⁠  ⁠

Current Affair 28 November 2018

Chetan Patil
By Chetan Patil 2 Min Read
2 Min Read

Madhya Pradesh, Mizoram Elections : मध्य प्रदेशात 230
तर मिझोरममध्ये 40 जागांसाठी मतदान सुरु

  • मध्य प्रदेश व मिझोरम या राज्यांमधील विधानसभा निवडणुकांसाठी आज मतदान होत आहे. मध्य प्रदेशात विधानसभेच्या 230 जागांसाठी मतदान होत आहे. या निवडणुकीत 2899 उमदेवार आपले नशीब आजमावत आहेत. यामध्ये 2644 पुरुष, 250 महिला आणि 5 तृतीयपंथीयांचा समावेश आहे.
  • दुसरीकडे, मिझोरमध्ये 40 जागांसाठी मतदान होत आहे. यामध्ये आठ राजकीय पक्षांचे एकूण 209 उमेदवार मैदानात उतरले आहेत. या निवडणुकीसाठी मिझोरममध्ये एकूण 7,70,395 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यात 374,496 पुरुष, 3,94,897 महिला मतदारांचा समावेश आहे.

केशव गिंडे यांना भीमसेन जोशी पुरस्कार जाहीर:

  • भारतरत्न पं. भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्कारासाठी ज्येष्ठ बासरीवादक पं. केशव गिंडे यांची निवड झाली आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी या पुरस्काराची घोषणा केली.
  • दर वर्षी राज्य सरकारतर्फे शास्त्रीय गायन व वादन या क्षेत्रांत प्रदीर्घ काळ उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कलाकाराला भारतरत्न पं. भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. या पुरस्काराचे स्वरूप पाच लाख रुपये, मानपत्र, सन्मानचिन्ह असे आहे.

SAARC: पाकिस्तानचे निमंत्रण भारताने फेटाळले

  • २ वर्षांपासून ठप्प झालेली सार्क संवाद प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यासाठी इस्लामाबादमधील सार्क परिषदेचं निमंत्रण पाकिस्तानने भारताला दिले होते. हे निमंत्रण भारताने फेटाळलं असून इतर सात देशांना न विचारता सार्क समिट भरवणारा आणि निमंत्रण देणारा पाकिस्तान कोण असा सवाल भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने केला आहे.
  • दक्षिण आशियातील अफगाणिस्तान,बांग्लादेश ,भुतान, भारत , मालदीव,नेपाल,पाकिस्तान आणि श्रीलंका या देशांची राजकीय संघटना म्हणजे सार्क. या संघटनेच्या ध्येय धोरण निश्चितीमध्ये अफगाणिस्तान,भारत , बांग्लादेश,पाकिस्तान आणि श्रीलंका महत्त्वाची भूमिका बजावतात. दरवर्षी दक्षिण आशियातील एका देशात सार्कच्या सर्व देशांची बैठक होत असे.

हॉकी विश्वचषक स्पर्धा 2018:

  • मायदेशातील क्रीडारसिकांच्या साक्षीने भारतीय हॉकी संघ 28 नोव्हेंबर रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सलामीच्या लढतीने विश्वचषक हॉकी स्पर्धेच्या अभियानाला प्रारंभ करणार आहे. गेल्या 43 वर्षांची विश्वविजेतेपदाची प्रतीक्षा संपवण्याचा निर्धार भारतीय संघाने केला आहे. पहिल्या दिवशी बेल्जियम आणि कॅनडा यांच्यातील लढतसुद्धा होणार आहे.
  • आठ वेळा ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या भारतीय संघाने 1975 मध्ये अजितपाल सिंग यांच्या नेतृत्वाखाली विश्वचषक स्पर्धा जिंकण्याची किमया साधली होती. त्यानंतर मात्र भारताचा हॉकीचा सुवर्णकाळ हरपला.

Share This Article