⁠  ⁠

Current Affairs 02 Jully 2019

Chetan Patil
By Chetan Patil 3 Min Read
3 Min Read

जपानकडून स्मार्टफोनच्या सुटय़ा भागांची दक्षिण कोरियाला होणारी निर्यात बंद

  • युद्धकाळात जपानच्या काही कंपन्यांनी कोरियाच्या लोकांना सक्तीने कंपन्यात काम करायला लावल्याच्या प्रकरणातील जुना वाद चिघळला असून जपानने दक्षिण कोरियाला चिप, स्मार्टफोन सुटे भाग यांची निर्यात बंद केली आहे.
  • ४ जुलैपासून हा निर्णय अमलात येत आहे. ही बातमी येताच सॅमसंगचा  शेअर  ०.७४ टक्के तर एलजीचा २.५२ टक्क्य़ांनी घसरला आहे. इलेक्ट्रॉनिक व मोबाईल सुटे भाग तयार करणाऱ्या जपानी कंपन्यांचे शेअरही घसरले आहेत.
  • चिपच्या निर्मितीत उपयोगी असलेल्या फ्लोरिनेटेड पॉलिमाइड या रसायनावर बंदी घालण्यात आली आहे. १९६५ मध्ये दोन देशात याबाबत करार झाला होता.

    स्विस बँकांतील निधीत भारत ७४ व्या क्रमांकावर

  • स्वित्झर्लंडमधील मध्यवर्ती स्विस नॅशनल बँकेने जारी केलेल्या आकडेवारीनुसार तेथे गुंतवण्यात आलेल्या पैशाचा विचार करता भारताचा ७४ वा क्रमांक लागला असून ब्रिटन पहिल्या क्रमांकावर आहे. भारताचे स्थान एक अंकाने घसरले आहे.
  • २०१८ मध्ये जगातून स्विस बँकांत ठेवण्यात आलेला निधी ९९ लाख कोटींनी कमी झाला असून ही घसरण ४ टक्के आहे. भारतीय संस्था व व्यक्ती यांनी स्विस बँकात ठेवलेला निधी ६ टक्क्य़ांनी कमी होऊन २०१८ मध्ये ६७५७ कोटी रूपयांवर आला आहे. गेल्या दोन दशकातील ही नीचांकी पातळी आहे.

स्विस बँकेत जास्तच पैसा असलेल्या देशांमध्ये ब्रिटन पहिल्या क्रमांकावर,  तर पहिल्या दहात बहामाज, जर्मनी, लक्झेमबर्ग, केमन बेटे, सिंगापूर यांचाही समावेश आहे. ब्रिक्स देशात रशियाचा क्रमांक विसावा असून चीन २२ वा, तर दक्षिण आफ्रिका ६० वा, ब्राझील ६५ वा आहे. मॉरिशस (७१), न्यूझीलंड (५९), फिलिपिन्स (५४), व्हेनेझुएला (५३), सेचेलिस (५२), थायलंड (३९), कॅनडा (३६), तुर्की (३०), इस्रायल (२८), सौदी अरेबिया (२१), पनामा (१८), जपान (१६), इटली (१५), ऑस्ट्रेलिया (१३), संयुक्त अरब अमिरात (१२), गर्नसे (११) या प्रमाणे क्रमवारी आहे. भारताच्या शेजारील देश खालच्या स्थानावर असून त्यात पाकिस्तान (८२), बांगलादेश (८९), नेपाळ (१०९), श्रीलंका (१४१), म्यानमार १८७), भूतान (१९३) याप्रमाणे क्रमवारी आहे. स्विस बँकांतील पाकिस्तानी  लोक व संस्थांचा पैसा प्रथमच भारतापेक्षा कमी झाला आहे.

IAFची क्षमता वाढणार; रणगाडाविरोधी क्षेपणास्त्रासाठी रशियाशी २०० कोटींचा करार

  • भारतीय हवाई दलाची क्षमता वाढवण्याच्या दृष्टीने भारताने रशियासोबत आणखी एक महत्वाचा करार केला आहे. रणगाडाविरोधी क्षेपणास्त्रासाठी भारताने रशियासोबत २०० कोटी रुपयांचा करार केला आहे.त्यानुसार, आणीबाणीच्या परिस्थितीसाठी आपल्या एमआय-३५ या लढाऊ हेलिकॉप्टरसाठी रशियाकडून ही रणगाडाविरोधी क्षेपणास्त्रे (स्ट्रम अटाका) खरेदी केली जाणार आहेत.
  • भारताकडून याच आपत्कालीन नियमांचा वापर करुन रशियासोबत स्ट्रम अटाका क्षेपणास्त्रांचा करार करण्यात आला आहे.

Share This Article