⁠  ⁠

Current Affairs 04 June 2019

Chetan Patil
By Chetan Patil 3 Min Read
3 Min Read

सर्वोच्च न्यायालयाचे निकाल आता मराठीतूनही

  • सर्वोच्च न्यायालयाचे इंग्रजी भाषेतील निकाल आता प्रादेशिक भाषेत वाचायला मिळणार आहेत. सर्वोच्च न्यायालय एका सॉफ्टवेअरचे लवकरच अनावरण करत असून त्याद्वारे सर्वोच्च न्यायालयाचे निकाल देशभरातील प्रादेशिक भाषांमध्ये भाषांतरीत केले जाणार आहेत.
  • सर्वोच्च न्यायालयाच्या या सेवेमुळे मराठीमध्येही सर्वोच्च न्यायालयाचे निकाल उपलब्ध होतील. या सेवेचा प्रारंभ करण्याबाबतची प्रक्रिया सुरू असून हे अ‍ॅप गुगलच्या भाषांतराच्या अ‍ॅपप्रमाणेच असेल. ते एकाचवेळी सगळ्या प्रादेशिक भाषांमध्ये निकाल भाषांतरित करेल.
  • सरन्यायाधीश रंजन गोगोई यांची ही कल्पना असून त्यांनी या संदर्भात न्यायमूर्ती एस. ए. बोबडेंसह सर्वोच्च न्यायालयातील पत्रकारांशी मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात औपचारिक चर्चा केली होती. या वेळी निकाल भाषांतरित करण्याची कल्पना प्रत्यक्षात आणण्याचे ठरले.

‘चांद्रयान-२’चं प्रक्षेपण प्रत्यक्षात पाहण्याची संधी, जाणून घ्या कशी कराल नाव नोंदणी

  • भारताचा महत्वकांशी प्रकल्प असणारे चांद्रयान-२ लवकरच आकाशात झेपावण्यास तयार आहे. लाँचिंगसाठी तयार आहे. १५ जुलै रोजी रात्री २ वाजून ५१ मिनिटांनी ‘चांद्रयान-२’ चं आंध्र प्रदेशमधल्या श्रीहरीकोटामधून येथून प्रक्षेपण होणार आहे. इस्त्रोमार्फत करण्यात येणाऱ्या या लॉचिंगचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे हे लॉचिंग सर्वसामन्यांना श्रीहरीकोटा येथून प्रत्यक्षात पाहण्याची संधी मिळणार आहे. मात्र यासाठी ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करणे आवश्यक आहे.
  • ‘चांद्रयान-२’ चं लॉचिंग पाहण्यासाठी आज रात्री १२ वाजल्यापासून म्हणजेच ४ जून सुरु होताच नावनोंदणी सुरु होणार आहे. विशेष म्हणजे यासाठी इस्त्रोकडून कोणत्याही पद्धतीचं शुल्क किंवा तिकीट आकारण्यात येणार नाही. श्रीहरीकोट्टा येथील दोन लॉचिंग पॅडपैकी एकावरुन हे प्रक्षेपण होणार आहे. याच लॉचिंग पॅडपासून काही अंतरावर असलेल्या मैदानासारख्या रॉकेट स्पेस थीम पार्कमधून हे लॉचिंग साध्या डोळ्यांनी पाहता येणार आहे. इस्त्रोच्या ट्विटवर हॅण्डलवरुन यासंदर्भात ट्विट करण्यात आले आहे.

भारताला नाटो देशांचा दर्जा मिळणार; अमेरिकेच्या संसदेची विधेयकाला मंजुरी

  • अमेरिकेच्या संसदेने भारताला नाटो देशांच्या समान दर्जा देणारे विधेयक मंजुर केले आहे. त्यामुळे आता संरक्षण क्षेत्राशी निगडीत व्यवहारांमध्ये अमेरिका भारताबरोबर आपले नाटोचे सहकारी देश इस्त्रायल आणि दक्षिण कोरिया यांच्याप्रमाणे व्यवहार करेल. आर्थिक वर्ष 2020 साठी नॅशनल ‘डिफेन्स ऑथरायझेशन अॅक्ट’ला अमेरिकेच्या सिनेटने गेल्या आठवड्यातच मंजुरी दिली होती. त्यानंतर आता या विधेयकातील संशोधनाच्या प्रस्तावालाही मंजुरी देण्यात आली आहे.
  • सिनेटर जॉन कॉर्निन आणि मार्क वॉर्नर यांनी अमेरिकेच्या संसदेत हे विधेयक सादर केले होते. भारताबरोबर परस्पर सहकार्य, दहशतवादाविरोधात लढा, काऊंटर पायरसी आणि समुद्री सुरक्षेवर भारताबरोबर काम करण्याची आवश्यकता असल्याचे यात नमूद करण्यात आले होते.
  • दरम्यान, हे विधेयक मंजुर झाल्यानंतर हिंदू अमेरिकन फौडेशनने सेनेटर कॉर्निन आणि वॉर्नर यांचे अभिनंदन केले. नाटो देशांच्या यादीत भारताला समावून घेणे हा महत्त्वाचा निर्णय आहे.

Share This Article