⁠  ⁠

चालू घडामोडी : ०४ डिसेंबर २०१९

Chetan Patil
By Chetan Patil 6 Min Read
6 Min Read

Current Affairs 04 December 2019

एक देश, एक रेशन कार्ड योजनेची १ जूनपासून अंमलबजावणी

स्थलांतरित कामगार आणि रोजंदारी मजूर यांचा प्रामुख्याने समावेश असलेल्या ‘एक देश एक रेशन कार्ड’ योजनेची १ जून २०२० पासून अंमलबजावणी करण्यात येणार आहे, असे केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी मंगळवारी येथे सांगितले.
या योजनेनुसार पात्र लाभार्थ्यांला राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यानुसार देशातील कोणत्याही रास्त भावाच्या दुकानातून त्याच्याकडे असलेल्या रेशन कार्डचा वापर करून अन्नधान्य घेता येणार आहे. बायोमेट्रिक अथवा आधार वैधतेनंतर अन्नधान्य उपलब्ध करून दिले जाणार आहे, असे ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरणमंत्री पासवान यांनी लोकसभेत स्पष्ट केले.
या योजनेचा लाभ मुख्यत्वे स्थलांतरित कामगार, रोजंदारी मजूर यांना होणार आहे, हा वर्ग रोजगारासाठी सातत्याने देशभरात फिरतीवर असतो.

विक्रमी सहाव्यांदा मेसीने जिंकला गोल्डन बॉल

16 2

अर्जेंटिनाचा सुपरस्टार व बार्सिलोना फुटबॉल क्लबचा फॉरवर्ड लिओनेल मेसीने विक्रमी सहाव्यांदा बार बॅलन जी ओर अवाॅर्ड (गोल्डन बॉल) जिंकला. पॅरिसमध्ये एका समारंभात हा पुरस्कार देण्यात आला. मेसीने फुटबॉलच्या इतिहासात सर्वाधिक वेळा हा पुरस्कार मिळवला आहे.त्याने २०१८-१९ या सत्रातील सामन्यामध्ये अापल्या क्लब अाणि राष्ट्रीय संघासाठी एकूण ५४ गाेल केले अाहेत. याशिवाय त्याने लीगाचा किताब मिळवून दिला.

दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धा : भारताची २७ पदकांची लयलूट

Untitled 2 3

भारताने दक्षिण आशियाई क्रीडा स्पध्रेच्या दुसऱ्या दिवशी अ‍ॅथलेटिक्स आणि नेमबाजी या क्रीडा प्रकारांमध्ये वर्चस्व गाजवत ११ सुवर्णपदकांसह एकूण २७ पदकांची लयलूट केली आहे. त्यामुळे गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर असणाऱ्या भारताच्या खात्यावर १८ सुवर्ण, १६ रौप्य आणि ९ कांस्यपदकांसह एकूण ४३ पदके जमा आहेत. पहिल्या स्थानावरील यजमान नेपाळच्या खात्यावर ४४ पदके (२३ सुवर्ण, ९ रौप्य आणि १२ कांस्य) जमा आहेत.
भारताच्या नेमबाजांनी महिलांच्या १० मीटर एअर रायफल प्रकारातील सर्व पदकांवर वर्चस्व गाजवले.
भारताने या प्रकारात सांघिक सुवर्णपदकसुद्धा प्राप्त केले. १९ वर्षीय मेहुलीने अंतिम फेरीत २५३.३ गुण मिळवले. श्रीयांका सादंगीने (२५०.८ गुण) रौप्य तर श्रिया अगरवालने (२२७.२ गुण) कांस्यपदक पटकावले.
अ‍ॅथलेटिक्स क्रीडा प्रकारात भारताने मंगळवारी चार सुवर्णपदकांसह एकूण १० पदके जिंकली.
अर्चना सुशींद्रन (महिला १०० मीटर), एम. जश्ना (महिला उंच उडी), सर्वेश कुशारे (पुरुष उंच उडी) आणि अजय सरोज (पुरुष १५०० मीटर) यांनी सुवर्णपदके पटकावली. भारताने १५०० पुरुषांच्या शर्यतीत एक सुवर्ण आणि एक रौप्यपदक पटकावले, तर महिलांच्या १५०० मीटर शर्यतीत एक रौप्य आणि एक कांस्यपदक मिळवले. पुरुषांमध्ये अजय कुमार सारोने ३.५४.१८ सेकंद वेळ नोंदवत सुवर्णपदकजिंकले, तर अजित कुमारने (३.५७.१८ सेकंद) रौप्यपदक मिळवले. महिलांमध्ये चंदाने (४.३४.५१ सेकंद) रौप्य आणि चित्रा पलकीझने (४.३५.४६ सेकंद) कांस्यपदक मिळवले.

अभिनंदन! वायू दलाचा गेम गुगल अवॉर्ड्स यादीत

72354758

बालाकोट हवाई हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमध्ये उडालेल्या हवाई धुमश्चक्रीदरम्यान शत्रूला सळो की पळो करून सोडणारे भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्तमान यांच्यावर आलेल्या व्हिडिओ गेमचा गुगल अवॉर्ड्सच्या टॉप यादीत समावेश करण्यात आला आहे. भारतीय वायूसेनेकडून लाँच करण्यात आलेला स्मार्टफोन गेम आता गुगल प्ले स्टोरच्या बेस्ट ऑफ २०१९ अवॉर्ड्ससाठी नॉमिनेट करण्यात आला आहे.

चालू दशक ठरणार सर्वात उष्ण

72353482

आतापर्यंतच्या इतिहासामध्ये २०१०चे दशक सर्वांत उष्ण ठरण्याची शक्यता आहे, असे जागतिक हवामानशास्त्र संघटनेने जाहीर केले आहे. या वर्षी जगात सर्वत्रच हवामानामध्ये बदल दिसून आले असून, नैसर्गिक आपत्तीचे प्रमाण वाढल्याकडेही लक्ष वेधण्यात येत आहे.
२०१९ सर्वोच्च पातळीवर

  • २०१९मध्ये औद्योगिक क्रांतीपूर्व काळापेक्षा सरासरी १.१ अंश सेल्सिअस जास्त तापमान नोंदविण्यात आल्याचे जागतिक हवामानशास्त्र संघटनेने जाहीर केले आहे.
  • २०१९ हे वर्ष इतिहासातील पहिल्या तीन सर्वाधिक उष्ण वर्षांमध्ये असल्याचीही नोंद झाली आहे.
  • खनिज तेलांचे ज्वलन, पायाभूत सुविधांची उभारणी, शेतीचे प्रमाण आणि मालवाहतूक यांतून होणाऱ्या उत्सर्जनामुळे २०१९मध्ये वातावरणातील कार्बनच्या प्रमाणाचा उच्चांक होण्याची शक्यता आहे.
  • वातावरणातील ९० टक्के उष्णता महासागर शोषून घेत असतो. मात्र, सध्या महासागरांचे तापमान आतापर्यंतच्या उच्चांकी स्थितीला आहे.
  • समुद्रांतील आम्लाचे प्रमाण गेल्या १५० वर्षांपूर्वीच्या तुलनेत २५ टक्क्यांनी वाढले आहे. यामुळे, सागरी जीवसृष्टीला खूप मोठा धोका असून, अन्न व रोजगारासाठी सागरावर अवलंबून असणाऱ्या कोट्यवधी नागरिकांना त्याचा फटका बसू शकतो.
  • समुद्रपातळी ऑक्टोबरमध्ये सर्वोच्च पातळीला पोहोचली होती. यातच, ग्रीनलँडमधील ३२९ अब्ज टन बर्फ गेल्या १२ महिन्यांमध्ये वितळला आहे. त्याचा परिणाम दिसत आहे.

‘स्वच्छता रँकिंग’मध्येसिम्बायोसिस’ला स्थान

72356380

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने जाहीर केलेल्या ‘स्वच्छता रॅकिंग’मध्ये पुण्यातील सिम्बायोसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ आणि पिंपरी-चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगने स्थान पटकावले आहे.
मात्र, देशात शिक्षणात १०व्या क्रमांकावरील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने या स्पर्धेत सहभागच घेतला नसल्याची माहिती पुढे आली आहे. यासोबतच नाशिकच्या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाने अनिवासी विद्यापीठांच्या (यूजीसी) यादीत चौथे स्थान पटकावले आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांच्या हस्ते तिसऱ्या स्वच्छता रँकिंग पुरस्कारांचे वितरण मंगळवारी नवी दिल्लीत करण्यात आले.
यंदाच्या स्वच्छता रँकिंगसाठी विद्यापीठ अनुदान आयोग (यूजीसी) आणि अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई) एकूण नऊ गटांमध्ये ४८ विद्यापीठे आणि कॉलेजांची निवड केली आहे. निवासी विद्यापीठांच्या प्रवर्गात पुण्यातील सिम्बायोसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीने तिसरा, तर डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाने नववा क्रमांक मिळवला आहे. पहिल्या क्रमांकावर कोनेरू लक्ष्मी एज्युकेशन फाउंडेशनचे विद्यापीठ आहे. यासोबतच ‘एआयसीटीई’च्या अंतर्गत येणाऱ्या अनिवासी कॉलेजांमध्ये ‘पिंपरी-चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग’ने तिसरे स्थान पटकावले आहे. दुसऱ्या क्रमांकावर कोल्हापूरचे ‘इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट’ आहे.

Share This Article