⁠  ⁠

Current Affair 01 January 2019

Chetan Patil
By Chetan Patil 4 Min Read
4 Min Read

Welcome 2019: जगभरात नववर्षाचे जल्लोषात स्वागत

  • सरत्या वर्षाला निरोप देत जगभरात आनंदात आणि उत्साहात २०१९चे स्वागत करण्यात आले आहे. मुंबई,दिल्लीसह भारतातील सर्वच शहरांमध्ये आकर्षक रोषणाई आणि आतषबाजीसह नववर्षाचे स्वागत करण्यात आले आहे.
  • जगभरात नववर्षाचा उत्साह पाहायला मिळतो आहे. प्रशांत महासागरातील टोंगा आयलँड या देशाने सर्वप्रथम नव्या वर्षाचे स्वागत केले आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी साडेचार वाजता टोंगा बेटावर नवीन वर्षाचे आगमन झाले. या देशाला किरीबाटी या नावानेही ओळखलं जातं. त्यानंतर काही मिनीटांतच तुफान आतषबाजीसह न्यूझीलँडमध्ये नव्या वर्षाचे आगमन झाले. न्यूझीलँड पाठोपाठ ऑस्ट्रेलियानेही नवीन वर्षाचे स्वागत केले आहे. ऑस्ट्रेलिया नंतर पूर्व आशियातील कोरिया, जपान,चीन या देशांमध्ये आणि त्यानंतर दक्षिण आशियातील नेपाळ,बांग्लादेश आणि भारतात नव्या वर्षाचे उत्साहात स्वागत करण्यात आलं आहे. अमेरिका आणि पश्चिम युरोपातील देशांमध्ये अजूनही नव्या वर्षाचे आगमन बाकी आहे.

बांगलादेशच्या पंतप्रधानपदी शेख हसीना चौथ्यांदा विराजमान

  • बांगलादेशच्या सार्वत्रिक निवडणुकीत पंतप्रधान शेख हसीना यांच्या अवमी लीगच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी आघाडीला प्रचंड बहुमत मिळाले आहे. या विजयामुळे हसीना या सलग तिसऱ्यांदा, तसेच एकूण चौथ्यांदा बांगलादेशच्या पंतप्रधान झाल्या आहेत.
  • इतकी वर्षे देशाच्या प्रमुखपदावर राहणाऱ्या हसीन यांना त्यांचे समर्थक, देशाला विकासाच्या मार्गावर नेणाऱ्या ‘आयर्न लेडी’ म्हणतात, तर विरोधक हसीना यांच्यावर एकाधिकारशाहीचा आरोप करतात. बांगलादेशच्या पंतप्रधानपदी चौथ्यांदा विराजमान होणाऱ्या हसीना या तेथील पहिल्या नेत्या ठरल्या आहेत.
  • बांगलादेशचे संस्थापक वंगबंधू शेख मुजीबूर रहमान यांच्या कन्या असलेल्या हसीना यांचा जन्म २८ सप्टेंबर १९४७ रोजी उत्तर बांगलादेशमधील तुंगीपाडा येथे झाला.
  • भारतात अज्ञातवासात असताना १९८१मध्ये त्यांची अवामी लीगच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली.
  • तेव्हापासून त्या पक्षाच्या अध्यक्ष आहेत. सहा वर्षे भारतात वास्तव्य केल्यानंतर १७ मे १९८१ रोजी त्या बांगलादेशात परतल्या.
  • लष्करशहा हुसेन महंमह इर्शाद यांची राजवट उलथवून लावण्यासाठी त्यांनी १९८३मध्ये राजकीय आघाडी उभारली.
  • खालेदा झिया यांच्या बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीसोबत (बीएनपी) त्यांनी हातमिळवणी केली आणि १९९०मध्ये लष्करी राजवट उलथवून लावली.
  • झिया यांचा पराभव करून १९९६मध्ये शेख हसीना पहिल्यांदा बांगलादेशच्या पंतप्रधान झाल्या. २००१मध्ये झिया पंतप्रधान झाल्या. हसीना या कार्यकाळ पूर्ण करणाऱ्या लोकशाही पद्धतीने निवडून आलेल्या बांगलादेशच्या त्या पहिल्या पंतप्रधान ठरल्या.
  • २००८मध्ये हसीना पुन्हा पंतप्रधान झाल्या. त्यानंतर जानेवारी २०१४मध्ये त्या तिसऱ्यांदा बिनविरोध पंतप्रधान झाल्या

ज्येष्ठ अभिनेते कादर खान यांचे निधन

  • ज्येष्ठ अभिनेते व लेखक कादर खान यांचे ३१ डिसेंबरला दीर्घ आजाराने निधन झाले. ते ८१ वर्षांचे होते. कादर खान यांचा मुलगा सरफराज याने या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
  • गत काही दिवसांपासून कादर खान यांच्यावर कॅनडातील रूग्णालयात उपचार सुरू होते. काल ३१ डिसेंबरला त्यांनी अंतिम श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर कॅनडातचं अंत्यसंस्कार होणार आहेत.
  • कादर खान यांनी आजवर जवळपास 300हून अधिक चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या. कोणतेही अंगविक्षेप न करता, फक्त संवादफेक आणि देहबोलीतून विनोदनिर्मिती करण्यात कादर खान यांचा हातखंडा होता. म्हणूनच त्यांच्या विनोदावर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं.
  • 90 च्या शतकात गोविंदा आणि कादर खान अशी जोडी हिट होती. ‘दूल्हे राजा’, ‘कुली न 1’, ‘राजा बाबू’ आणि ‘आँखे’ असे सिनेमे एव्हरग्रीन ठरले. याशिवाय त्यांनी कुलीमध्ये अमिताभ बच्चनसोबतही काम केलं होतं. तर हिम्मतवाला सिनेमात जितेंद्रबरोबर महत्त्वाची भूमिका साकारली होती.

टपाल खाते नववर्षात विविध उपक्रम राबविणार

  • देशाचा गौरवशाली इतिहास, संस्कृती व महत्त्वपूर्ण घडामोडींची माहिती तरुणाई व सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी ‘रोमान्स ऑफ स्टॅम्प‘ हा उपक्रम टपाल खात्यामार्फत नवीन वर्षापासून राबविण्यात येणार आहे.
  • काळाघोडा महोत्सवासह विविध महोत्सवांमध्ये टपाल खाते आपला स्टॉल लावून टपाल तिकिटांबाबत नागरिकांना सजग करेल. तसेच दैनंदिन गरजेच्या वस्तुंना स्टॅम्पचे आवरण लावून अधिकाधिक जणांना याकडे आकर्षित करण्यात येणार आहे.
  • टपाल खात्याच्या तिकिटांच्या माध्यमातून भारतीय मुत्सद्दीपणा‘ या थीमवर नोटबुकच्या पॅटर्नमध्ये डायरी बनविण्यात येणार आहे. टपाल तिकिटे ही देशातील घटनांचा आरसा असतात.
Share This Article