Current Affairs 04 March 2019

0
388

‘स्पेस एक्स’चे यान अवकाश स्थानकावर

 • ‘स्पेस एक्स’ या खासगी अवकाश कंपनीने २४ तासांमध्ये दोन वेळा इतिहास रचला आहे. आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाला यशस्वीपणे हे यान जोडले गेले असून, अवकाश स्थानकातील अंतराळवीरांनी या यानामध्ये प्रवेश करून पाहणी केली. आता काही महिन्यांमध्ये दोन अंतराळवीरांसह कुपी अवकाशात झेपावेल, असे सांगण्यात आले.
 • अंतराळवीरांना आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकापर्यंत घेऊन जाणाऱ्या ‘ड्रॅगन’ या ‘स्पेस-एक्स’च्या छोटेखानी यानाची यशस्वी चाचणी पार पडली. सुरुवातीला अंतराळवीर नसलेल्या हे यानाने एक दिवस अगोदर उड्डाण केले होते.
 • आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकामध्ये तीन अंतराळवीर असून, यान अवकाश स्थानकाला जोडताच दोन तासांनी त्यांनी आत प्रवेश करत पाहणी केली. ‘अवकाश मोहिमांमधील नवी पिढी ‘ड्रॅगन’च्या रुपाने कार्यरत झाली आहे.

भारतीय वैमानिक अभिनंदन यांना पहिला ‘भगवान महावीर अहिंसा पुरस्कार’

Advertisement
 • भारतीय वैमानिक अभिनंदन वर्धमान यांना पहिला भगवान महावीर अहिंसा पुरस्काराने सन्मानीत करण्यात येणार आहे. अखिल भारतीय दिगंबर जैन महासमिती द्वारे सुरू करण्यात आलेल्या भगवान महावीर अहिंसा पुरस्कारावर नाव कोरणारे पहिले व्यक्ति आहेत.
 • भारतीय हवाई दलाने पाकिस्तानची एफ १६ विमाने पिटाळून लावल्यानंतर मिग २१ विमान पाकिस्तानी हद्दीत कोसळून विंग कमांडर अभिनंदन यांना पाकिस्तानने ताब्यात घेतले होते. नंतर त्यांची सुटका करण्यात आली.
 • संघटनेच्या महाराष्ट्र युनिटचे संयोजक पार लोहाडे यांनी सांगितले की, संघटनेचे अध्यक्ष मनिंदर जैन यांनी नवी दिल्लीतील लष्करी विमानाचे पायलट यांना हा पुरस्कार जाहीर केला. या पुरस्काराखाली भारतीय वैमानिक अभिनंदन 2.51 लाख रुपयांचा रोख रक्क्म देण्यात येणार असून स्मृती चिन्ह आणि स्मरणपत्र देवून सन्मानीत करण्यात येणार आहे. 17 एप्रिल रोजी महावीर जयंतीच्या प्रसंगी भारतीय वैमानिक अभिनंदन यांना या पुरस्कारे गौरविण्यात येणार आहे.

कुंभमेळा २०१९ ची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद

 • एका स्थानी सर्वाधिक गर्दी, सगळ्यात मोठं स्वच्छता अभियान आणि सगळ्यात मोठा चित्रकला कार्यक्रम यासह यंदाचं प्रयागराज कुंभ मेळा 2019 ने गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवलं आहे.
 • ‘२८ फेब्रुवारीला जवळपास ५०३ शटल बसेस, लोकांना आणण्यासाठी राजमार्गावर धावत होती. एक मार्चला या कार्यक्रमात अनेक लोकांनी हजेरी लावली. कुंभच्या स्वच्छतेसाठी १० हजार लोकांनी योगदान दिलं. सगळ्यांनी एकत्र आपलं कर्तव्य पार पाडलं.’

भारतीय वस्तूंवर २५ टक्के आयात कर लावण्याचा ट्रम्प यांचा इशारा

 • भारत हा सर्वाधिक आयात कर लादणारा देश आहे, अशी टीका अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली असून अमेरिकेत येणाऱ्या भारतीय वस्तूंवरही तसाच जास्तीचा आयात कर लागू करण्याचा विचार करीत आहोत असा इशारा दिला आहे.
 • भारतीय वस्तूंवर आम्ही जशास तसे न्यायाने १०० टक्के कर लादणार नाही, पण निदान २५ टक्के कर लागू करू असे त्यांनी स्पष्ट केले. त्यांच्या या प्रस्तावाला सिनेटमध्ये विरोध आहे, त्यामुळे त्यांनी समर्थकांना पाठिंब्यासाठी आवाहन केले.
 • भारताने हार्ले डेव्हिडसन मोटरसायकलींवरील कर १०० टक्क्य़ांवरून ५० टक्के केला आहे, त्यामुळे आपण समाधानी आहोत. आमच्या मोटरसायकलवरचा कर पन्नास टक्के कमी करण्यात यश आले आहे. पण तरी अमेरिकी मोटरसायकलवर ५० टक्के कर व भारतीय मोटरसायकलवर २.४ टक्के कर अशी परिस्थिती अजून कायम आहे. खरेतर भारतीय वस्तूंवर शंभर टक्के कर लादायला हवा, २५टक्के कर लावतो म्हटले.

२०२२च्या ‘एशियाड’मध्ये क्रिकेटचे पुनरागमन

 • हँगझोऊ (चीन) येथे २०२२ मध्ये होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेत क्रिकेटचे पुनरागमन होईल, अशी माहिती आशियाई ऑलिम्पिक परिषदेने रविवारी दिली आहे. आशियाई ऑलिम्पिक परिषदेच्या सर्वसाधारण सभेत हा निर्णय घेण्यात आला.
 • ‘‘२०२२च्या हँगझोऊ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी निश्चित करण्यात आलेल्या क्रीडा प्रकारांमध्ये क्रिकेटचा समावेश करण्यात आला आहे,’’ अशी माहिती आशियाई ऑलिम्पिक परिषदेचे उपाध्यक्ष रणधीर सिंग यांनी दिली.
 • क्रिकेटचा आगामी आशियाई क्रीडा स्पर्धेत समावेश निश्चित मानला जात होता. आतापर्यंत २०१०च्या ग्वांगझोऊ आणि २०१४च्या इन्चॉन ‘एशियाड’मध्ये क्रिकेटचा समावेश करण्यात आला होता. मात्र २०१८च्या जकार्ता ‘एशियाड’मध्ये क्रिकेटला वगळण्यात आले होते. १९९८ मध्ये झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत क्रिकेटचा समावेश करण्यात आला होता. त्या वेळी भारताने आपला दुय्यम संघ क्वालालम्पूर येथे पाठवला होता. शॉन पोलॉकच्या नेतृत्वाखालील दक्षिण आफ्रिकेने सुवर्णपदक आणि स्टीव्ह वॉ याच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने रौप्यपदक जिंकले होते.

बजरंगकडून सुवर्णपदक अभिनंदनला समर्पित

 • रूस (बल्गेरिया) येथे झालेल्या डॅन कोलोव्ह-निकोला पेट्रोव्ह कुस्ती स्पर्धेत मिळवलेले सुवर्णपदक बजरंग पुनियाने भारतीय हवाई दलाचा विंग कमांडर अभिनंदन वर्धमानला समर्पित केले आहे.
 • जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील रौप्यपदक विजेत्या पुनियाने हंगामाचा दिमाखदार प्रारंभ करताना ६५ किलो वजनी गटात अमेरिकेच्या जॉर्डन ऑलिव्हरचा १२-३ असा पराभव केला. या स्पर्धेद्वारे त्याने क्रमवारीतील गुणांचीसुद्धा कमाई केली आहे.
 • २०१०मध्ये पॅरिस येथे झालेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत पदक मिळवण्यात अपयशी ठरलेल्या पुनियाने त्यानंतरच्या १० स्पर्धामध्ये पदके मिळवली आहेत.
 • पुरुषांच्या फ्रीस्टाईल प्रकारात संदीप तोमरला ६१ किलो गटात रौप्यपदकाची आशा आहे.

युनियन बँकेकडून व्याजदरांत कपात

 • सार्वजनिक क्षेत्रातील युनियन बँकेने ‘एमसीएलआर’वर आधारित व्याजदरात ०१.० टक्क्यांची घट केल्याची नुकतीच घोषणा केली. ही घट विविध कालावधींच्या कर्जांवर असल्याचेही बँकेतर्फे स्पष्ट करण्यात आले. नवीन दरांच्या अंमलबजावणीला एक मार्चपासूनच सुरुवात झाली आहे. त्यामुळे एक वर्षाच्या कर्जावरील व्याजदर ८.७० टक्क्यांवरून ८.६० टक्क्यांवर आला आहे.
 • सद्य परिस्थितीत सर्व प्रकारच्या कर्जांवरील व्याजदर ०.१० टक्क्यांनी घटविण्यात आला आहे. सहा महिने कालावधीच्या कर्जावरील व्याजदर ८.५० टक्के आणि दोन वर्षांसाठीच्या कर्जावरील व्याजदर ८.७० टक्के करण्यात आला आहे

‘महा’बँकेला केंद्राचा पुरस्कार

 • केंद्र सरकारतर्फे देण्यात येणाऱ्या ‘एन्हान्स्ड अॅक्सेस अँड सर्व्हिस एक्सलन्स’ अर्थात ‘ईझ’ या बँकिंग क्षेत्रातील सुधारणा पुरस्काराने ‘बँक ऑफ महाराष्ट्र’ला नुकतेच गौरवण्यात आले. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला.
 • ‘ईझ’ हा केंद्र सरकारचा उपक्रम असून, सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या सुधारणेबाबत ‘भारतीय बँक्स संघटने’च्या (आयबीए) माध्यमातून सरकारी बँकांसाठी राबविण्यात आला. ‘आयबीए’ने या कामासाठी बोस्टन कन्सल्टन्सी ग्रुप (बीसीजी) या संस्थेची नियुक्ती केली होती. ‘
Advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here