⁠  ⁠

Current Affair 30 December 2018

Chetan Patil
By Chetan Patil 5 Min Read
5 Min Read

नवे वर्ष खगोलप्रेमींसाठी पर्वणी

  • येत्या मंगळवारपासून सुरू होणाऱ्या नव्या वर्षांमध्ये तीन सूर्यग्रहणे आणि दोन चंद्रग्रहणे अशी एकूण पाच ग्रहणे पाहण्याचा योग जुळून आला असून नऊ वर्षांनी भारतातून ग्रहणे पाहण्याची संधी मिळणार असल्यामुळे हे वर्ष खगोलप्रेमींसाठी पर्वणी ठरणार आहे. तर आगामी वर्षांमध्ये केवळ दोन सुट्टय़ा रविवारी आल्याने चाकरमान्यांची चंगळ होणार आहे.
  • नव्या वर्षांत (२०१९) तीन सूर्य ग्रहणे आणि दोन चंद्र ग्रहणे अशी एकूण पाच ग्रहणे होणार आहेत. त्यापैकी १६ जुलै रोजी होणारे खंडग्रास चंद्रग्रहण आणि २६ डिसेंबर रोजी होणारे कंकणाकृती सूर्यग्रहण भारतातून दिसणार आहे. दक्षिण भारताताली कोईम्बतूर, कन्नूर, मंगलोर, उटी या ठिकाणांहून सूर्यग्रहणाच्या कंकणाकृती स्थितीचे दर्शन घडणार आहे.
  • मुंबईमधूनही हे सूर्यग्रहण खंडग्रास स्थितीत दिसणार असून ८५ टक्के सूर्य ग्रासित दिसणार आहे. यापूर्वी १५ जानेवारी २०१० रोजी झालेले कंकणाकृती सूर्यग्रहण दक्षिण भारतातून दिसले होते. मात्र ११ नोव्हेंबर २०१९ रोजी होणारे बुधाचे अधिक्रमण भारतातून दिसणार नाही.
  • तथापि, २१ जानेवारी २०१९ आणि १९ फेब्रुवारी २०१९ रोजी रात्री आकाशात सुपरमून दिसणार आहे.

मोदींच्या ‘एरोप्लेन मोड’चा खर्च तब्बल 2021 कोटी!

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मागील साडेचार वर्षांच्या कार्यकाळात परदेशवारीची माहिती देण्यात आली. मोदींनी 92 देशांना भेटी दिल्या. त्यासाठी एकूण 2021 कोटी रुपये खर्च करण्यात आले. यामध्ये चार्टर्ड विमाने, विमानाची देखभाल आणि हॉट लाइनसाठी हा खर्च करण्यात आला.
  • तसेच दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी यापूर्वी सर्वाधिक परदेश दौरे केले होते. त्यानंतर आता सर्वाधिक दौरे करणारे मोदी दुसरे पंतप्रधान ठरणार आहेत. इंदिरा गांधींनी त्यांच्या कार्यकाळात 113 देशांचे दौरे केले होते.
  • तर सध्याचे पंतप्रधान मोदींनी 92 देशांचे दौरे केले आहेत. यामध्ये त्यांनी काही ठराविक देशांना एकापेक्षा अधिकवेळेस भेटी दिल्या आहेत. तसेच माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी त्यांच्या कार्यकाळात 93 देशांचे दौरे केले होते. मात्र, मनमोहनसिंग यांचे हे परदेश दौरे दहा वर्षांसाठी होते.
  • तर इंदिरा गांधी यांचे 113 देशांचे दौरे हे 15 वर्षांच्या कार्यकाळातील असल्याचे स्पष्ट झाले आहे.

मेलबर्नमध्ये भारताचा ऑस्ट्रेलियावर ऐतिहासिक विजय

  • ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत भारतानं 137 धावांनी विजय मिळवला आहे. भारतानं चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत 2-1नं आघाडी घेतली आहे. भारताकडून दुसऱ्या डावात बुमराह आणि जाडेजानं प्रत्येकी तीन गडी बाद केले.
  • मेलबर्नच्या मैदानातील या ‘बॉक्सिंग डे’ कसोटी सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 399 धावांचं आव्हान दिलं होतं. या आव्हानाला प्रत्युत्तर देताना ऑस्ट्रेलियाचा डाव 261 धावांत आटोपला.
  • ऑस्ट्रेलियाच्या आघाडीचे फलंदाज मैदानात फार काळ तग धरू शकले नाहीत. पण कांगारुंच्या तळातील फलंदाजांनी भारताला विजयसाठी पाचव्या दिवसाची वाट पाहायला लावली. ऑस्ट्रेलियाकडून पॅट कमिन्सनं सर्वाधिक 63 धावा केल्या. तर भारताच्या वतीने बुमराहने सामन्यात 9 गडी बाद केले.

चीननं बांधला जगातला पहिला तीन मजली सोलर हायवे

  • चीननं सोलर हायवेची उभारणी केली आहे आणि हा हायवे जगातील पहिला सोलर हायवे ठरला आहे. एक किलोमीटर लांबीचा हा हायवे असून याद्वारे विद्युतनिर्मिती करता येणार आहे.
  • तसंच येणाऱ्या काळात इलेक्ट्रिक वाहनांना चार्ज करण्याचं कामदेखील हा हायवे करणार असल्याचं म्हटलं जात आहे. चीनमधील जिनानमध्ये बांधण्यात आला आहे.
  • चीनमध्ये बांधण्यात आलेला हा सोलर हायवे तीन मजली आहे. यामध्ये काँक्रीट, सिलिकॉन पॅनल्स आणि इन्सुलेशनचे लेअर्स आहेत. या हायवेच्या माध्यमातून एका वर्षात 10 मिलियन म्हणजे 1 कोटी किलोवॅट वीजनिर्मित केली जाऊ शकते.
  • हिवाळ्यात जमलेला बर्फ वितळवण्याचे कामही या हायवेद्वारे होऊ शकते.
  • एक किलोमीटरच्या सोलर हायवेनं 63,200 स्क्वेअर फूट परिसर व्यापला आहे. सामान्य हायवेच्या तुलनेत हा सोलार हायवे दहा पट अधिक भार झेलू शकतो.

आज मोदींची वर्षातील अखेरची ‘मन की बात’

  • धानमंत्री नरेंद्र मोदी आज (30 डिसेंबर) आकाशवाणीवर मन की बात कार्यक्रमाद्वारे देशवासियांना संबोधित करतील.
  • या कार्यक्रमाला एक वेगळे महत्व असून 2014साली सुरू झालेल्या या कार्यक्रमाचा आज 51 वा भाग असून या वर्षातील मोदींचा अखेरचा मन की बात कार्यक्रम असणार आहे.
  • पंतप्रधान झाल्यापासून नरेंद्र मोदी हे प्रत्येक महिन्याच्या अखेरच्या रविवारी ‘मन की बात’ या कार्यक्रमातून जनतेशी संवाद साधतात.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 2014 पासून पद सांभाळल्यानंतर त्याच वर्षी 5 ऑक्टोबर 2014 रोजी ‘मन की बात’ कार्यक्रम सुरू केला होता.
  • देशातील जनतेशी रेडिओच्या माध्यमातून ते संवाद साधतात. यापूर्वी 25 नोव्हेंबर रोजी 50 व्या भागात पंतप्रधान मोदींनी संविधान दिवस, गुरुनानक जयंतीशी संबंधित अनेक महत्त्वपूर्ण गोष्टींवर ‘मन की बात’ केली होती.
Share This Article