Current Affair 05 January 2019

0
27

भारतीय विज्ञान कॉंग्रेस संमेनल

 • सौरऊर्जेवर चालणारे पीक काढणारे यंत्र, वापरलेल्या खाद्यतेलापासून साबण, अपंगांना मदत करणारा यंत्रमानव अशा बालवैज्ञानिकांच्या आविष्कारांनी भारतीय विज्ञान काँग्रेसमधील ‘किशोर वैज्ञानिक संमेलन‘ सजले आहे. या संमेलनाचे उद्घाटन नोबेल विजेत्या संशोधकांच्या हस्ते 4 जानेवारी रोजी करण्यात आले.
 • देशभरातून कानाकोपऱ्यातील विद्यार्थ्यांचे विज्ञान प्रकल्प संमेलनाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या प्रदर्शनात मांडण्यात आले आहेत. शेतीच्या अवजारांपासून ते यंत्रमानवापर्यंत विविध प्रकल्प विद्यार्थ्यांनी साकारले आहेत.
 • आंध्र प्रदेश येथील विद्यार्थ्यांनी पिकांची काढणी करणारे यंत्र तयार केले आहे. हे यंत्र सौरऊर्जेवर चालते. छोटय़ा शेतांमध्ये काम करण्यासाठी किफायतशीर पर्याय विद्यार्थ्यांनी तयार केला आहे. अपंग, रुग्णालयात दाखल झालेले रुग्ण यांना मदत करणारा यंत्रमानव दिल्ली येथील विद्यार्थ्यांनी साकारला आहे. अपंगांना हवी ती वस्तू तो आणून देऊ शकेल.
 • जम्मू-काश्मीरमधील विद्यार्थिनीने वापरलेल्या खाद्यतेलापासून तयार केलेला साबण लक्षवेधी ठरला आहे. राजस्थानमधील विद्यार्थ्यांने नदी, तलाव स्वच्छ करणारी, रिमोटवरील नाव तयार केली आहे. जलपर्णी, पडलेल्या वस्तू, धातूच्या वस्तू ही नाव गोळा करू शकते.

भारताने संशोधनावरील गुंतवणूक वाढवावी

Advertisement
 • ‘भारतात संशोधन होत आहे. त्यासाठीची गुणवत्ताही येथे आहे. मात्र या देशात संशोधनासाठी अधिक गुंतवणूक करण्याची आवश्यकता आहे,’ असे मत नोबेल पुरस्कार विजेते संशोधक डंकन हॅल्डेन यांनी व्यक्त केले.
 • फगवाडा येथे सुरू असलेल्या भारतीय विज्ञान काँग्रेसदरम्यान हॅल्डेन यांनी माध्यमांशी संवाद साधला. भारतात उपयोजित संशोधनाऐवजी मूलभूत विज्ञानावरील संशोधनावर अधिक भर दिला जातो. यासाठी देशात अधिक गुंतवणूक होण्याची आवश्यक आहे. मात्र चीनमध्ये धातू विज्ञानासारख्या उपयोजित संशोधनावर गुंतवणूक केली जाते.
 • आशिया खंडात चीन आणि भारत हे दोन देश वेगाने प्रगत करत आहेत. विकसनशील देशांनी ‘ब्रेनगेन’ व्हावा यासाठी प्रयत्न वाढवणे आवश्यक आहे. चीनने संशोधन क्षेत्रातील गुंतवणुकीवर भर दिल्यामुळे तेथे मोठय़ा प्रमाणावर ‘ब्रेनगेन’ होत आहे, असे त्यांनी सांगितले.
 • अमेरिका, युरोपमधून संशोधक भारतात परतणे कठीण आहे, असे सांगतानाच शासनाने केवळ योजना आखून उपयोग नाही तर उद्दिष्ट म्हणून कार्यक्रम हाती घेणे गरजेचे आहे. परदेशातील संशोधकांसाठी येथे ‘सेंटर्स ऑफ एक्सलन्स’ उभारावीत, असेही हॅल्डेन यांनी सांगितले.

मोबाइल बनला सूक्ष्मदर्शक!

 • कोल्हापूरमधील सेंट झेविअर्स शाळेतील ज्ञानीराजे सूर्यवंशी आणि सिद्धांतराजे सूर्यवंशी या बहीण-भावांनी सूक्ष्मदर्शकाचा प्रश्न मोबाईल फोनच्या माध्यमातून सोडवला आहे.
 • तोही अवघ्या २० रुपयांमध्ये! त्यांच्या या प्रकल्पाचे फगवाडा येथील लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीमध्ये सुरू असलेल्या १०६व्या इंडियन सायन्स काँग्रेसमध्ये कौतुक होत आहे.
 • सायन्स काँग्रेसमध्ये होणाऱ्या राष्ट्रीय किशोर विज्ञान संमेलनात देशभरातील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या आणि विभागीय पातळीवर विजेते ठरलेल्या प्रकल्पांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.
 • ग्रामीण भागांतील अनेक शाळांमध्ये सूक्ष्मदर्शक यंत्र नसेल एकवेळ, पण शाळेतील प्रत्येक शिक्षकाकडे निदान कॅमेरा असलेला मोबाइल नक्की असतो. या मोबाइलच्या कॅमेराला छोटे बहिर्गोल भिंग जोडले आणि कॅमेरा सुरू करून त्यासमोर एखादी वस्तू धरली तर त्याचा सूक्ष्म अभ्यास करता येतो, असे ज्ञानीराजेचे म्हणणे आहे. तिला या प्रकल्पात शाळेतील शिक्षका उर्मिलादेवी पाटील यांनी मार्गदर्शन केले.

चीनने केले विनाशकारी ‘मदर ऑफ ऑल बॉम्ब’चे प्रक्षेपण

 • अमेरिकेने २०१७मध्ये अफगाणिस्तानातील कारवाईत वापरलेल्या ‘मदर ऑफ ऑल बॉम्ब’ला प्रत्युत्तर देताना, चीनने अशाच विनाशकारी अस्त्राची चाचणी घेतली आहे. चीननेही या नव्या अस्त्राला ‘मदर ऑफ ऑल बॉम्ब’ असेच नाव दिले असून, बिगर-अण्वस्त्र वर्गातील हे सर्वांत विनाशकारी अस्त्र असल्याचा दावा चीनने केला आहे.
 • अमेरिकेच्या हवाई दल संशोधन प्रयोगशाळेने लष्करासाठी २००२मध्ये ‘मदर ऑफ ऑल बॉम्ब’चा आराखडा तयार केला होता. प्रचंड स्फोटाची क्षमता असणारे बिगर-अण्वस्त्र वर्गातील हा बॉम्ब होता. अमेरिकेने २००३मध्ये इराकमध्ये सद्दाम हुसेन राजवटीविरोधात कारवाईला सुरुवात केल्यानंतर, दहशत निर्माण करण्यासाठी पहिल्यांदा या अस्त्राचा वापर केला होता.
 • अमेरिकेचा ‘मदर ऑफ ऑल बॉम्ब’ १० टन वजनाचा असून, त्याची लांबी दहा मीटर असते. या बॉम्बमध्ये आठ टन स्फोटके असतात.
 • अमेरिकेला प्रत्युत्तर देताना, रशियानेही २००७मध्ये असेच अस्त्र विकसित केले आणि त्याला ‘फादर ऑफ ऑल बॉम्ब’ असे नाव दिले होते.
Advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here