Current Affairs 04 May 2019

0
266

राज्य बास्केटबॉल संघटनेची धुरा सुकाणू समितीकडे

 • राज्य बास्केटबॉल असोसिएशनच्या वैधतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आल्यानंतर खेळाडूंच्या भविष्याचा विचार करून भारतीय
  बास्केटबॉल महासंघाने सुचवल्यानुसार उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने त्रिसदस्यीय सुकाणू समिती स्थापन केली आहे. या समितीचे
  अध्यक्ष चंदेर मुखी शर्मा आणि सदस्य भूपिंदर शाही, मनदीप गरेवाल आहेत. या समितीकडे राज्यातील बास्केटबॉलची धुरा सोपवण्यात
  आली आहे.

अभिमानास्पद! इस्रोच्या माजी संचालकांना फ्रान्सकडून सर्वोच्च नागरी सन्मान

 • इस्रोचे माजी संचालक ए. एस. किरण कुमार यांचा फ्रान्सनं सर्वोच्च नागरी पुरस्कारानं सन्मान केला आहे. ‘शेवेलियर डी लॉर्ड नेशनल डी
  ला लिगियन डी ऑनर’ नावानं हा सन्मान ओळखला जातो.
 • भारत आणि फ्रान्समधील अंतराळ सहकार्य वाढवण्यात मोलाचं योगदान दिल्याबद्दल कुमार यांचा गौरव करण्यात आला. फ्रान्सच्या
  राष्ट्रपतींच्या वतीनं फ्रान्सचे भारतातले राजदूत ऍलेक्झांडर जिगलर यांनी कुमार यांना सन्मानित केलं.
 • 2015 ते 2018 या काळात इस्रोचं संचालक म्हणून काम करताना त्यांनी ऐतिहासिक भूमिका बजावली.
 • ‘शेवेलियर डी लॉर्ड नेशनल डी ला लिगियन डी ऑनर’ पुरस्काराला खूप मोठा इतिहास आहे. 1802 मध्ये नेपोलियन बोनापार्ट यांनी या
  पुरस्काराची सुरुवात केली. हा फ्रान्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे.
 • देशासाठी विशेष कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार दिला
  जातो. फ्रान्सशिवाय इतर देशांच्या नागरिकांनादेखील या पुरस्कारानं गौरवण्यात येतं.

अमेरिकेने वाढवला भारताचा तेलपुरवठा

 • इराणकडून तेल खरेदीवर निर्बंध आल्यामुळे भारतात तेलाचे भाव वाढण्याची भीती असताना अमेरिकेने भारताला मोठा दिलासा दिला आहे.
 • अमेरिकेने भारताला जवळपास दोन दशलक्ष बॅरलपेक्षा जास्त तेल निर्यात करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे भारतातील संभाव्य
  टंचाईला मोठ्या प्रमाणावर तोंड देता येईल.
 • अमेरिकेकडून भारताला निर्यात वाढणार हे पाहता आखाती देशांतही तेलाच्या भावात घट व्हायला सुरुवात झाली आहे.
 • अमेरिकेने भारताला अतिरिक्त २ दशलक्ष बॅरल तेल देण्यासाठी उचललेल्या पावलांना पाहता आखाती देशांनी तेलाचे भाव कमी केले आहेत.
 • रशियासोबत रुबल-रुपयात व्यवहार सुरू करण्यावर विचार. असे झाल्यास तेलाचा मोठा बाजार भारतासाठी उपलब्ध होऊ शकतो.
 • चीनसोबतही तेल मागविण्यासाठी प्रयत्न सुरू.दक्षिण आफ्रिकी देशांकडून तेल आयात वाढविण्यावर विचार.

देशातील बेरोजगारीचा दर वाढला

 • देशात बेरोजगारीचा दर सातत्याने वाढत आहे. मार्च 2019 मध्ये देशात बेरोजगारीचा दर 6.7 टक्के इतका होता. त्यामध्ये आता वाढ
  होऊन एप्रिल 2019 मध्ये भारतातील बेरोजगारीचा दर 7.6 टक्क्यांवर पोहोचला आहे. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी
  (सीएमआयई) या संस्थेने यासंबधीची आकडेवारी जाहीर केली आहे.
 • डिसेंबर 2018 मध्ये बेरोजगारीच्या दरासंदर्भातील आकडेवारी लिक झाली होती. त्यामध्ये म्हटले होते की, वर्ष 2017-18 मध्ये देशात
  गेल्या 45 वर्षातील सर्वाधिक बेरोजगारीची नोंद झाली आहे. तसेच त्यामध्ये म्हटले होते की, नोव्हेंबर 2016 मध्ये नोटबंदी लागू
  केल्यानंतर देशभरात बेरोजगारी वाढू लागली. 2017-18 मध्ये तब्बल 1 कोटी 10 लाख लोकांनी त्यांचा रोजगार गमावला आहे.
Advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here