⁠  ⁠

Current Affair 24 January 2019

Chetan Patil
By Chetan Patil 5 Min Read
5 Min Read

तेलाच्या मागणीतील जगातील दुसरी मोठी बाजारपेठ

  • तेलाची सर्वाधिक मागणी असलेली जगातील दुसरी मोठी बाजारपेठ बनण्याच्या दिशेने भारताची वाटचाल सुरू असून, वाहनांसाठी इंधनाची वाढती गरज आणि घरगुती वापराच्या एलपीजी गॅसच्या मागणीत लक्षणीय वाढ पाहता विद्यमान २०१९ सालातच अमेरिकेखालोखाल परंतु चीनला मागे टाकणारे हे स्थान भारताकडून पटकावले जाण्याची शक्यता वर्तविली गेली आहे.
  • ताचा जागतिक तेल मागणीत १४ टक्के वाटा म्हणजे प्रति दिन २,४५,००० पिंप असा वाटा आहे. दोन वर्षांपूर्वीच्या नोटाबंदी आणि त्यापाठोपाठ आलेल्या वस्तू व सेवा करासारख्या करसुधारणेतून देशाची वार्षिक सरासरी इंधन मागणी मंदावल्याचा परिणाम दिसला असला, तरी सरलेल्या २०१८ सालात त्यात पुन्हा पूर्वीसारखीच वाढ दिसून आल्याचे हा अहवाल सांगतो.
  • गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये तेल उत्पादक ‘ओपेक’ राष्ट्रगटानेही भारतातून तेलाची मागणी सध्याच्या सरासरी अडीच लाख पिंप प्रति दिन या पातळीवरून, २०४० पर्यंत ५८ लाख पिंप प्रति दिन पातळीपर्यंत वाढेल, असे भविष्य वर्तविले आहे.

सुंदर पिचाई, सत्या नाडेला यांच्यासह या प्रसिद्ध व्यक्तींनी
सोडले भारताचे नागरिकत्व

  • भारतात जन्मलेल्या अनेक व्यक्तींनी परदेशात स्थायिक होऊन जागतिक स्तरावर नावलौकिक कमावला आहे. मात्र यापैकी अनेकांनी माघारी फिरून भारतात येण्यापेक्षा परदेशातील नागरिकत्व पत्करून तिथेच राहणे पसंत केले.
  • सुंदर पिचाई – गुगलचे सीईओ असलेल्या सुंदर पिचाई यांचा जन्म भारतातील तामिळनाडू राज्यामधील मदुराई येथे झाला होता. आयआयटी खडगपूर येथून इंजिनियरिंगची पदवी घेतल्यानंतर ते अमेरिकेत गेले. तिथे स्थायिक झाल्यानंतर काही वर्षांपूर्वी त्यांनी भारताचे नागरिकत्व सोडून अमेरिकेचे नागरिकत्व स्वीकारले.
  • सत्या नाडेला – मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नाडेला यांचा जन्म भारतातील हैदराबाद येथे झाला होते. ते उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत गेले. त्यानंतर तिथेच स्थिरावले. नाडेला यांनी सुद्धा भारताचे नागरिकत्व सोडून अमेरिकेचे नागरिकत्व स्वीकारले आहे.
  • विक्रम पंडित – जागतिक कीर्तीचे बँकर विक्रम पंडित यांचा जन्म नागपूरमध्ये झाला होता. मुंबईमध्ये माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते वयाच्या 16 व्या वर्षी उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत गेले. त्यानंतर काही वर्षांपूर्वी त्यांनी भारतीय नागरिकत्व सोडून अमेरिकेचे नागरिकत्व स्वीकारले.
  • इंदिरा नुई – पेप्सीच्या माजी सीईओ असलेल्या इंदिरा नुई यांचा जन्म चेन्नई येथे झाला होता. उच्च शिक्षणासाठी येल विद्यापीठात प्रवेश मिळवल्यानंतर त्यांनी परदेशातच करिअर केले. तसेच अनेक वर्षांपूर्वी त्यांनी भारताचे नागरिकत्वही सोडले. सध्या जागतिक बँकेच्या अध्यक्षपदासाठी त्यांचे नाव चर्चेत आहे.
  • व्यंकटरमन रामाकृष्णन – तामिळनाडूतील चिदंबरम येथे जन्मलेल्या व्यंकटरमन रामाकृष्णन यांना 2009 साली केमिस्ट्रीतील नोबेल पुरस्काराने गौरविण्यात आले होते. रामाकृष्णन यांनी बडोदा येथून विज्ञान विषयाची पदवी घेतल्यानंतर अमेरिकेकडे प्रयाण केले. त्यानंतर अनेक वर्षांपासून ते ब्रिटनमध्ये राहत आहेत.
  • एम. एफ. हुसेन – प्रसिद्ध चित्रकार एम. एफ. हुसेने हे त्यांच्या चित्रांमुळे वादग्रस्त ठरले होते. अखेरीस त्यांना देश सोडावा लागला होता. मृत्यूपूर्वी काही वर्षे त्यांनी कतारचे नागरिकत्व स्वीकारले होते.
  • एम. एफ. हुसेन – प्रसिद्ध चित्रकार एम. एफ. हुसेने हे त्यांच्या चित्रांमुळे वादग्रस्त ठरले होते. अखेरीस त्यांना देश सोडावा लागला होता. मृत्यूपूर्वी काही वर्षे त्यांनी कतारचे नागरिकत्व स्वीकारले होते.
  • हरगोविंद खुराणा – प्रसिद्ध शास्त्रज्ञ हरगोविंद खुराना यांनी संशोधनासाठी पुरेशा सुविधा उपलब्ध नसल्याने 60 च्या दशकात देश सोडून ब्रिटनमध्ये राहण्यास सुरुवात केली. पुढे त्यांना नोबेल पुरस्कारही मिळाला होता.

लवकरच ई पासपोर्ट

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रवासी भारतीय दिनानिमित्त वाराणसी येथे सरकार लवकरच चिप असलेले ई-पासपोर्ट जारी करणार असल्याची घोषणा केली. आंतरराष्ट्रीय नागरी विमानचालन संस्थेकडून परवानगी मिळाल्यानंतर परराष्ट्र मंत्रालयाने ई-पासपोर्ट जारी करण्याची तयारी सुरू केली आहे.
  • नाशिकमध्ये इंडिया सिक्युरिटी प्रेस (ISP), येथे हे पासपोर्ट बनवले जातील. ISP ला यासाठी केंद्राकडून मंजुरी मिळाली आहे. आयएसपी, आयआयटी कानपूर आणि राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्र (एनआयसी) या प्रणालीवर संयुक्तपणे काम करत आहे. यासाठी आयआयटी कानपूर आणि एनआयसीने एकत्र येत एक सॉफ्टवेअर बनवलं आहे.
  • काय आहे ई-पासपोर्ट –-
  • अद्ययावत सुरक्षा प्रणाली असलेल्या ई-पासपोर्टवर अर्जदाराची डिजीटल स्वाक्षरी असेल आणि ते चिपमध्ये सेव्ह केलं जाईल. जर कोणी व्यक्ती चिपसोबत कोणत्याही प्रकारे छेडछाड करण्याचा प्रयत्न केला तर त्याचं पासपोर्ट निष्क्रीय होईल. याशिवाय चिपमध्ये सेव्ह केलेली माहिती फिजीकल पासपोर्टशिवाय वाचता येणार नाही.

१२ वर्षीय पुणेकराने तयार केले समुद्र स्वच्छ करणाऱ्या जहाजाचे डिझाइन

  • पुण्यातील एका बारा वर्षीय मुलाने समुद्र स्वच्छ करुन त्यामधील प्रदूषण कमी करण्यासाठी एका जहाजाची संकल्पना सादर केली आहे. हाझीक काझी असे या पुणेकर मुलाचे नाव असून त्याने ‘एरवीस’ या जहाजाची संकल्पना मांडली आहे. या जहाजामुळे समुद्रातील कचरा साफ करण्यास मदत होईल आणि जलचरांचे संवर्धनही करता येईल असा दावा हाझीकने केला आहे.
  • आपल्या या प्रकल्पाबद्दल एनएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना हाझीकने माहिती दिली. मी लहान असताना काही डॉक्युमेन्ट्री पाहिल्या होत्या. तेव्हा समुद्रात टाकण्यात येणाऱ्या कचऱ्यामुळे जलचरांचे अस्तित्व धोक्यात असल्याचे मला जाणवले. तेव्हाच आपण यासाठी काहीतरी करायला हवे असं मी मनाशी ठरवलं. आपण जे मासे खाद्य म्हणून खातो ते मासेच समुद्रातील प्लॅस्टिक खात असतील तर आपण केलेले प्रदूषण आपल्यासाठीच घातक ठरत आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे. हेच प्रदूषण कमी करण्यासाठी मी ‘एरवीस’ची निर्मिती केली आहे.’
Share This Article