Current Affair 10 January 2019

0
31

भारताएवढय़ा भूभागावर चिनी रडाराचे लक्ष

 • चीनने नौदलासाठी नवीन रडार तयार केले असून त्याच्या मदतीने भारताच्या आकाराएवढय़ा प्रदेशाचा वेध सतत घेता येतो किंवा सतत त्या भागावर टेहळणी करणे शक्य आहे, असे वृत्त आहे.
 • नचे हे स्वदेशी बनावटीचे रडार चीनच्या नौदलासाठी महत्त्वाचे असून त्याच्या मदतीने चिनी सागरावर लक्ष ठेवता येणार आहे शिवाय शत्रू देशांची जहाजे, विमाने व क्षेपणास्त्रे त्याच्या निरीक्षणाच्या टप्प्यात येतात. चीनच्या ‘ओव्हर द होरायझन’ या रडार कार्यक्रमात सहभागी असलेल्या एका वैज्ञानिकाने ‘साऊथ चायना मॉर्निग पोस्ट’ या वृत्तपत्राला ही माहिती दिली आहे.
 • या रडारचा आकार आटोपशीर आहे. चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांनी देशाचा सर्वोच्च विज्ञान पुरस्कार लिऊ व लष्करी वैज्ञानिक कियान किहू यांना बीजिंग येथे ग्रेट हॉल ऑफ दी पीपल येथे झालेल्या कार्यक्रमात प्रदान करण्यात आला.
 • कियान यांना चीनच्या आधुनिक शिक्षण अभियांत्रिकीसाठी सैद्धांतिक प्रणाली तयार करण्यासाठी पुरस्कार देण्यात आला आहे. भूमिगत अण्वस्त्रविरोधी आश्रय सुविधा त्यांनी तयार केली आहे. लिऊ यांनी जहाजाच्या आकाराचे ओटीएच रडार तयार केले असून त्यामुळे पीपल्स लिबरेशन आर्मीची टेहळणी क्षमता वाढली आहे.

काश्मिरी अधिकारी फैजल यांचा राजीनामा

Advertisement
 • यूपीएससी परीक्षेत अव्वल क्रमांक पटकावणारे पहिले काश्मिरी ठरलेले, सन २००९च्या तुकडीतील आयएएस अधिकारी शाह फैजल यांनी सेवेचा राजीनामा दिला. काश्मीरमध्ये सातत्याने होत असलेल्या हत्या आणि भारतीय मुस्लिमांना दिली जात असलेली दुय्यम वागणूक याच्या निषेधार्थ राजीनामा देत असल्याचे ३५ वर्षीय फैजल यांनी सांगितले.
 • ‘काश्मीरमध्ये सातत्याने होणाऱ्या हत्या, त्या रोखण्यासाठी केंद्र सरकारकडून केले जाणारे अपुरे प्रयत्न, हिंदूत्ववादी गटांकडून २० कोटी भारतीय मुस्लिमांना दिली जाणारी दुय्यम वागणूक, जम्मू-काश्मीर राजाच्या स्वतंत्र ओळखीवर हल्ले करून ती पुसण्यासाठी केले जाणारे प्रयत्न आणि अति-राष्ट्रवादाच्या नावाखाली राज्यात पसरवली जाणारी असहिष्णुता आणि वैरभाव या विरोधात कार्य करण्यासाठी मी राजीनामा देत आहे,’ असे फैजल यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे.

भारतीय हॉकी संघाच्या प्रशिक्षकपदावरून हरेंद्र सिंग यांची हकालपट्टी

 • हरेंद्र सिंग यांची बुधवारी भारतीय हॉकी संघाच्या प्रशिक्षकपदावरून हकालपट्टी करण्यात आली. २०१८ मधील खराब कामगिरीमुळे हरेंद्र सिंग यांची भारतीय हॉकी संघाच्या प्रशिक्षकपदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे. त्यांना आता राष्ट्रीय हॉकी महासंघाने कनिष्ठ संघाचे प्रशिक्षकपद भूषविण्याचा प्रस्ताव दिला आहे.
 • २०२० आणि २०२५ ऑलिम्पिक स्पर्धेसाठी भारताची युवा फळी अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने हरेंद्र सिंग यांच्याकडे कनिष्ठ संघाचे प्रशिक्षकपद देण्याचा निर्णय हॉकी इंडियाची उच्चा कामगिरी आणि सुधार समितीच्या बैठकीत घेण्यात आला.
 • भारताच्या कनिष्ठ संघाला जगज्जेतेपद मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावणाऱ्या हरेंद्र सिंग यांनी भारताच्या वरिष्ठ संघाची सूत्रे हाती घेतली. पण राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला पदकाविनाच मायदेशी परतावे लागले. त्यानंतरही ते संघाचे नशीब पालटू शकले नाहीत.

देशाचा जीडीपी दर 7.3 टक्के राहील, वर्ल्ड बँकेचा अंदाज

 • आर्थिक वर्ष 2018-19 मध्ये भारत, जगभरात सर्वाधिक वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एक देश असेल, असे वर्ल्ड बँकनं जाहीर केलेल्या अहवालामध्ये मांडण्यात आले आहे.
 • वर्ल्ड बँकेकडून यासंबंधीचा अहवाल जारी करण्यात आला. या अहवालानुसार, सुरू असलेल्या आर्थिक वर्षादरम्यान (2018-19) भारताचा जीडीपी 7.3% दरानं वाढेल. भारताच्या तुलनेत चीनचा विकास दर 6.3% राहील, अशी आशा वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, 2018मध्ये चीनचा जीडीपी दर 6.5 टक्के एवढा होता.
 • वर्ष 2018-2019मध्ये भारताचा जीडीपी दर 7.3 टक्के एवढा राहील. तर 2019 आणि 2020 वर्षात यामध्ये वाढ होऊन जीडीपी दर 7.5 टक्क्यांपर्यंत पोहोचेल. व्यवसायाच्या क्रमवारीत भारतानं वेगवान प्रगतीची नोंदणी केली आहे. भारत देश म्हणजे सर्वात वेगाने वाढणारी मोठी अर्थव्यवस्था आहे”.
 • यंदाच्या आर्थिक वर्षात (2018-19) बहुतेक देशांच्या अर्थव्यवस्थेचा वेग तुलनेनं मंदावणार आहे, असेही ‘ग्लोबल इकोनॉमिक प्रॉस्पेक्ट्स : डार्कनिंग स्कायज’च्या अहवालात सांगण्यात आले आहे.

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीचा पत्नीपासून विभक्त

 • अॅमेझॉनचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जेफ बेझॉस आपल्या पत्नीपासून विभक्त होत आहेत.
 • 25 वर्षाच्या संसारानंतर जेफ बेझॉस आणि मॅकेन्झी यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. जेफ बेझॉस जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यांच्याकडे 137 बिलियन डॉलर इतकी संपत्ती आहे. जेफ बेझॉस यांनी 1994 मध्ये अॅमेझॉनची स्थापना केली होती.
Advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here