Current Affair 01 February 2019

0
73

सहा पाणबुडींच्या निर्मितीला मान्यता

 • केंद्र सरकारने दीर्घ काळापासून प्रलंबित नव्या पिढीच्या सहा पारंपरिक स्टेल्थ पाणबुडी निर्मिती प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. हा प्रकल्प सामरिक भागीदारी प्रारूपांतर्गत राबविला जाणार आहे.
 • ‘मेक इन इंडिया’ धोरणांतर्गत भारतातील जहाजबांधणी कंपनी विदेशी कंपनीच्या साह्याने हा प्रकल्प पूर्ण करील. चाळीस हजार कोटी रुपयांहून अधिक खर्चाला याद्वारे मंजुरी देण्यात आली आहे.
 • संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ‘डिफेन्स अॅक्विझिशन काउन्सिल’च्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला. नौदलासाठी पाणबुडींच्या निर्णयाबरोबरच लष्करासाठी पाच हजार ‘मिलान’ या रणगाडाविरोधी क्षेपणास्त्रांच्या खरेदीलाही मंजुरी देण्यात आली.
 • सहा पाणबुड्यांची निर्मिती स्वदेशी बनावटीची असेल.’सामरिक भागीदारी’ मॉडेलअंतर्गत आणि ‘मेक इन इंडिया’ धोरणानुसार विदेशी कंपनीच्या साह्याने देशातच सहा पाणबुड्यांची निर्मिती करण्यात येईल. ‘सहा पाणबुडी निर्मितीचा प्रकल्प ७५(१)मुळे पाणबुडीनिर्मितीला चालना मिळेल. पाणबुडीचे डिझाइन आणि आवश्यक तंत्रज्ञानाचे, आवश्यक कौशल्याचे हस्तांतर होईल.’ सामरिक भागीदारी अंतर्गत हा दुसरा प्रकल्प असून यापूर्वीचा पहिला प्रकल्प १११ युटिलिटी हेलिकॉप्टर्सच्या खरेदीचा होता. \R

जानेवारीत विक्रमी जीएसटी

Advertisement
 • नववर्षाचा पहिलाच महिना जीएसटी (वस्तू व सेवाकर) संकलनासाठी चांगला गेल्याचे संकेत मिळाले आहेत. जानेवारीमध्ये जीएसटीतून एक लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक करसंकलन झाले असे केंद्र सरकारतर्फे सांगण्यात आले. केंद्रीय अर्थ मंत्रालयाने ट्वीटरद्वारे ही माहिती दिली.
 • चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या महिन्यात म्हणजे एप्रिल २०१८मध्ये जीएसटी संकलनाने एक लाख कोटींचा आकडा पार केला होता. त्या महिन्यात जीएसटीचे उत्पन्न १.०३ लाख कोटी रुपये नोंदवण्यात आले होते. यानंतर सप्टेंबरमध्येही जीएसटीने हा टप्पा पार केला होता.

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाची नवी घोषणा

 • भारतीय जनता पक्षाने 2019 लोकसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी केली आहे. ‘अबकी बार मोदी सरकार‘ घोषणा देत सत्तेवर आलेल्या भाजपाने यावेळी ‘अबकी बार 400 के पार‘ ही नवी घोषणा तयार केली आहे.
 • भाजपाने यावेळी 400 हून अधिक जागा जिंकण्याचा निर्धार केला आहे. 2014 लोकसभा निवडणुकीत एनडीएने 336 जागा जिंकल्या होत्या. यामध्ये एकट्या भाजपाने 282 जागांवर विजय मिळवला होता.
 • ‘ज्याप्रकारे मोदी सरकारने गेल्या साडेचार वर्षांत काम केले आहे ते पाहता जनतेला पुन्हा एकदा नरेंद्र मोदींना पंतप्रधानपदी पहायचे आहे. 1984 नंतर पहिल्यांदाच पूर्ण बहुमताने सरकार स्थापन झाले होते.

कॅन्सर मुळापासून नष्ट करणारं औषध सापडलं,
इस्त्राईलमधील कंपनीचा दावा

 • सध्या जगभरात कॅन्सर आजाराचा विळखा वाढत चालला असून चिंतेचा विषय ठरत आहे. कोणताही उपचार किंवा औषध कॅन्सर पूर्णपणे बरा करण्याची खात्री देत नाही. मात्र इस्त्राईलमधील एका बायोटेक कंपनीने कॅन्सर मुळापासून नष्ट करण्याचा पर्याय सापडला असून 2020 पर्यंत आपण हे औषध बाजारात आणणार असल्याचा दावा केला आहे.
 • सध्या कॅन्सरवर वेगवेगळ्या प्रकारच्या उपचारपद्धती उपलब्ध आहेत. पण कोणताही उपचार 100 टक्के कॅन्सर बरा करण्याची हमी देत नाही. पण 2000 साली स्थापन झालेल्या अॅक्सिलरेटेड इवोल्यूशन बायोटेक्नॉलॉजी लिमिटेडने कॅन्सर पूर्णपणे बरा करणारं औषध सापडल्याचा दावा केला आहे.
 • कंपनीने या उपचारपद्धतीला MuTaTo म्हणजेच मल्टी टार्गेट टॉक्सिन असं नाव दिलं आहे.

उसेन बोल्ट – झंजावाताची क्रीडानिवृत्ती

 • दीड दशकाहून अधिक काळ ‘स्प्रिंट’चे अनभिषिक्त सम्राटपद भूषविल्यानंतर धावण्याच्या कारकीर्दीतून निवृत्त झालेल्या बोल्टने फुटबॉलमध्ये कारकीर्द घडवायला सुरुवात केली. पण दीड वर्षांच्या प्रयत्नानंतर अखेरीस त्याने फुटबॉलला रामराम ठोकून क्रीडा कारकीर्दीतून निवृत्ती जाहीर केली आहे.
 • ‘स्प्रिंट’चे अनभिषिक्त सम्राटपद भूषवलेला आणि कारकीर्दीतील अखेरच्या १०० मीटर धावप्रसंगी तृतीय येऊनदेखील विजेत्या गॅटलिनकडून झुकून मानवंदना मिळवलेला एकमेवाद्वितीय उसेन बोल्ट. तीन ऑलिम्पिकमध्ये मिळून आठ सुवर्णपदके आणि जागतिक अ‍ॅथलेटिक्सची ११ सुवर्णपदके नावावर असलेल्या बोल्टने त्याच्या धावण्याच्या कारकीर्दीला २०१७ सालच्या ऑगस्टमध्येच विराम दिला होता.
 • बोल्टने त्याच्या कारकीर्दीतील अखेरच्या शर्यतीतदेखील ९.९५ सेकंदात १०० मीटर धावला होता. तर त्या शर्यतीतील विजेत्या गॅटलीनची वेळ होती ९.९२ सेकंद. पण बोल्टने त्यावेळीदेखील त्याचा विशाद मानला नाही.
Advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here