अर्थव्यवस्थेला फायदा होणार असून यामुळे देशाच्या निर्यातीत ३.५ टक्क्यांची तेजी निर्माण होईल, असे संयुक्त राष्ट्राच्या एका अभ्यासात समोर आले आहे. या व्यापार युद्धाचा सर्वाधिक फायदा हा युरोपीयन संघाला होईल. त्यांच्याकडे अतिरिक्त ७० अब्ज डॉलरचा व्यवसाय जाईल, असेही या अभ्यासात म्हटले आहे.
 • यूएन कॉन्फरन्स ऑन ट्रेड अँड डेव्हल्पमेंट (यूएनसीटीएडी) च्या अहवालात म्हटले आहे की, वॉशिंग्टन आणि पेईचिंग यांच्यादरम्यान सुरू असलेल्या टेरिफ युद्धाचा (एकमेकांच्या साहित्यावर शूल्क लावणे) फायदा अनेक देशांना होईल. यामध्ये ऑस्ट्रेलिया, भारत, फिलीपाईन्स, ब्राझील, पाकिस्तान आणि व्हिएतनाम यांचा प्रामुख्याने समावेश आहे.

मराठमोळ्या स्मृती मंधानाला Forbesच्या यादीत स्थान

 • ICC च्या महिला फलंदाजांच्या जागितक क्रमवारीत नुकतेच अव्वल स्थान पटकावणाऱ्या भारताच्या स्मृती मंधानला मानाच्या ‘फोर्ब्स’च्या यादीत स्थान मिळाले आहे.
 • फोर्ब्सकडून भारतातील ‘३० अंडर ३०’ अशी एक यादी तयार करण्यात आली आहे. या यादीत स्मृतीला स्थान देण्यात आले आहे. तसेच आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक कमावणारी हिमा दास, राष्ट्रकुल आणि आशियाई
 • क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणारा नीरज चोप्रा यांचा यादीमध्ये समावेश करण्यात आला आहे. फोर्ब्स इंडियाच्या ’30 अंडर 30’चे हे सहावे वर्ष आहे.
 • या यादीमध्ये खेळाडूबरोबर मनोरंजन क्षेत्र, मार्केटिंग अशा एकूण १६ क्षेत्रांतील मान्यवरांचा गौरव करण्यात आला आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत भारताने २-१ अशा विजय मिळवला आणि स्मृतीने मालिकावीराचा पुरस्कार जिंकला. स्मृतीने २०१८ वर्षाच्या सुरुवातीपासून आतापर्यंत १५ वन-डे सामन्यांत दोन शतकं आणि ८ अर्धशतकं झळकावली. ICCच्या क्रमवारीत स्मृतीने (७५१) ७० गुणांच्या आघाडीसह ऑस्ट्रेलियाच्या एलिसे पेरीला मागे टाकले आहे. ऑस्ट्रेलियाचीच मेग लॅनिंग ७६ गुणांच्या पिछाडीसह तिसऱ्या स्थानावर आहे.

Maharashtra Budget 2019 : २७ फेब्रुवारी रोजी राज्याचा अर्थसंकल्प

 • राज्य विधिमंडळाचं अधिवेशन २५ फेब्रुवारी ते दोन मार्च दरम्यान होणार आहे. २७ फेब्रुवारी रोजी राज्य सरकारकडून संसदेत अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे. आगामी काही दिवसांत होणाऱ्या लोकसभा पाहता एक फेब्रुवारी रोजी केंद्र सरकारने अर्थसंकल्पात मध्यमवर्गीय आणि शेतकऱ्यांसाठी घोषणांचा पाऊस पाडला होता.
 • केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पाच्या धर्तीवर महाराष्ट्रातही घोषणांचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
 • महाराष्ट्राचा २०१८-१९ या वर्षीचा अर्थसंकल्प विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार सादर करतील. सहा महिन्यानंतर होणाऱ्या लोकसभा निवडणुका पाहता फडणवीस सराकरही या अर्थसंकल्पात अनेक तरदुती करू शकते. यामध्ये शेतकरी, दुष्काळी भागाला मदत, जलसंपदा आणि नोकरी यावर भर असण्याची शक्यता आहे.

हॉकी विश्वचषकाच्या आयोजनासाठी भारत पुन्हा उत्सुक!

 • पुढील हॉकी विश्वचषकाच्या आयोजनासाठी भारताने पुन्हा एकदा दावेदारी पेश केली आहे. १३ ते २९ जानेवारी २०२३ मध्ये होणाऱ्या हॉकी विश्वचषक स्पर्धेच्या आयोजनाच्या शर्यतीत एकूण सहा देश असल्याचे आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाने (एफआयएच) जाहीर केले.
 • भारताने २०२३ साली होणाऱ्या पुरुष आणि महिला अशा दोन्ही स्पर्धासाठी आपला दावा केला आहे. मात्र या स्पर्धासाठी सध्या तरी ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड हे देश आघाडीवर आहेत. भारताने गतवर्षी झालेल्या विश्वचषकाचे यजमानपद भूषवले होते.
 • पुढील विश्वचषकासाठी अन्य दावेदारांमध्ये स्पेन, मलेशिया आणि जर्मनी या देशांचा समावेश आहे. ज्या देशांना विश्वचषक आयोजनासाठी दावा करायचा आहे, त्यांनी ३१ जानेवारी २०१९ आधी आपली दावेदारी सादर करावयाची असून ते कोणत्या कालावधीत विश्वचषकाचे आयोजन करू इच्छितात, याबाबतची माहिती नमूद करावयाची आहे.
 • या वर्षीच्या जून महिन्यात या सहा देशांपैकी एका देशाची हॉकी विश्वचषकाच्या आयोजनासाठी निवड केली जाणार आहे. भारताने पुन्हा एकदा हॉकी विश्वचषकासाठी उत्सुकता दर्शवल्यामुळे सलग दुसऱ्यांदा यजमानपदाचे हक्क भारताला मिळतील का, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
Advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here