⁠  ⁠

Current Affair 21 November 2018

Chetan Patil
By Chetan Patil 4 Min Read
4 Min Read

भारत, रशियामध्ये युद्धनौकाबांधणीसाठी करार

  • भारत आणि रशिया यांच्यात मंगळवारी दोन युद्धनौकाबांधणीसाठी ५०० दशलक्ष डॉलरचा करार करण्यात आला. या नौकांची बांधणी गोवा येथील नौदल गोदीत करण्यात येणार आहे. तसेच रशिया त्यांच्या बांधणीचे तंत्रज्ञानही भारताला हस्तांतरित करणार आहे.
  • गोवा शिपयार्ड लिमिटेड (जीएसएल) आणि रशियाची रोझोबोरॉनएक्स्पोर्ट यांच्यात हा ५०० दशलक्ष डॉलरचा करार झाला. या नौकांच्या बांधणीला २०२० मध्ये सुरुवात होईल. त्यातील पहिली युद्धनौका २०२६ साली आणि दुसरी नौका २०२७ साली तयार होईल. या तलवारवर्गातील स्टेल्थ तंत्रज्ञानावर आधारित फ्रिगेट प्रकारच्या युद्धनौका आहेत. त्यांच्यावर ब्रह्मोस क्षेपणास्त्रे आणि शस्त्रास्त्रे बसवण्यात येतील.

छत्तीसगडमध्ये दुसऱ्या टप्प्यात ७१.९३ टक्के मतदान

  • छत्तीसगड विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या आणि अखेरच्या टप्प्यात मंगळवारी ७१.९३ टक्के मतदान झाले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
  • मतदानाची वेळ संपली असतानाही मतदारांच्या रांगा मतदान केंद्राबाहेर दिसत होत्या. राज्यातील ७२ मतदारसंघात एकूण १०७९ उमेदवार रिंगात असून त्यामध्ये ११९ महिला उमेदवार आहेत.

शीख दंगल : ३४ वर्षांनंतर एकाला फाशी तर एकाला जन्मठेपेची शिक्षा

  • १९८४ च्या शीख विरोधी दंगली प्रकरणी न्यायालयाने ३४ वर्षांनंतर एकाला फाशीची तर एकाला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. दिल्लीतील एका न्यायालयाने हत्येप्रकरणी दोषी ठरवत नरेश सहरावतला जन्मठेप तर यशपाल सिंहला फाशीची शिक्षा सुनावली आहे.
  • न्यायालयाने १ नोव्हेंबर १९८४ मध्ये महिलापूर परिसरात दोन शीख युवकांच्या हत्येप्रकरणी स्थानिक नरेश सहरावत आणि यशपाल सिंह यांना दोषी ठरवले होते. पीडित कुटुंबीयांच्या दुकानाची लुट करणे, दंगल करणे, दोन शीख युवकांना जिवंत जाळणे, मृतांच्या भावांवर जीवघेणा हल्ल्या केल्याचा आरोप सिद्ध झाला आहे.
  • माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर अनेक शहरांमध्ये दंगल उसळली होती. त्यावेळी हा प्रकार घडला होता.

महाराष्ट्र दिनापूर्वी २ लाख घरांना मिळणार पाइपने गॅस

  • राज्यातील २ लाखाहून अधिक घरांना २०१९ च्या महाराष्ट्र दिनापूर्वी पाइपने स्वयंपाकाचा गॅस मिळणार आहे. पंतप्रधान मोदी २२ नोव्हेंबरला दिल्लीत याचे उद्घाटन करणार आहेत. अहमदनगर, औरंगाबाद, धुळे, नाशिक, लातूर, उस्मानाबाद, सांगली, सातारा व सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा त्यात समावेश आहे.
  • एलपीजी सिलिंडरसाठी लागणाऱ्या गॅसची आयात कमी करण्यासाठी केंद्र सरकारने घरांना पाइपने नैसर्गिक वायूचा पुरवठा करणारा प्रकल्प हाती घेतला आहे. त्यासाठी पेट्रोलियम व नैसर्गिक वायू नियामक मंडळाने निविदेच्या आठ फेºया आतापर्यंत पूर्ण केल्या आहेत.
  • नवव्या फेरीत देशातील ८४ व राज्यातील नऊ जिल्ह्यांचा समावेश होता. त्यामधील एकूण २० लाख ५८ हजार ५४३ घरांना पाइपद्वारे हा गॅस पोहोचविला जाईल. भारत गॅस रिसोर्सेस लिमिटेड, महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड व युनिसन एन्वायरो या कंपन्यांना हे कंत्राट मिळाले.

World Boxing Championship : भारताच्या विजयाचा चौकार; स्पर्धेत चौथे पदक निश्चित

  • World Boxing Championship या स्पर्धेत भारताची स्टार बॉक्सर मेरी कोम आणि लोव्हलीना बोरगोहैन यांनी उपांत्य फेरी गाठल्यानंतर आता आणखी दोन बॉक्सरने भारताकडून पदक निश्चित केले आहे.
  • ५७ किलो वजनी गटात भारताच्या सोनिया चहल हिने कोलंबियाच्या येनी कास्टनाडा हिच्यावर ४-१ असा विजय मिळवला आणि उपांत्य फेरीत धडक मारली. तर भारताच्या सिमरनजीत कौर हिने आयर्लंडच्या सारा ब्रॉडहर्स्ट हिला ३-१ असे पराभूत केले. या दोघींनी स्पर्धेत पदक निश्चित केल्यामुळे आता भारताला या स्पर्धेत चार पदके निश्चित झाली आहेत.
  • या आधी आजच्या दिवसात भारताच्या लोव्हलीना बोरगोहैन हिने उपांत्यपूर्व फेरीत ऑस्ट्रेलियाच्या के स्कॉट ५-० ने धुवा उडवत हा पराक्रम केला. तिने ऑस्ट्रेलियाच्या के स्कॉट हिला ६९ किलो वजनी गटात धूळ चारली.
Share This Article