⁠  ⁠

Current Affair 12 January 2019

Chetan Patil
By Chetan Patil 4 Min Read
4 Min Read

नॅशनल स्टॉक एक्सचेंजचे अध्यक्ष अशोक चावला यांचा राजीनामा

  • नॅशनल स्टॉक एक्सचेंजचे (एनएसई) अध्यक्ष अशोक चावला यांनी अचानक आपल्या पदाचा राजीनामा दिला. राजीनाम्याआधी काही वेळापूर्वीच केंद्र सरकारला सीबीआयमार्फत एअरसेल-मॅक्सिस प्रकरणामध्ये चावला यांच्याविरोधात खटला भरण्याला परवानगी मिळाली होती. या महत्वपूर्ण घडामोडीनंतर लगेचच चावला यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.
  • माजी वित्त सचिव असलेले चावला हे २८ मार्च २०१६ रोजी एनएसईचे अध्यक्ष बनले. त्यांनी भारतीय नागरविकास विमान सचिवही म्हणूनही काम पाहिले आहे.
  • चावला यांनी गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये येस बँकेच्या अध्यक्षपदावरुन राजीनामा दिला होता. यापूर्वी सीबीआयने दिल्लीच्या एका कोर्टात सांगितले होते की, केंद्राने पाच लोकांविरोधात खटला भरण्यास परवानगी दिली आहे. यामध्ये विद्यमान आणि काही माजी अधिकाऱ्यांचा समावेश आहेत.

वर्ष आवर्तसारणीचे

  • मेंडेलीव्ह आवर्तसारणीस यंदा दीडशे वर्षे पूर्ण होत असून, ‘युनेस्को’ने यंदाचे २०१९ हे वर्ष आंतरराष्ट्रीय आवर्तसारणी वर्ष घोषित केले आहे.
  • रसायनशास्त्रात मूलद्रव्यांच्या आवर्तसारणीला (पीरिऑडिक टेबल ऑफ एलिमेंट्स) अनन्य महत्त्व आहे. ती मांडण्याचा प्रयत्न दिमित्री मेंडेलीव्ह या रशियन शास्त्रज्ञाने केला. तो शोधनिबंध दीडशे वर्षांपूर्वी म्हणजे १८६९ मध्ये प्रसिद्ध झाला. सध्या जी आवर्तसारणी वापरली जाते ती मेंडेलीव्ह आवर्तसारणीचे सुधारित स्वरूप आहे.
  • मेंडेलीव्ह आवर्तसारणीस दीडशे वर्षे पूर्ण होत आहेत; तसेच रसायनशास्त्रातील काही नियम वा ठराव करण्याचे अधिकार असणारी ‘इंटरनॅशनल युनियन फॉर अँड अप्लाईड केमिस्ट्री’ (आययूपीएससी) या संघटनेच्या स्थापनेस शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. याचे औचित्य साधून ‘युनेस्को’ने यंदाचे २०१९ हे वर्ष आंतरराष्ट्रीय आवर्तसारणी वर्ष घोषित केले आहे.

सीबीआय संचालक पदावरून हटवण्यात आलेल्या
आलोक वर्मांचा राजीनामा

  • सीबीआय संचालक पदावरून हटवण्यात आलेल्या आलोक वर्मांनी राजीनामा दिला आहे. आलोक वर्मा यांना निवड समितीने गुरुवारीच सीबीआयच्या संचालकपदावरून हटवले. त्यानंतर त्यांची वर्णी डी.जी. फायर सर्व्हिसेस अँड होम गार्ड या पदावर करण्यात आली.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी, जस्टिस ए. के. सिकरी आणि काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांची त्रिसदस्यीय समिती नेमण्यात आली होती. या समितीत खर्गे यांनी संचालकपदी आलोक वर्मा राहावेत या बाजूने मतदान केले.
  • निवड समितीने दिलेल्या या निर्णयानंतर आलोक वर्मा यांची बदली डीजी फायर सर्व्हिसेस अँड होमगार्ड या पदावर करण्यात आली. मात्र हे पद न स्वीकरता त्आलोक वर्मा यांनी राजीनामा देणेच पसंत केले.

टेनिसस्टार अँडी मरेचे निवृत्तीचे संकेत

  • जागतिक क्रमवारीत एकेकाळी अव्वल स्थानी असलेला ब्रिटिश टेनिसस्टार अँडी मरे याने टेनिसमधून निवृत्ती घेण्याचे संकेत दिले आहेत.
  • कमरेच्या दुखापतीमुळे त्याला अधिक काळ टेनिस खेळणे शक्य होणार नाही. त्यामुळे ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा ही त्याची शेवटची स्पर्धा असेल असे संकेत त्याने दिले. तीन वेळा ग्रँड स्लॅम विजेतेपद पटकावलेला मरे याने गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेदरम्यान कमरेच्या दुखापतीने हैराण केल्यामुळे माघार घेतली होती.

अर्थतज्ञ मीरा सन्याल यांचे निधन

  • अर्थतज्ञ आणि भारतातील स्कॉटलंड बँकेच्या माजी सीईओ मीरा सन्याल यांचे निधन झाले. वयाच्या 57 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
  • सन 2014 मध्ये आम आदमी पक्षांकडून लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी त्यांनी आपले बँकींग क्षेत्रातील करिअर सोडले होते.
  • नुकतेच नोव्हेंबर महिन्यात त्यांनी नोटाबंदीशी संबधित The Big Reverse नावाने एक पुस्तकही प्रकाशित केले होते.

बिल गेट्स पुन्हा बनू शकतात जगातील सर्वात श्रीमंती व्यक्ती

  • अॅमेझॉनचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जेफ बेझॉस यांनी २५ वर्षांच्या संसारानंतर घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे. पत्नी मॅकेन्झीपासून ते विभक्त होणार आहेत. अमेरिकन वर्तमानपत्र नॅशनल इनक्वायररनुसार हा जगातला सर्वात महागडा घटस्फोट ठरु शकतो तसेच या घटस्फोटाची प्रकिया झाल्यानंतर बिल गेट्स पुन्हा एकदा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरु शकतात.
  • या जोडप्याकडे ४ लाख एकर जमीन आहे. बेझॉस यांना चार मुले आहेत. घटस्फोटामुळे त्यांच्या एकूण संपत्तीमध्ये मोठा फरक पडू शकतो. श्रीमंतांच्या जागतिक क्रमवारीमधील त्यांचे स्थान बदलू शकते.
  • बेझॉस आणि मॅकेन्झी यांच्यामध्ये संपत्तीचे समान वाटप झाले तर मॅकेन्झी यांना ६९ बिलियनची संपत्ती मिळू शकते. ज्यामुळे त्या जगातील सर्वात श्रीमंत महिला ठरु शकतात.
  • घटस्फोटानंतर संपत्तीची विभागणी झाली तर मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स पुन्हा एकदा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरु शकतात. त्यांच्याकडे सध्या ९२.५ बिलियन डॉलरची संपत्ती आहे.
Share This Article