⁠  ⁠

Current Affairs 06 April 2019

Chetan Patil
By Chetan Patil 4 Min Read
4 Min Read

लघुग्रहाच्या अंगरंगाचा शोध घेण्यासाठी यंत्र पाठवण्यात यश

  • जपानच्या हायाबुसा या शोधक यानाने एका लघुग्रहावर शंकूच्या आकाराचे स्फोटक यंत्र यशस्वीरीत्या पाठवले असून त्याच्या पृष्ठभागावर विवर तयार करून अंतर्गत रचनेचा शोध घेतला जाणार आहे. सौरमाला कशी तयार झाली असावी यावरही त्यामुळे प्रकाश पडणार आहे.
  • ही मोहीम जोखमीची असून जपानच्या अवकाश संस्थेच्या हायाबुसा २ यानाने पृथ्वीवरील जीवसृष्टीच्या आरंभाचा शोध घेण्यासाठी चालवलेल्या अभ्यासाचा एक भाग आहे.
  • हायाबुसा २ वरून शंकूच्या आकाराचे एक स्फोटक यंत्र पाठवण्यात आले. त्यावेळी हायाबुसा यान रुगु या लघुग्रहापासून १६०० फूट म्हणजे ५०० मीटर उंचीवर होते. हे स्फोटक यंत्र तेथे पडल्यानंतर चाळीस मिनिटांनी त्याचा स्फोट होऊन तेथे विवर तयार होईल.
  • हा लघुग्रह पृथ्वीपासून ३० कोटी किलोमीटर अंतरावर असून हायाबुसा २ यानाने हे स्फोटक यंत्र अंतराळ कचऱ्याशी टक्कर चुकवून अचूकपणे लघुग्रहावर पाठवले आहे.
  • रूगू या लघुग्रहाची निर्मिती ४.६ अब्ज वर्षांपूर्वी म्हणजे सौरमालेच्या जन्मावेळची असून त्यात मोठय़ा प्रमाणवर कार्बनी पदार्थ व पाणी आहे असे समजले जाते त्यामुळे त्याच्या या संशोधनाला विशेष महत्त्व आहे

UPSC परीक्षेत कनिष्क कटारिया देशात पहिला:

  • केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात UPSC 2018 चा निकाल जाहीर झाला आहे. या परिक्षेत कनिष्क कटारिया देशात पहिला आला आहे. तर मध्यप्रदेशातील भोपाळमध्ये राहणारी मराठमोळी सृष्टी देशमुख देशात पाचवी आली आहे. upsc-result-2018
  • पहिल्या पन्नास क्रमांकात महाराष्ट्रातले चार विद्यार्थी आहेत. तृप्ती धोडमिसे 16वी, वैभव गोंदणे 25वा, मनिषा आव्हाळे 33वी आणि हेमंत पाटील 39वा क्रमांक मिळवून उत्तीर्ण झाले आहेत.
  • तर देशभराचा विचार करता, या परिक्षेत कनिष्क कटारिया पहिला, अक्षत जैन दुसरा, जुनैद अहमद तिसरा, श्रेयांस कुमत चौथा आणि सृष्टी देशमुख पाचवी आली आहे.

स्मार्ट सिटी यादीत नाशिक २३ व्या स्थानी

  • केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटीच्या यादीत देशपातळीवर नाशिक 23 व्या क्रमांकावर आले आहे. विशेष म्हणजे पहिल्या 25 शहरांमध्ये पाच शहरे ही महाराष्ट्रातील असून, 367 गुण मिळवत नागपूरने देशात अव्वल क्रमांक पटकविला आहे.
  • केंद्र सरकार देशभरातील 100 शहरांना स्मार्ट रूप देण्याचे काम करीत आहेत. या शहरांमध्ये विविध पायाभूत सुुविधांसह उच्च प्रतीच्या सोयी-सुविधा देण्यावर भर आहे.
  • दरम्यान, स्मार्ट सिटीत नागपूर मनपा अग्रेसर असून, त्यांना विविध विभागांमध्ये 368 गुण मिळाले आहेत. नागपूर देशात अव्वल ठरले आहे. याव्यतिरिक्त अमरावती 214 गुणांसह दहाव्या स्थानी तर 213.5 गुणांसह पुणे 11 व्या स्थानी आहे. तसेच पिंपरी-चिंचवड शहराने 166.61 गुण मिळवत या यादीत 19 वा क्रमांक प्राप्त केला आहे.

भारतीय लष्कराचा पराक्रम

  • भारतीय लष्कराने लडाख येथील लेहजवळ सिंधू नदीवर सर्वात लांब झुलता पूल बांधला आहे.
  • लडाखमधील दूर्गम भागातील गावांना जोडणारा हा पूल २६० फूट लांबीचा आहे. या पूलाचे नाव ‘मैत्री पूल’ असे ठेवण्यात आले आहे. या पुलामुळे चोगलामसर, स्टोक आणि चुचोट गावे लडाखच्या मुख्य भागांना जोडली गेली आहेत.
  • या पूलाचे उद्घाटन १ एप्रिल रोजी झाले. हा पूल लष्करातील लडाऊ अभियंत्रिक दलाच्या ‘साहस और योग्यता’ रेजिमेंटने बांधला आहे. हा पूल अवघ्या ४० दिवसांमध्ये बांधण्यात आला असून इतक्या कमी वेळात एवढ्या लांबीचा झुलता पूल बांधणे हा एक विक्रमच आहे.

संगीत अभ्यासक, लेखिका कल्याणी किशोर यांचे निधन

  • संगीत, साहित्य आणि अध्यात्म अशा विविध क्षेत्रांतील अभ्यासू व्यक्तिमत्त्व असलेल्या प्रा. कल्याणी किशोर यांचे शुक्रवारी पहाटे झोपेतच निधन झाले. त्या ७७ वर्षांच्या होत्या.
  • कल्याणी किशोर यांनी कथा, कादंबरी, कविता, समीक्षण, चरित्र आदी स्वरूपाचे लेखन केले आहे. त्यांचे सूर्यगंध, कवितेचा दिवस हे काव्यसंग्रह आणि राजनंदिनी ही कादंबरी प्रसिद्ध आहे. जगप्रसिध्द तत्त्वज्ञ जे. कृष्णमूर्ती यांच्या चरित्राचा व अन्य ग्रंथांचा त्यांनी मराठीत अनुवाद केला होता. श्री दत्ता बाळ, संत आनंदमयी माँ यांचे चरित्रलेखन कल्याणी किशोर यांनी केले होते. गानतपस्विनी मोगुबाई कुर्डीकर यांचे त्यांनी लिहिलेले चरित्र संगीत क्षेत्रात खूपच गाजले. त्या उत्तम खेळाडू, उत्कृष्ट चित्रकार म्हणूनही प्रसिद्ध होत्या.
Share This Article