Current Affair 30 November 2018

0
8

G-२० शिखर परिषदेसाठी मोदी अर्जेटिनात

 • भारत, जपान आणि अमेरिका या तीन देशांत होणाऱ्या जी-२० शिखर परिषदेच्या त्रिपक्षीय बैठकीत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी अर्जेटिनात दाखल झाले आहेत. तीन देशांत पहिल्यांदाच ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. ही बैठक संपल्यानंतर रशिया, भारत आणि चीन या तीन देशांमध्ये अन्य दुसरी एक त्रिपक्षीय बैठक होणार असून यातही मोदी सहभागी होणार आहेत. अर्जेटिनात दोन महत्वपूर्ण त्रिपक्षीय बैठक होणार असून यात जागतिक समस्यांवर चर्चा करण्यात येणार आहे.
 • अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांची भेट घेणार असून त्यानंतर ते भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटणार आहेत. चीनच्या समुद्री क्षेत्रातील वादावरून चीन-जपान यांच्यात धुसफूस सुरू असताना या दोन नेत्यांची बैठक होत आहे.
 • भारत, रशिया आणि चीन या तीन देशांत होणाऱ्या त्रिपक्षीय बैठकीत पंतप्रधान मोदी, चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग आणि रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन सहभागी होणार आहेत.

सर्वात उष्ण वर्ष २०१८!

Advertisement
 • चालू वर्ष (२०१८) हे सर्वात उष्ण वर्ष असल्याचे स्पष्ट झाले आहे. वर्ल्ड मेटेओरॉलॉजिकल ऑर्गनायझेशन (डब्ल्यूएमओ) या संस्थेनी अशी नोंद केली आहे. भारतासह जगभरात तापमानात सातत्याने बदल यावर्षी होत आहेत. त्यामुळे हे वर्ष सर्वात उष्ण वर्ष ठरले आहे.
 • मागील चार वर्षांपासून सुरू असलेला दीर्घकाळ रेंगाळणाऱ्या उष्णतेचा ट्रेंड यावर्षीही कायम राहिला आहे. गेल्या १३८ वर्षांचा आढावा घेतल्यास यंदाचे वर्ष हे सर्वात उष्ण आहे. वातारण बदल झालेलेही या वर्षात अधिक स्पष्टपणे दिसून आले आहेत. त्यामध्ये समुद्राच्या पातळीत झालेली वाढ, समुद्राच्या तापमानात झालेली वाढ, सागराच्या पाण्यातील वाढलेले आम्लांचे प्रमाण तसेच समुद्री बर्फ आणि हिमनगांचे वितळणे यावरह्षी दिसून आले आहे. याशिवाय सर्वच खंडांमध्ये टौकाचे वातावरणीय बदलही आढळून आले आहेत.
 • ऑगस्टमध्ये केरळमध्ये आलेला पूर हा याचाच परिणाम होता. १९२०नंतर प्रथमच केरळला इतक्या मोठ्या प्रमाणावर पुराचा तडाखा बसला. या महापुरामुळे १४ लाख लोक बेघर झाले तर ५४ लाख लोकांना याचा फटका बसला. त्यापूर्वी २३ जुलै रोजी ग्रीसमध्ये अथेन्स शहरात भयानक वणवा लागला. ब्रिटिश कोलंबिया भागातही प्रचंड प्रमाणात वणवा लागला होता.

ताजमहालचा मार्गदर्शक दस्तऐवज सार्वजनिक करण्याचे निर्देश

 • दिल्ली स्कूल ऑफ प्लॅनिंग अँड आर्किटेक्चरच्या वतीने तयार करण्यात येत असलेला मार्गदर्शक दस्तऐवज (व्हिजन डॉक्युमेंट) सार्वजनिक करण्यात यावा, असे सर्वोच्च न्यायालयाने उत्तर प्रदेश सरकारला सांगितले.
 • आग्रा येथील ताजमहालचे संरक्षण आणि संवर्धन यासाठी मार्गदर्शक दस्तऐवज तयार करण्याची आपली प्रक्रिया सुरू असून, ती काही दिवसांत पूर्ण होईल आणि हा दस्तऐवज राज्य सरकारला सादर केला जाईल, असे दिल्ली स्कूल ऑफ प्लॅनिंग अँड आर्किटेक्चर (डीएसपीए)ने न्यायालयाला सांगितले.
 • युनेस्कोला सादर केला जावयाचा ताजमहालसाठीच्या वारसा आराखडय़ाचा (हेरिटेज प्लॅन) पहिला मसुदा आठ आठवडय़ांत अंतिम केला जाईल, असे केंद्र सरकारतर्फे युक्तिवाद करणारे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल एएनएस नाडकर्णी यांनी खंडपीठाला सांगितले.

कार्लसन चौथ्यांदा जगज्जेता!

 • जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी विराजमान असलेल्या नॉर्वेच्या मॅग्नस कार्लसनने अमेरिकेच्या आव्हानवीर फॅबियानो करुआनावर जलदगती डावात ३-० अशी मात करून जगज्जेतेपदाला गवसणी घातली. यासह कार्लसनने सलग चौथ्यांदा जगज्जेतेपद पटकावण्याची किमया केली. पराभवामुळे मात्र बॉबी फिशर यांच्यानंतर (१९७२) अमेरिकेचा पहिला जगज्जेता होण्याची करुआनाची संधी हुकली.
 • क्लासिकल लढतीतील १२ डाव बरोबरीत सुटल्यानंतर जलद प्रकाराच्या ‘टाय-ब्रेकर’मध्ये सामन्याचा निकाल लागला. १२ डावांत एकही विजय नसणे, हासुद्धा एक विक्रम ठरला. मात्र जलद बुद्धिबळमध्ये वरचढ समजल्या जाणाऱ्या कार्लसनने ‘टाय-ब्रेकर’वर पूर्णपणे वर्चस्व गाजवले. पहिले तिन्ही डाव जिंकल्यामुळे चौथा डाव खेळवण्याची गरज भासली नाही. कार्लसनने पहिल्या तिन्ही डावांत बाजी मारत बुद्धिबळातील सर्वात प्रतिष्ठेच्या विजेतेपदावर नाव कोरले.
Advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here