⁠  ⁠

Current Affair 18 November 2018

Chetan Patil
By Chetan Patil 3 Min Read
3 Min Read

१९७१ च्या युद्धाचे ‘हिरो’ ब्रिगेडियर कुलदीप सिंग चंदपुरी यांचं निधन

  • भारत-पाकिस्तानमध्ये १९७१ मध्ये झालेल्या युद्धातील विजयाचे शिल्पकार निवृत्त ब्रिगेडियर कुलदीप सिंग चंदपुरी यांचं आज निधन झालं. ते ७८ वर्षांचे होते. महावीरचक्राने सन्मानित करण्यात आलेल्या कुलदीप सिंग गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. मोहाली येथील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, आज सकाळी ८.३० वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.
  • ५ आणि ६ डिसेंबर १९७१ रोजी राजस्थान येथील लोगेंवाला सीमेवर पाकिस्तानकडून मध्यरात्री हल्ला करण्यात आला होता. यावेळी पंजाब तुकडीचे नेतृत्व कुलदीप सिंग यांनी केलं होतं. या युद्धात भारताच्या विजयाचे ते शिल्पकार ठरले. त्यांच्या योगदानामुळे महावीरचक्राने त्यांना सन्मानित करण्यात आले होते.
  • ब्रिगेडियर कुलदीप सिंग यांचा जन्म २२ नोव्हेंबर १९४० ला गुर्जर शीख कुटुंबात झाला होता. भारतातल्या पंजाबमध्ये त्यांचं कुटुंब वास्तव्याला होतं.

वित्त सचिव अधिया महिनाअखेरीस होणार निवृत्त

  • केंद्रीय वित्त सचिव हसमुख अधिया हे या महिनाअखेरीस निवृत्त होणार असल्याची घोषणा केंद्र सरकारने शनिवारी अचानकपणे केली.
  • केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी आपल्या ब्लॉगवर यासंबंधी लिहिले की, ‘अधिया यांनी काळ्या पैशांविरोधातील मोहीम तसेच जीएसटी यासारख्या पुढाकारांत उत्तम काम केले आहे. त्यांच्या अनुभवाचा काही पर्यायी जबाबदाऱ्यांसाठी उपयोग करून घेण्याची सरकारची इच्छा होती. तथापि, त्यांनी मला या महिन्याच्या सुरुवातीलाच सांगितले की, ३० नोव्हेंबर २०१८ नंतर एक दिवसही ते काम करू इच्छित नाहीत.
  • जून महिन्यात कॅबिनेट सचिवपद रिक्त झाले तेव्हा हे आपल्याला मिळेल, अशी अधिया यांची अपेक्षा होती. कारण ते सर्वांत ज्येष्ठ अधिकारी होते.
  • विशेष म्हणजे अधिया हे पंतप्रधान मोदी यांचे जवळचे अधिकारी समजले जातात. मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते, तेव्हापासून ते त्यांच्यासोबत काम करीत आहेत.

टेबल टेनिस स्पर्धेत मानव ठक्करला कांस्यपदक

  • बेलारुस खुल्या टेबल टेनिस स्पर्धेमधील २१ वर्षांखालील एकेरी गटात भारताच्या मानव ठक्कर याने कांस्यपदक पटकावले.
  • आतापर्यंत दमदार कामगिरीसह आगेकूच केलेल्या मानवला उपांत्य फेरीत रशियाच्या डेनिस इवोनिनकडून २-३ असा पराभव पत्करावा लागल्याने कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.
  • मानवने पहिला गेम ११-५ असा जिंकत चांगली सुरुवात केली. चौथ्या गेमला दोन्ही खेळाडूंची बरोबरी झाल्यानंतर निर्णायक पाचव्या गेमपर्यंत सामना खेचला गेला. त्यात अगदी अटीतटीच्या लढतीत मानवला ११-९ असा पराभव स्वीकारावा लागला.

इंजिनशिवाय सुसाट धावणारी देशातल्या
पहिल्या अत्याधुनिक गाडीची टेस्ट ड्राईव्ह

  • ट्रेन 18 नावाच्या भारतातल्या पहिल्या इंजिनरहित लांब पल्ल्याच्या गाडीची चाचणी केली.
  • उत्तर प्रदेशमध्ये बरेली-मोरादाबाद सेक्शनमध्ये ही चाचणी पार पडेल. चाचणी पूर्ण झाल्यावर ही गाडी शताब्दी, जनशताब्दी एक्स्प्रेसना वापरण्याचा रेल्वेचा मानस आहे. या गीडीची वेगमर्यादाही जास्त आहे.
  • भारतात पहिल्यांदाच या इंजिन नसलेल्या ट्रेनचा ट्रायल झाला आहे. भारतातील सर्वात फास्ट ट्रेन शताब्दीला टक्कर देऊ शकते. Train18 असे या ट्रेनचे नाव आहे.
  • शताब्दी एक्सप्रेसचा एका तासाला 130 किलोमीटर इतका स्पीड आहे. आणि या ट्रेनचा एका तासाला जास्तीत जास्त स्पीड 160 किलोमीटर असू शकतो पण त्यासाठी तसे ट्रॅक असण्याची आवश्यकता आहे. म्हणूनच सर्वप्रथम ट्रॅक्समध्ये सुधारणा केली जाणार आहे.
Share This Article