⁠  ⁠

Current Affair 09 December 2018

Chetan Patil
By Chetan Patil 4 Min Read
4 Min Read

चंद्राचा वेध घेण्यासाठी चीनचे यान झेपावले

  • चीनचे चांद्रयान शनिवारी सकाळी यशस्वीरीत्या झेपावले असून ते चंद्राच्या आतापर्यंतच्या सर्वात दूरच्या भागात उतरणार आहे. अवकाश क्षेत्रात महाशक्ती होण्याची चीनची महत्त्वाकांक्षा असून त्या दिशेने हे पाऊल आहे. चेंज ४ हे चांद्र शोधक यान असून मार्च ३ बी प्रक्षेपकाच्या मदतीने ते नैर्ऋत्य चीनमधील शिचांग प्रक्षेपण केंद्रावरून मार्गस्थ झाले.
  • चंद्राच्या अद्याप अभ्यासल्या न गेलेल्या भागात चीनचे बग्गीसारखी रोव्हर गाडी असलेले हे यान उतरणार असून चंद्राची एक बाजू कधीच पृथ्वीला सामोरी येत नाही त्या अंधाऱ्या बाजूकडील भागात हे यान उतरणार असून १९५९ मध्ये सोविएत युनियनने त्याच्या पहिल्या प्रतिमा घेतल्या होत्या.
  • या भागात यान उतरवणारा चीन हा पहिला देश ठरणार आहे. चीन गेली १० ते २० वर्षे अमेरिका व सोविएत रशिया यांनी १९६०-१९७० या काळात जी प्रथमोचित कामगिरी केली त्यावर मात करण्याचा प्रयत्न करीत आहे
  • चीनचे सहा तर इतर देशांचे चार प्रयोग समाविष्ट आहेत. चंद्रावरील रात्र पृथ्वीवरील १४ दिवसांसमान असते. त्या वेळी तेथील तापमान उणे १७३ अंश सेल्सियस असते. तेथील दिवस पृथ्वीवरील १४ दिवसांसमान असतो, तेव्हा तापमान १२७ अंश सेल्सियस असते.

मेक्सिकोची व्हेनेसा पोन्स डे लियॉन ठरली मिस वर्ल्ड 2018

  • मेक्सिकोच्या व्हेनेसा पोन्स डे लियॉन या वर्षीचा मिस वर्ल्डचा किताब पटकावला. मागील वर्षीची मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरने व्हेनेसाच्या डोक्यावर क्राऊन घातला. चीनच्या सान्या या शहरामध्ये ही स्पर्धा रंगली होती. व्हेनेसा पोन्स डे लियॉन ही 68 व्या मिस वर्ल्ड स्पर्धेतली विजेती स्पर्धक ठरली आहे. थायलँडची निकोलेन पिशापा ही फर्स्ट रनर अप ठरली आहे.
  • मिस वर्ल्ड 2018 हा किताब मिळवलेल्या व्हेनेसाने इंटरनॅशनल बिझनेस कोर्स केला आहे. सध्या ती मुलींसाठी चालवण्यात येणाऱ्या एका पुनर्वसन केंद्राच्या संचालकांपैकी एक संचालक आहे.

संयुक्त राष्ट्रे – हीथर नॉअर्ट होणार अमेरिकेच्या नव्या राजदूत

  • अमेरिकेन परराष्ट्र विभागाच्या प्रवक्त्या हीथर नॉअर्ट या संयुक्त राष्ट्रांमधील अमेरिकेच्या नव्या राजदूत होणार आहेत. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प नॉअर्ट यांची नियुक्ती करतील.
  • नॉअर्ट या फॉक्स न्यूजच्या माजी अँकर आहेत. त्या निक्की हेली यांच्या जागी पदभार सांभाळतील. निक्की हेली यांनी ऑक्टोबरमध्ये पद सोडण्याचे संकेत दिले होते.

परदेशातून भारतात पैसे पाठवण्यात भारतीय पहिल्या क्रमांकावर!

  • परदेशामधून भारतात पैसे पाठवण्यात भारतीय पहिला क्रमांकावर आहे. भारतीय आपले पैसे परदेशात गुंतवण्यात पहिल्या क्रमांकावर असल्याचं स्थान यंदाही कायम राखलं आहे. वर्ल्ड बँकेच्या अहवालानुसार, या वर्षी परदेशात असलेल्या भारतीयांनी आपल्या देशात 80 अब्ज डाॅलर भारतात पाठवले आहेत. यात चीनचा दुसरा क्रमांक लागला आहे.
  • वर्ल्ड बँकेच्या ‘माइग्रेशन अँड रेमिटेंस’च्या अहवालानुसार, पैसे साठवण्याच्या बाबतीत भारतीय सर्वात पुढे आहे. विकसनशील देशांना अधिकाधिक प्रमाणात पैसे पाठवण्यात 2018 मध्ये 10.8 टक्के वाढ झाली असून 528 अब्ज डॉलर इतकी रक्कम पाठवली जाते.
  • मागील वर्षी हाच आकडा 7.8 टक्के होता. जगभरातून काळा पैसा यावेळी 10.3 टक्कांनी वाढून 689 अब्ज डॉलर इतका झाल्याची शक्यता आहे.

शेवटच्या देशातही उगवली इंटरनेट स्वातंत्र्याची नवी पहाट…!

  • अमेरिकेसारख्य़ा महासत्तेला अनेक दशके कडवी टक्कर देणाऱ्या कॅरेबियन बेटांवरील छोटासा देश क्युबामध्ये नुकतीच सार्वजनिक इंटरनेट सुविधा सुरु झाली. या देशातील नागरिक अनेक वर्षे इंटरनेटपासून दूर होते. या देशात आधीही इंटरनेट होते. मात्र, त्याचा वापर मर्यादित होता. इंटरनेट सेवा नसणारा हा जगातील शेवटचा देश होता.
  • क्युबामध्ये थ्रीजी इंटरनेट सेवा सुरु करण्यात आली असून टेलिकॉम कंपनी ETECSA ही सेवा देत आहे. या कंपनीने इंटरनेटचा प्लॅनही जाहीर केला असून नागरिकांना प्रती महिन्यासाठी 30 डॉलर म्हणजेच 2100 रुपये भरावे लागणार आहेत. यामध्ये केवळ 4 जीबी डेटा मिळणार आहे.
  • भारतात 3 रुपयांच 1 जीबी डेटा मिळतो. तर या क्युबामध्ये यासाठी 525 रुपये मोजावे लागणार आहेत. भारतात 4 जी सेवेने विस्तार केला असून 5 जी सेवाही येऊ घातली आहे.
Share This Article