⁠  ⁠

Current Affair 13 January 2019

Chetan Patil
By Chetan Patil 3 Min Read
3 Min Read

आर्थिक मागास आरक्षण विधेयकाला राष्ट्रपतींची मंजुरी

  • आर्थिक मागास आरक्षण विधेयकाला राष्ट्रपतींनी मंजुरी दिली आहे.
  • आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्यांना १० टक्के आरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नोकरी आणि शिक्षण या दोहोंमध्ये आर्थिकदृष्ट्या मागासांना १० टक्के आरक्षण मिळावं म्हणून हे विधेयक ८ जानेवारीला लोकसबेत मांडलं. लोकसभेतील ३२६ खासदारांपैकी ३२३ जणांनी या विधेयकाच्या समर्थनार्थ मतदान केलं, तर तीन खासदारांनी विरोधात मतदान केलं.
  • या आरक्षणासाठी सध्या अस्तित्त्वात असलेल्या ४९ टक्क्यांच्या कोट्यात वाढ करण्यात येणार आहे. म्हणजेच आरक्षणाचा कोटा १० टक्के वाढून ५९ टक्के इतका होणार आहे.
  • या आरक्षणाचा फायदा कोणाला?
  • ब्राह्मण, ठाकूर, भूमिहार, कायस्थ, बनिया, जाट, गुजर समाजाला या आरक्षणाचा फायदा होणार आहे. शिक्षण आणि नोकरीमध्ये हे आरक्षण मिळणार आहे.

खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा : महाराष्ट्राचे पदकांचे शतक!

  • बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडानगरीत सुरू असलेल्या ‘खेलो इंडिया’ युवा क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी जलतरण, जिम्नॅस्टिक्स या क्रीडाप्रकारात छाप पाडली. महाराष्ट्राच्या १७ आणि २१ वर्षांखालील मुला-मुलींनी चमकदार कामगिरी करत पदकांची लयलूट केली. ४१ सुवर्ण, ३२ रौप्य आणि ४१ कांस्यपदकांची कमाई करत महाराष्ट्राने शनिवारी ११४ पदकांसह अग्रस्थान कायम राखले आहे.
  • महाराष्ट्राच्या खेळाडूंनी जलतरण आणि जिम्नॅस्टिक्समध्ये घवघवीत यश संपादन करत विविध खेळांमध्ये ९ सुवर्ण, ८ रौप्य, ६ कांस्यपदकांसह एकूण २३ पदकांची कमाई केली.
  • ज्युदोमध्ये मुलांच्या २१ वर्षांखालील गटात महाराष्ट्राच्या निशांत गुरव याला रौप्यपदक मिळाले. ७३ किलो गटात राजस्थानच्या हेमंत जैस्वाल याने अंतिम फेरीत निशांतला पराभूत केले.
  • नेमबाज राज्यवर्धन सिंग राठोड यांचा मुलगा मानवादित्य याने शनिवारी झालेल्या २१ वर्षांखालील ट्रॅप प्रकारात सुवर्णपदक मिळविले. महाराष्ट्राच्या हर्षवर्धन यादव याने २५ मीटर रॅपिड फायर पिस्तूलमध्ये कांस्यपदक पटकाविले.
  • महाराष्ट्राच्या पूनम सोनुने हिने ३००० मीटर धावण्याच्या शर्यतीत रौप्यपदक पटकावले. तिला हे अंतर पार करण्यासाठी १० मिनिटे ११.३३ सेकंद इतका वेळ लागला.
  • महाराष्ट्राच्या मल्लांना कुस्तीमधील २१ वर्षांखालील गटात चार कांस्यपदकांवर समाधान मानावे लागले. फ्रीस्टाइल प्रकारच्या या स्पर्धेतील ५७ किलो गटात ज्योतिबा अटकाळे याला कांस्यपदक मिळाले.

येस बँकेच्या अर्धवेळ अकार्यकारी अध्यक्षपदी ब्रह्मा दत्त यांची निवड

  • देशातील चौथ्या क्रमांकाची खासगी बँक असलेल्या येस बँकेच्या अर्धवेळ अकार्यकारी अध्यक्षपदी (नॉन -एक्झेक्युटिव्ह पार्ट टाईम चेअरमन) ब्रह्मा दत्त यांची निवड करण्यात आली आहे. ते 4 जुलै 2020 पर्यंत या पदावर कार्यरत राहणार आहेत. येस बँकेने यासंदर्भात रिझर्व्ह बँकेला माहिती दिली आहे.
  • त्यांनी या अगोदर स्वतंत्र निर्देशक म्हणून काम पाहिले आहे. दत्त हे एक निवृत्त नोकरशाह आहेत आणि त्यांनी स्वतंत्र निर्देशक म्हणून बँकेत काम पहिले आहे. ते निवृत्त आयएएस अधिकारी आहेत.
  • कर्नाटक केडरमध्ये त्यांनी आयएएस म्हणून 37 वर्षांची कारकीर्द आहे. त्याचबरोबर, केंद्र सरकारमध्ये रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाचे सचिव म्हणून कार्य केले आहे.

आसुसकडून जगातला पहिला नॉच डिस्प्लेचा लॅपटॉप लाँच

  • अमेरिकेच्या लास वेगासमध्ये ग्राहक प्रदर्शन शो (CES)२०१९ चे आयोजन करण्यात आले आहे.
  • २०१९ मध्ये आसुसने आपला सर्वात स्लीम अल्ट्राबुक असुस झेनबुक एस१३ (Asus ZenBook S13) हा लॅपटॉप लाँच केला आहे.
  • या लॅपटॉपमध्ये स्मार्टफोनसारखे फीचर देण्यात आले असून तो जगातील पहिला नॉच डिस्प्ले असलेला लॅपटॉप आहे.
Share This Article