⁠  ⁠

Current Affairs 05 Jully 2019

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

हिमा दासची पोलंडमध्ये ‘सुवर्ण’ कामगिरी

  • भारतीय स्टार धावपटू हिमा दासने पोलंडमध्ये पार पडलेल्या पोन्जान अॅथलेटिक्स ग्रँड प्रिक्स स्पर्धेत सुवर्णपदक जिंकलं आहे. २०० मीटर स्पर्धेत हिमा दासने हे सुवर्णपदक पटकावलं. हिमा दासने ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली. हिमा दासने २०० मीटर अंतर केवळ २३.६५ सेकंदांमध्ये पूर्ण करत सुवर्णपदक आपल्या नावावर केलं.
  • ४०० मीटर स्पर्धेतील वर्ल्ड ज्युनिअर चॅम्पिअन आणि नॅशनल रेकॉर्ड आपल्या नावे असणारी हिमा दास गेल्या काही महिन्यांपासून पाठीच्या दुखण्याने त्रस्त होती. मात्र स्पर्धेत तिने पुनरागन करत फक्त २३.६५ सेकंदांमध्ये २०० मीटर अंतर पार केलं.
    हिमा दासने सहभाग घेतलेला ही वर्षातील पहिलीच स्पर्धात्मक रेस होती.

मोदी २.० चा पहिलाच अर्थसंकल्प आज

  • केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन शुक्रवारी लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प सादर करणार आहेत.
  • यंदाच्या अर्थसंकल्पात १० कोटींपेक्षा अधिक उत्पन्न असणाऱ्यांवर ४० टक्क्यांपर्यंत कर लागू शकतो. त्याशिवाय नोकरदार वर्गासाठी आयकर उत्पन्नाच्या कर रचनेत बदल करण्यात येऊ शकतो. २०१९-२० च्या अंतरिम अर्थसंकल्प पाच लाखांच्या उत्पन्नावर सवलत देण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. सध्या २.५ लाख ते ५ लाख उत्पन्नावर ५ टक्के, ५ ते १० लाखाच्या उत्पन्नावर २० टक्के आणि १० लाखाहून अधिक उत्पन्न असणाऱ्यांवर ३० टक्के कर आहे.

Share This Article