⁠  ⁠

Current Affair 10 December 2018

Chetan Patil
By Chetan Patil 3 Min Read
3 Min Read

चार आंतरराष्ट्रीय विमानतळ असलेले देशातील एकमेव राज्य ‘केरळ’

  • केरळमधील कुन्नूर येथे नव्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचे 9 डिसेंबर रोजी उद्घाटन करण्यात आले.
  • केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू आणि केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन यांनी या आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन केले.
  • याबरोबरच 4 आंतरराष्ट्रीय विमानतळ असलेले केरळ हे भारतातील पहिलेच राज्य ठरले आहे.
  • कुन्नूर येथे सुमारे 2000 एकर परिसरात हे विमानतळ उभारले असून यासाठी 1800 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे.
  • केरळमध्ये कुन्नूर विमानतळाशिवाय तिरुवनंतपुरम, कोच्ची आणि कोझिकोड हे आंतरराष्ट्रीय विमानतळ सध्या कार्यरत आहेत.

१० डिसेंबरला जगभरात ‘आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिवस’ साजरा

  • दरवर्षी १० डिसेंबरला जगभरात ‘आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिवस’ साजरा केला जातो.
  • संयुक्त राष्ट्र संघ मानवाधिकार कार्यालयाच्या (UNHRO) नेतृत्वात जगभरात हा दिवस साजरा केला जातो. समाजातील प्रत्येक व्यक्तीचे स्वातंत्र्य अबाधित राहावे, तसेच या व्यक्तीला सन्मानपूर्वक जगता यावे यासाठी १० डिसेंबर हा जागतिक मानवाधिकार दिवस म्हणून साजरा केला जातो.
  • मानवाधिकाराचे वैश्विक घोषणापत्र संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने १० डिसेंबर १९४८ रोजी पॅरिस येथे स्वीकारलेले घोषणापत्र आहे. जगभरातील लोकांना मानवाधिकाराकडे आकर्षित करण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघाने १९५० मध्ये १० डिसेंबर हा दिवस मानवाधिकार दिवस म्हणून घोषीत केला.
  • जगभरातील सर्व देशांना १० डिसेंबर हा दिवस मानवाधिकार दिवस म्हणून साजरा करण्याच्या सुचना दिल्या. तेव्हापासून जगभरात १० डिसेंबर हा जागतिक मानवाधिकार दिवस म्हणून साजरा केला जातो.
  • मानवाधिकार म्हणजे काय?-
  • मानवाधिकार म्हणजे सर्व मनुष्य प्राण्यांचे मूलभूत अधिकार आहेत, जे त्याच्या राष्ट्रीयत्व, रहिवासी, लिंग, जात, वर्ण, धर्म, भाषा किंवा इतर कोणत्याही स्थितीवर अवलंबून नसतात. यामध्ये कुठल्याही प्रकराचा भेदभाव नसतो. वैश्विक मानवाधिकारांचे संरक्षण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय कायदे, करार, सराव, सर्वसाधारण तत्त्वे आणि आंतरराष्ट्रीय कायद्याचे अन्य स्रोत अश्या विविध पद्धतीचा अवलंब केला जातो.

करण सिंगला सलग दुसरे विजेतेपद

  • भारतीय सैन्यदलाच्या करण सिंगने आपला दबदबा कायम राखत यंदादेखील वसई-विरार महापौर मॅरेथॉन शर्यतीत सलग दुसऱ्या वर्षी बाजी मारली, तर प्राजक्ता गोडबोले आणि शंकर थापा यांनी अर्धमॅरेथॉन शर्यत जिंकण्याची किमया साधली.
  • करणने त्याची अल्पशी आघाडी अखेपर्यंत कायम राखत ४२ किलोमीटरचे अंतर २ तास २२ मिनिटे ४२ सेकंद या वेळेत पूर्ण केले. द्वितीय क्रमांकावर आलेल्या लालजी यादवने २ तास २२ मिनिटे ५८ सेकंद तर तृतीय क्रमांकावरील शामरू जाधवने २ तास २३ मिनिटे ०८ सेकंद वेळ नोंदवली. करणने अनुभवाच्या बळावर पुन्हा एकदा पूर्ण मॅरेथॉन स्पर्धेवर छाप पाडली.
  • महिला अर्धमॅरेथॉन स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुलींचा दबदबा राहिला.
  • नागपूरच्या प्राजक्ता गोडबोलेने १ तास १८ मिनिटे ५६ सेकंद अशी वेळ देत प्रथमच महिलांच्या गटात विजेतेपद पटकावले, तर मंजू यादवने १ तास १९ मिनिटे ३० सेकंद आणि नाशिकच्या आरती पाटीलने १ तास १९ मिनिटे ५० सेकंदांची वेळ नोंदवत तृतीय क्रमांक पटकावला. महाराष्ट्राच्याच किरण सहदेव आणि जनाबाई हिरवे या अनुक्रमे चौथ्या आणि पाचव्या स्थानावर राहिल्या.

भारत-चीन सराव ११ डिसेंबरपासून

  • दहशतवादाविरोधात लढण्यासाठी आपल्या क्षमतांमध्ये वाढ करण्यासाठी आणि परस्परांमध्ये सामंजस्य वाढविण्यासाठी भारत आणि चीन दरम्यान वर्षभराच्या अंतरानंतर चीनच्या चेंगडू शहरात संयुक्त लष्करी सरावाला ११ डिसेंबर रोजी सुरुवात होणार आहे.
  • ‘हँड इन हँड’या सातव्या भारत-चीन संयुक्त लष्करी सरावात दोन्ही देशांचे १०० सैनिक सहभागी होणार असल्याची माहिती चीनच्या लष्करी मंत्रालयाचे प्रवक्ते कोल रेन ग्युयोकियांग यांनी दिली.
Share This Article