⁠  ⁠

Current Affair 17 December 2018

Chetan Patil
By Chetan Patil 5 Min Read
5 Min Read

सिंधूचा ‘सुवर्ण’योग!

  • BWF World Tour Finals : गुआंगझू येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत भारताच्या पी व्ही सिंधूने स्पर्धेच्या अंतिम फेरीत नोझुमी ओकुहारा हिला पराभूत करत या स्पर्धेचे पहिलेवहिले विजेतेपद पटकावले.
  • तिने ओकुहारा हिला २१-१९, २१-१७ अशा सरळ सेटमध्ये पराभूत केले आणि ऐतिहासिक विजय मिळवला. सिंधूचा हा कारकिर्दीतील ३०० वा विजय ठरला. सलग सात वेळा पराभव स्वीकरल्यानांतर अखेर सिंधूने विजेतेपद पटकावले.
  • या वर्षात सिंधूने एकही विजेतेपद जिंकले नव्हते. त्यामुळे हे विजेतेपद पटकावून तिने हंगामाचा शेवट गोड केला.
  • सिंधूने उपांत्य फेरीत रॅट्चनॉक इंटानॉन हिला २१-१६, २५-२३ असे पराभूत केले होते.
  • त्याआधी तिने उपांत्यपूर्व फेरीत अमेरिकेच्या झँग बीवन हिला २१-९, २१-१५ अशा सरळ गेममध्ये पराभूत केले. पहिल्या गेममध्ये सिंधूने बीवन हिला २१-९ अशा मोठ्या फरकाने पराभूत केले आणि सामन्यात आघाडी घेतली.

विक्रमसिंगे पुन्हा श्रीलंकेच्या पंतप्रधानपदी

  • श्रीलंकेच्या पंतप्रधानपदी पुन्हा एकदा रणिल विक्रमसिंगे यांचा शपधविधी झाला. अध्यक्ष मैथिरीपाल सिरीसेना यांनी पंतप्रधानपदी महिंदा राजपक्षे यांची नेमणूक करताना विक्रमसिंगे यांचे सरकार बरखास्त केले होते.
  • विक्रमसिंगे यांच्या शपथविधीने आता ५१ दिवसांचा घटनात्मक पेच संपुष्टात आला आहे. विक्रमसिंगे (वय ६९) हे युनायटेड नॅशनल पार्टीचे नेते असून त्यांना अध्यक्ष सिरीसेना यांनी अधिकारपदाची शपथ दिली.
  • सिरीसेना यांनीच त्यांना पदावरून काढून त्यांच्या जागी महिंदा राजपक्षे यांची नेमणूक २६ ऑक्टोबर रोजी केली होती.
  • तीस सदस्यांचे मंत्रिमंडळ असेल व त्यात श्रीलंका फ्रीडम पार्टीचे सदस्य सामील असतील. या पक्षाने विक्रमसिंगे यांना पाठिंबा दिला होता.

तापमानवाढीला आळा घालण्यावर देशांचे एकमत

  • जागतिक तापमानवाढ (ग्लोबल वॉर्मिंग) ही चिंताजनक बाब असून त्यावर तोडगा काढण्यासाठी सुमारे २०० देशांनी तयारी दाखवली आहे.
  • २०१५ मधील पॅरिस हवामान कराराबाबत वाद आणि ग्लोबल वॉर्मिंगचा फटका बसलेल्या देशांमध्ये वातावरणीय सुधारणा घडवून आणण्यासाठी संयुक्त राष्ट्रांकडून केला गेलेला प्रयत्न फसल्याच्या पार्श्वभूमीवर सर्व देशांच्या प्रतिनिधींनी एकत्र येऊन ग्लोबल वॉर्मिंग कमी करण्यासाठी स्टॅण्डर्ड रुलबुक तयार करून ते अनुसरण्याला होकार दर्शवला.
  • ही या ‘कोप२४’ पर्यावरण परिषदेची मोठीच जमेची बाजू ठरली आहे.
  • पॅरिस करारात जगाचे सध्याचे तापमान किमान दोन अंश सेल्सियसने खाली आणण्याचे उद्दिष्ट होते.
  • यासंदर्भात कोप२४ परिषदेचे अध्यक्ष व पोलिश अर्थतज्ज्ञ मिशल कुर्तिका यांनी सांगितले की ‘पॅरिस करार राबवणे ही मोठी जबाबदारी आहे.
  • या परिषदेत झालेल्या ठरावानुसार स्टॅण्डर्ड रुलबुक तयार केले जाणार असून त्याची अंमलबजावणी २०२०पासून होणार आहे. पृथ्वीचे तापमान दोन अंश सेल्सियसने खाली आणण्यावर सर्व देशांनी भर दिला आहे.

भूपेश बघेल छत्तीसगडचे नवे मुख्यमंत्री

  • छत्तीसगडच्या मुख्यमंत्रीपदी भूपेश बघेल यांची निवड करण्यात आली आहे.
  • शेतकरी कुटुंबातून आलेले भूपेश बघेल हे राजकारणातील आक्रमक नेते म्हणून प्रसिद्ध आहेत. ९० जागा असलेल्या छत्तीसगड विधानसभेत काँग्रेसने ६८ जागांवर विजय मिळवला आहे.
  • मध्य प्रदेशमधील दुर्ग (आता छत्तीसगड) मध्ये २३ ऑगस्ट १९६१ मध्ये बघेल यांचा जन्म झाला. त्यांनी ८० च्या दशकात काँग्रेसमधून राजकारणास सुरुवात केली होती. दुर्ग जिल्ह्यातील युवक काँग्रेसचे ते अध्यक्ष झाले. ते १९९० ते ९४ पर्यंत जिल्हा युवक काँग्रेस समितीचे अध्यक्ष होते.
  • १९९३ ते २००१ या कालावधीत ते मध्य प्रदेश गृहनिर्माण मंडळाचे निदेशक होते. २००० मध्ये जेव्हा छत्तीसगड वेगळे राज्य झाले तेव्हा ते पाटण मतदारसंघातून निवडून आले. याचदरम्यान ते कॅबिनेट मंत्रीही झाले. २००३ मध्ये काँग्रेस सत्तेतून बाहेर झाल्यानंतर भूपेश यांना विरोधी पक्षाचे उपनेतेपद देण्यात आले.

फिलिपाइन्सची काट्रियोना ग्रे ठरली यंदाची ‘मिस युनिव्हर्स’

  • बँकॉक येथे पार पडलेल्या ६७ व्या मिस युनिव्हर्स स्पर्धेत फिलिपाइन्सची काट्रियोना ग्रे यंदाची विश्वसुंदरी ठरली आहे.
  • साऊथ आफ्रिका आणि व्हेनेझुएलाच्या स्पर्धकांना मागे टाकत काट्रियोनाने हा किताब पटकावला असून हा किताब पटकावणारी ती फिलिपाइन्सची चौथी विश्वसुंदरी ठरली आहे.
  • थायलंडची राजधानी बँकॉकमध्ये आयोजित या स्पर्धेत जगभरातील ९३ स्पर्धकांनी भाग घेतला होता. शेवटच्या टॉप टेन स्पर्धकांमध्ये काट्रियोनासहीत दक्षिण आफ्रिका, व्हिएतनाम, व्हेनेझुएला, कोस्टा रिका, कुराकाओ, नेपाळ, कॅनडा, थायलंड आणि पुअर्तो रिकोच्या स्पर्धकांचा समावेश होता.
  • मात्र या सर्वांवर मात देत फिलिपिनो-ऑस्ट्रेलियन टेलिव्हिजनवर सूत्रसंचालक, गायिका म्हणून प्रसिद्ध असलेल्या काट्रियोनाने हा किताब पटकावला. या आधी फिलिपाइन्सने १९६९,१९७३ आणि २०१५ मध्ये विश्वसुंदरीचा किताब पटकावला आहे.

पुरुष हॉकी विश्वचषकात बेल्जियमने पटकावले विश्वविजेतेपद

  • सडनडेथपर्यंत रंगलेल्या रोमहर्षक सामन्यात बेल्जियमने नेदरलॅँडचा ३-२ गोलने पराभव करत हॉकीचे विश्वविजेतेपद पटकावले. येथील कलिंगा स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात निर्धारित वेळेत कोणत्याही संघाला गोल करत आला नाही.
  • पेनल्टी शूटआऊटवर हा सामना पुन्हा २-२ असा बरोबरीत राहिला. बेल्जियमने सडनडेथवर गोल करत प्रथमच जेतेपद पटकावले.
  • आॅस्ट्रेलियाला पराभूत करत अंतिम फेरीत दाखल झालेल्या नेदरलॅँडला कामगिरीची पुनरावृत्ती करता आली नाही.दोन्ही संघांनी गोल करण्याच्या अनेक संधी गमावल्या.
Share This Article