⁠  ⁠

चालू घडामोडी : ०३ जुलै २०२०

Chetan Patil
By Chetan Patil 5 Min Read
5 Min Read

Current Affairs 03 July 2020

भारत रशियाकडून खरेदी करणार ३३ फायटर जेट

mig 29
  • एकीकडे पूर्व लडाख सीमेवर चीनशी तणातणी सुरू असतानाच भारताने आता रशियाकडून लढाऊ विमानं खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे.
  • ३३ लढाऊ विमानं खरेदी करण्यासाठी (१२ सुखोई-३०एमकेआयएस आणि २१ मिग-२९) संरक्षण मंत्रालयानं मंजुरी दिली आहे. याशिवाय सध्या भारताकडे असलेले ५९ मिग-२९ लढाऊ विमानांचे अपग्रेडेशनही करण्यात येणार आहे.
  • रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना २०३६ पर्यंत राष्ट्राध्यक्षपदी कायम राहण्यासाठी संविधानात केलेल्या बदलांना रशियातील मतदारांनी मान्यता दिली. त्यामुळे पुतीन यांना आता २०३६ पर्यंत रशियाचे नेतृत्व करता येणार आहे.
  • १८ हजार १४८ कोटी रुपयांच्या या खरेदीला मंजुरी मिळाल्याचे संरक्षण मंत्रालयानं जाहीर केलं आहे.
  • यावर्षी सप्टेंबर २०१९ मध्ये आपल्या ताफ्यात पहिले फ्रेंच बनावटीचे राफेल फायटर विमान दाखल होईल. भारताकडे मिग-२९ फायटर विमानांच्या तीन स्क्वाड्रन आहेत. या स्क्वाड्रन पश्चिम सीमेवर तैनात आहेत. नौदलाकडेही मिग-२९ विमाने आहेत. विमानवाहू युद्धजहाज आयएनएस विक्रमादित्यवर ही विमाने तैनात आहेत.

बेरोजगारीत घट, मे महिन्याच्या २३.५ टक्क्यांच्या तुलनेत जूनमध्ये ११ टक्के

JOb 1
  • देशात अनलॉक – २ सुरू झाल्याबरोबरच बेरोजगारीच्या दरात मोठी घट झाल्याची माहिती समोर आली आहे.
  • ‘सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी’ने (सीएमआय) जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील बेरोजगारीचा दर जूनमध्ये ११ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे, तर मे महिन्यात तो २३.५० टक्के इतका होता. आकडेवारीनुसार, जूनमध्ये ३७.३ कोटी लोकांकडे रोजगार होता. तर ४६.१ टक्के लोक हे रोजगाराच्या शोधात असल्याची माहिती सीएमआयच्या आकडेवारीवरून समोर आली आहे.
  • तर जूनमधील रोजगाराचा दर ३५.८ टक्के होता. दरम्यान, २५ मार्च रोजी देशभरात लॉकडाउन जाहीर केल्यानंतर एप्रिलमध्ये देशात बेरोजगारीचा दर २३.५२ टक्क्यांवर गेला होता.. त्यानंतर मे महिन्यात लॉकडाउनमुळे अर्थचक्र थांबल्यानं बेरोजगारी दर २३.४८ टक्के राहिली. तर दुसरीकडे मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बेरोजगारीचा दर विक्रमी २७.१ टक्क्यांवर पोहोचला. सीएमआयच्या मते एप्रिलमध्ये सुमारे १२.२ दशलक्ष लोकांनी आपला रोजगार गमावला होता.

भारतातील लघु उद्योगांना जागतिक बँकेचे ७५ कोटी डॉलर

world bank
  • भारतातील १५ कोटी सुयोग्य लघु व मध्यम उद्योगांसाठी ७५ कोटी डॉलर्सची अर्थसंकल्पीय मदत देणार आहे, असे जागतिक बँकेने म्हटले आहे.
  • २०२० या आर्थिक वर्षांत ( जुलै २०१९ ते जून २०२०) जागतिक बँकेने भारताला ५.१३ अब्ज डॉलर्सचे कर्ज दिले होते ते या दशकातील सर्वाधिक होते. त्यात कोविड १९ साथीचा मुकाबला करण्यासाठी त्यातील २.७५ अब्ज डॉलर्सचे कर्ज लगेच मंजूर करण्यात आले होते.
  • जागतिक बँकेचे भारतातील संचालक जुनैद अहमद यांनी सांगितले की, बहुदेशीय कर्ज विकास धोरणाअंतर्गत भारताला कर्ज देण्यात आले होते आता लघु व मध्यम उद्योगांसाठीही तशीच तरतूद करण्याचा विचार आहे. सरकारला तरलता, बँकेतर आर्थिक संस्था व लहान वित्त बँका यांना पाठबळ देण्यासाठी या निधीचा वापर करता येईल त्यातून लघु व मध्यम उद्योगांना मदत होईल. त्यानंतरच्या काळात लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाच्या सहकार्याने संकुल पातळीवर क्षमता वाढवण्यास मदत केली जाईल.
  • जागतिक बँकेच्या संचालकांनी लघु व मध्यम उद्योग क्षेत्रासाठी ७५ कोटी डॉलर्स मंजूर केले आहेत. कोविड १९ साथीचा भारतातील लघु उद्योगांना मोठा फ टका बसला असून ते बंद पडले आहेत त्यामुळे त्यावर विसंबून लाखो लोकांची उपजीविका गेली आहे. यापूर्वी जागतिक बँकेने प्रत्येकी १ अब्ज डॉलर्सचे कर्ज सामाजिक व आरोग्य क्षेत्राला दिले होते.

जूनमध्ये ‘जीएसटी’ ९०,९१७ कोटी रुपयांवर

जीएसटीतून ९० हजार कोटींचे उत्पन्न
  • वस्तू आणि सेवा कराची (जीएसटी) वसुली जूनमध्ये ९०,९१७ कोटी रुपयांवर पोहोचली आहे. गेल्या वर्षी जूनपेक्षा यंदा महसुलात नऊ टक्के घसरण झाली आहे. जून २०१९मध्ये वस्तू आणि सेवा कराच्या माध्यमातून ९९,००० कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला होता. एप्रिल ते जून या तिमाहीमध्ये हा महसूल गेल्या वर्षी याच कालावधीच्या तुलनेत ५९ टक्के राहिल्याची माहिती केंद्रीय अर्थ मंत्रालयाने दिली.
  • यंदा एप्रिलमध्ये जीएसटीच्या माध्यमातून ३२,२९४ कोटी रुपयांचा महसूल मिळाला. मे महिन्यात हा महसूल दुपटीने वाढून ६२,००९ कोटी रुपयांवर पोहोचला होता. जूनमध्ये मात्र जीएसटीच्या माध्यमातून मिळणारा महसूल जवळपास ५० टक्क्यांनी वाढून ९० हजार कोटी रुपयांच्या पुढे गेला आहे.
  • केंद्रीय अर्थ मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार जून महिन्यामध्ये केंद्रीय जीएसटीच्या (सीजीएसटी) माध्यमातून १८,९८० कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे.

‘आयसीसी’च्या कार्याध्यक्षपदावरून शशांक मनोहर पायउतार

  • शशांक मनोहर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) कार्याध्यक्षपदावरून पायउतार झाले. मनोहर यांनी नोव्हेंबर २०१५ पासून ‘आयसीसी’ कार्याध्यक्षपद सांभाळले. हंगामी कार्याध्यक्ष म्हणून ‘आयसीसी’चे उपाध्यक्ष इम्रान ख्वाजा यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे.
  • मनोहर यांना ‘आयसीसी’च्या नियमांप्रमाणे पुन्हा दोन वर्षांसाठी कार्याध्यक्ष होता येऊ शकते. कारण तीन वेळा निवडून येण्याची संधी नियमांप्रमाणे आहे. अर्थातच ‘आयसीसी’च्या पुढील आठवडय़ात होणाऱ्या बैठकीत कार्याध्यक्षपदाची निवडणूक कधी आयोजित करायची याबाबतचा निर्णय होणार आहे. ‘आयसीसी’चे मुख्य कार्यकारी अधिकारी मनू साहनी यांनी मनोहर यांचे आभार मानले आहेत. ‘‘मनोहर यांनी आयसीसीचे कार्याध्यक्ष म्हणून जबाबदारी उत्तमपणे सांभाळल्याबद्दल त्यांचे आभारी आहोत,’’ असे साहनी यांनी सांगितले. ख्वाजा यांनीही मनोहर यांच्या कार्यपद्धतीबद्दल कौतुकोद्गार काढले.

Share This Article