⁠  ⁠

चालू घडामोडी : ०३ जून २०२०

Chetan Patil
By Chetan Patil 4 Min Read
4 Min Read

Current Affairs 03 June 2020

भारताचा आक्षेप धुडकावून पाकव्याप्त काश्‍मिरात वीज प्रकल्प

Rajasthan power plant shuts 5 units amid weak electricity demand ...
  • पाकिस्तान सरकारने भारताचा आक्षेप धुडकावून पाकिस्तानव्याप्त काश्‍मिरात 1124 मेगावॅट क्षमतेचा वीज प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला आहे.
  • कोहला जलविद्युत प्रकल्प नावाने हा प्रकल्प तेथे राबवला जाणार आहे. चीनच्या एका कंपनीच्या मदतीने तेथे हा प्रकल्प उभारला जाणार असून त्यासाठी एक त्रिपक्षीय करारही निश्‍चित करण्यात आला आहे.
  • झेलम नदीच्या किनारी हा प्रकल्प उभारला जाणार आहे. त्यातून पाच अब्ज युनिट वीज स्वस्तात उपलब्ध होऊ शकणार आहे. या प्रकल्पासाठी एकूण 2.4 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली जाणार आहे.
  • पाकिस्तानव्याप्त काश्‍मिरात चीन आणि पाकिस्तान यांचा इकॉनॉमिक कॉरिडॉर उभा राहात आहे. तीन हजार किमी लांबीचा हा कॉरिडॉर असून हा प्रकल्प त्याच कॉरिडॉरमधील गुंतवणुकीचा भाग आहे. चीनचा शिंजीयांग प्रांत आणि पाकिस्तानचे ग्वादर बंदर यांना जोडणाऱ्या या कॉरिडॉरमध्ये रेल्वेलाइन, रस्ते, पाइपलाइन आणि ऑप्टिकल फायबर केबललाइनही टाकण्याचे काम सुरू झाले आहे.

राणी, मनिका, विनेशची ‘खेलरत्न’साठी शिफारस

Untitled 30
  • भारताच्या महिला हॉकी संघाची कर्णधार राणी रामपाल, कुस्तीपटू विनेश फोगट आणि टेबल टेनिसपटू मनिका बात्रा यांची क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे. महाराष्ट्राचा कुस्तीपटू राहुल आवारेची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे.
  • राणीची हॉकी इंडियाकडून प्रतिष्ठेच्या खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे. त्याशिवाय हॉकीमध्ये वंदना कतारिया, मोनिका आणि हरमनप्रीत सिंग यांची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे. राणीच्या नेतृत्वाखाली भारताने २०१७मध्ये आशिया चषक पटकावला होता. तिने २०१९मध्ये झालेल्या ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत निर्णायक गोल केल्याने भारताला टोक्यो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेला पात्र ठरता आले.
  • भारतीय कुस्ती महासंघाकडून विनेशची खेलरत्न पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. विनेश पुढील वर्षी होणाऱ्या टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्र ठरलेली भारताकडून एकमेव महिला कुस्तीपटू आहे.
  • २०१६ रियो ऑलिम्पिकमधील कांस्यपदक विजेती साक्षी मलिकची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे. याआधी साक्षीला २०१६मध्ये खेलरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले होते. मात्र तिने यंदा अर्जुन पुरस्कार मिळण्यासाठी अर्ज केला होता. कुस्ती महासंघाकडून महाराष्ट्राचा कुस्तीपटू राहुल आवारेचे नाव अर्जुन पुरस्कारासाठी निश्चित झाले आहे. आवारेने नूर सुलतान येथे झालेल्या कुस्ती स्पर्धेत कांस्यपदक जिंकले होते.
  • टोक्यो ऑलिम्पिकला पात्र ठरलेल्या दीपक पूनियासह संदीप तोमर आणि नवीन यांची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे. भारताची अव्वल टेबल टेनिसपटू मनिका बात्राची खेलरत्न पुरस्कारासाठी भारतीय टेबल टेनिस महासंघाकडून सलग दुसऱ्या वर्षी शिफारस करण्यात आली आहे. २०१८ राष्ट्रकुल स्पर्धेत एकेरीत सुवर्णपदक पटकवणारी ती भारताची पहिली महिला टेबल टेनिसपटू होती. गेल्या वर्षी तिला खेलरत्न पुरस्कार घोषित झाला नव्हता. मधुरिका पाटकर, मानव ठक्कर आणि सुतीर्थ मुखर्जी यांची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे.

अरबी समुद्रात तयार झालेल्या वादळाचं नाव कुणी दिलं?

निसर्ग चक्रीवादळ । येत्या सहा तासात ...
  • अरबी समुद्रात तयार होणाऱ्या आगामी चक्रीवादळाचे नाव निसर्ग असे आहे. हे नाव बांगलादेशने सुचवले आहे.
  • उत्तर हिंदी महासागरामध्ये निर्माण होणाऱ्या चक्रीवादळांच्या नावांची नवी यादी भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) गेल्या महिन्यात प्रसिद्ध केली होती.
  • नव्या यादीमध्ये अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरालगतच्या 13 देशांनी सुचवलेल्या प्रत्येकी 13 अशा एकूण 169 नावांचा समावेश करण्यात आला आहे.
  • अरबी समुद्रातील आगामी चक्रीवादळापासून या नव्या यादीतील नावे चक्रीवादळांना देण्यात येणार आहेत.

सूर्यावरील सूक्ष्म विस्फोटांचा लागला शोध

Big News : The discovery of microscopic explosions on the sun; Global success for scientists at the Tata Institute in Pune | Big News : सूर्यावरील सूक्ष्म विस्फोटांचा लागला शोध; पुण्यातील टाटा इन्स्टिट्यूटच्या वैज्ञानिकांना जागतिक पातळीवरचं यश
  • पुण्यातील टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च (एनसीआरए- टीआयएफआर)च्या नॅशनल सेंटर फॉर स्ट्रोफिजिक्समधील वैज्ञानिकांनी सूर्याच्या सर्व भागांवर होणाऱ्या छोट्या विस्फोटातून निघणाऱ्या सूक्ष्म रेडिओ प्रकाशझोतांचा शोध लावला आहे.
  • या संशोधनाच्या माध्यमातून वैज्ञानिकांनी प्रथमच जगासमोर चुंबकीय विस्फोटाचे धूम्र लोट आढळून येत असल्याचे पुरावे मांडले आहे.
  • ”एनसीआरए मधील प्रा.दिव्य ओबेराय यांच्या मार्गदर्शनाखाली पीएचडी करत असलेला विद्यार्थी सुरजित मोंडल व डॉ. अतुल मोहन या शास्त्रज्ञांच्या गटाने हे संशोधन केले आहे. ‘मर्चीसन वाइल्ड फिल्ड रे (एमडब्ल्यूए)’या दुर्बिणीतून घेतलेल्या डाटा व एनसीआरए मध्ये तयार केलेल्या आधुनिक तांत्रिक प्रणालीच्या सहाय्याने हा शोध लावला आहे”.
  • सूर्याच्या पृष्ठभागावर अंदाजे दोन दशलक्ष अंश तापमानाचा म्हणजेच सूर्याच्या पृष्ठभागापेक्षा ३०० पट जास्त उष्ण वायूचा एक थर असतो.या थराची झलक संपूर्ण खग्रास सूर्यग्रहणादरम्यान आपल्याला पाहता येते.त्यालाच करोना म्हणतात. करोना तापवणारी अतिरिक्त ऊर्जा सूर्याच्या चुंबकीय क्षेत्रातून येत असावी. परंतु,हे कसे घडते याबाबत अद्याप माहीत नव्हते.

Share This Article