⁠  ⁠

Current Affair 12 November 2018

Chetan Patil
By Chetan Patil 6 Min Read
6 Min Read

केंद्रीय मंत्री अनंत कुमार यांचे निधन

  • केंद्रीय रासायनिक आणि संसदीय कामकाज मंत्री अनंतकुमार यांचे रविवारी मध्यरात्री दीड वाजता कर्करोगाच्या आजाराने निधन झाले.
  • ते ५९ वर्षांचे होते. बेंगळूरू येथील आपल्या निवासस्थानी त्यांची प्राणज्योत मालवली.
  • बंगळुरुतील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते.
  • दक्षिण बेंगळूरू मतदारसंघातून ते सहा वेळा निवडून आले आहेत.

पहिल्या महायुद्धाच्या समाप्तीला १०० वर्षे पूर्ण

  • आजपासून १०० वर्षापूर्वी म्हणजेच १ नोव्हेंबर १९१८ रोजी चार वर्ष सलग सुरु असलेले महायुद्ध अखेर थांबले होते.
  • त्याकाळी तब्बल ११ लाख भारतीयांनी या महायुद्धात सहभाग घेतला होता.
  • यामध्ये तब्बल ७४ हजार भारतीय सैनिक शहीद झाले होते. तर ७० हजार नागरिक यामध्ये जखमी झाले होते.
  • आज जगभरात महायुद्धाला १०० वर्ष पूर्ण झाल्यानिमित्ताने सैनिकांना श्रद्धांजली वाहिली जात आहे.

पेट्रोल १७ पैशांनी तर डिझेल १६ पैशांनी

  • गेल्या काही दिवसांपासून देशात इंधन दरात कपात होताना दिसत आहे.
  • मुंबईत आज पेट्रोलच्या दरात १७ पैशांनी तर डिझेलच्या दरात १६ पैशांची कपात करण्यात आली आहे. मुंबईत पेट्रोलचे दर प्रति लिटर ८३.०७ तर डिझेल ७५.७६ रुपये इतके आहे.
  • गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील स्थितीनुसार देशातील इंधन दरात सातत्याने अल्प घट होताना दिसत आहे.

भारताची वेस्ट इंडिजवर मात

  • शिखर धवनने १० चौकार आणि २ षटकारांसह केलेली ९२ धावांची झंझावाती खेळी आणि ऋषभ पंतचे अर्धशतक (५८) या जोरावर भारताने वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-२० मालिकेतील तिसरा व अखेरचा सामना ६ विकेटसनी जिंकला.
  • या विजयासह कसोटी, वनडेनंतर भारताने टी-२० मालिकाही जिंकून या संपूर्ण दौऱ्यात आपले वर्चस्व सिद्ध केले.

चीनने गेल्या दोन दशकांमधला आर्थिक विकासदराचा नीचांक नोंदवला

  • चीनने अलीकडेच गेल्या दोन दशकांमधला आर्थिक विकासदराचा नीचांक नोंदवला. तसेच, वीस वर्षांमध्ये पहिल्यांदाच चीनला आंतरराष्ट्रीय व्यवहारांच्या चालू खात्यावर तूट आली. या पार्श्वभूमीवर ट्रम्प आणि जिनपिंग यांची या महिन्याअखेरीला होत असलेली भेट जागतिक वित्तीय बाजारांसाठीही महत्त्वाची आहे.
  • अलीकडच्या काही दिवसांमध्ये चिनी अर्थव्यवस्थेने बऱ्यापैकी अपवादात्मक म्हणता येईल, एक म्हणजे, सप्टेंबरमध्ये संपलेल्या तिमाहीत चिनी अर्थव्यवस्था ६.५ टक्कय़ांनी वाढली.
  • २०१९ मध्ये चीनची अर्थव्यवस्था ६.२ टक्कय़ांनीच वाढेल, असा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा ताजा अंदाज आहे. पुढल्या वर्षीच्या चीनच्या विकासदरासाठी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा आधीचा अंदाज ६.४ टक्के  होता. अंदाजातली ही कपात प्रामुख्याने चीन आणि अमेरिकेतल्या व्यापार युद्धामुळे करण्यात आली आहे.

‘शत्रू शेअर्स’ विक्रीसाठी लवकरच नियमावली

  • केंद्रीय निर्गुंतवणूक विभागातर्फे लवकरच शत्रू शेअर्सच्या विक्रीसाठी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करण्यात येणार आहेत.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाने गेल्याच आठवड्यात शत्रू संपत्तीमध्ये मोडणाऱ्या शेअरच्या विक्रीला परवानगी दिली आहे. यातून किमान तीन हजार कोटी रुपयांचे उत्पन्न होण्याची शक्यता आहे.
  • पाकिस्तान आणि चीनला कायमस्वरूपी गेल्यामुळे ज्यांची संपत्ती देशात राहिली आहे, अशा संपत्तीला शत्रू संपत्ती असे म्हणतात. ही मंडळी सध्या देशाचे नागरिक नाहीत
  • गृह मंत्रालयाच्या अंतर्गत ‘भारत शत्रू संपत्ती संरक्षक’च्या (सीआयपीआय) अंतर्गत ९९६ कंपन्यांमध्ये २० हजार ३२३ समभागधारकांचे ६.५० कोटी समभाग आहेत.
  • या ९९६ कंपन्यांपैकी ५८८ कंपन्या सक्रिय आहेत. त्यातील १३९ कंपन्या नोंदणीकृत असून, ४४९ कंपन्यांची शेअर बाजारात नोंद नाही. सध्याच्या बाजारभावानुसार या कंपन्यांच्या समभागांची एकूण किंमत तीन हजार कोटी रुपयांच्या घरात आहे
  • गेल्या वर्षी संसदेने शत्रू संपत्ती विधेयक १९६८मध्ये बदल केले. त्यामुळे भारताची फाळणी होत असताना पाकिस्तान आणि चीनमध्ये वास्तव्यासाठी गेलेल्या मंडळींना भारतात राहिलेल्या संपत्तीवर कोणत्याही प्रकारचा मालकी हक्क सांगता येणार नाही

सरकारने एका वर्षात बदलली २५ शहरांची नावे

  • सत्तेत आल्यापासून शहरांची नावे बदलणाऱ्यांमध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ काही एकटेच नाहीत.
  • केंद्र सरकारने गेल्या एका वर्षात तब्बल २५ शहरांची नावे बदलण्यास मंजुरी दिली आहे. या यादीमध्ये अलाहाबाद, फैजाबाद या दोन्हीदेखील समावेश होता.
  • शहरांची नाव बदलण्याची मागणी करण्यात येत आहे. यासाठी अनेक प्रस्ताव केंद्राकडे पाठविण्यात आले आहेत. या यादीमध्ये पश्चिम बंगालच्या नामांतराचा प्रस्ताव अगक्रमावर आहे. पश्चिम बंगालचे नाव बदलून बांग्ला करण्यात यावे अशी मागणी जोर धरते आहे

गेल्या 6 महिन्यांत भारतात 4.36 लाखाहून अधिक सायबर हल्ले!

  • भारतातील सायबर हल्ल्यांच्या प्रमाणात वाढ होत आहे. यावर्षी जानेवारीपासून पहिल्या सहा महिन्यात जवळपास म्हणजेच जानेवारी ते जून या कालावधीत सायबर हल्ल्याचे तब्बल 4.36 लाखाहून अधिक गुन्हे घडले आहेत.
  • अमेरिकेसह रशिया, चीन आणि नेदरलँड येथून झालेल्या सायबर हल्ल्यांचे प्रमाण हे सर्वाधिक असल्याची माहिती आता समोर आली आहे. एफ सेक्युअर या सायबर सुरक्षेसंबंधी संस्थेच्या अहवालामध्ये याबाबत सांगण्यात आले आहे.
  • रशियातून भारतात सर्वाधिक म्हणजेच तब्बल 2,55,589 सायबर हल्ले करण्यात आले आहेत.
  • त्यानंतर अमेरिकेतून 1,03,458, चीनमधून 42,544, नेदरलँडमधून 19,169 आणि जर्मनीतून 15,330 सायबर हल्ले करण्यात आले आहेत. भारतातून परदेशात केल्या जाणाऱ्या सायबर हल्ल्याबाबतही यामध्ये माहिती देण्यात आली आहे.
  • भारतातून 35,563 सायबर हल्ले करण्यात आले असून ऑस्ट्रिया, नेदरलँड, ब्रिटन, जपान आणि युक्रेन या देशात ते करण्यात आले आहेत.

प्रदूषणाला रोखण्यासाठी चीनमध्ये सर्वात मोठी मशीन!

  • वाढत्या प्रदूषणासोबत दोन हात करण्यासाठी चीनने जगातलं सर्वात मोठं एअर प्युरिफायर तयार केलं आहे.
  • १०० मीटर लांब उंच या प्यूरिफायरने प्रदूषणामुळे खराब होणारी हवा स्वच्छ करण्यास मदत होणार आहे. हे प्यूरिफायर चीनच्या शांक्शी प्रांतातील झियान शहरात एका टॉवरवर लावण्यात आलं आहे.
  • या टॉवरने शहराच्या १० किमी क्षेत्रातील हवा स्वच्छ करण्यास मदत मिळेल. याचा अर्थ हा की, याने पूर्ण शहरातील हवा स्वच्छ करण्यासोबतच शहराच्या आजूबाजूच्या परिसरातीलही हवा स्वच्छ होईल.
  • या प्यूरिफायरने रोज १ कोटी घनमीटर हवा स्वच्छ केली जाते. इतकेच नाही तर हे प्यूरिफायर हवा स्वच्छ करण्यासोबतच स्मॉगही १५ ते २० टक्के कमी करते.
  • सध्या दिल्लीसह देशातील आणखीही काही शहरांमध्ये प्रदूषणाचा विळखा वाढला आहे. प्रदूषणावर जागतिक आरोग्य संघटनेचा रिपोर्ट धक्कादायक आहे. WHOच्या रिपोर्टनुसार, गेल्यावर्षी विषारी हवेमुळे भारतात जवळपास १ लाख मुलांचा मृत्यू झाला होता. तर दिल्ली एनसीआरमध्ये प्रदूषणामुळे दरवर्षी साधारण ३० हजार लोकांना आपला जीव गमवावा लागतो.
Share This Article