एमपीएससी : तयारी भूगोलाची

0
6647
  • राज्यसेवा परीक्षेला अवघा एक महिना बाकी राहिला असून राज्यसेवा परीक्षेमध्ये भूगोल हा दुसर्‍या विषयांप्रमाणे अत्यंत महत्वाचा विषय आहे. या विषयाचा अभ्यास योग्य पद्धतीने व विश्‍लेषण करुन केला त कोणत्याही शाखेच्या उमेदवारांना हमखास गुण मिळवूण देणारा, असा हा विषय आहे. भूगोलाचा अभ्यासक्रम आणि मागील परीक्षांमध्ये भूगोलावर विचारले जाणारे प्रश्‍न लक्षात घेऊन भारताचा भूगोल आणि प्राकृतिक भूगोल या उपघटकांवर प्राधान्याने अभ्यास करणे महत्वाचे ठरते.
  • मागील पाच ते सहा वर्षांमध्ये परीक्षेत येणार्‍या प्रश्‍नांचा कल पाहता भारतीय भूगोलावर सर्वाधिक प्रश्‍न,त्यापाठोपाठ प्राकृतिक भूगोलावर व सर्वात कमी प्रश्‍न जगाच्या भूगोलावर विचारण्यात आले आहेत. भूगोलावर दरवर्षी साधारण 10 ते 15 प्रश्‍न येतात.

संकल्पनांचे महत्त्व

  • भूगोलाचा अभ्यास करताना उपघटकांना प्राकृतिक-आर्थिक-सामाजिक अशा क्रमाने महत्त्व देणे आवश्यक आहे. मूलभूत संज्ञा आणि संकल्पना आधी समजून घेऊन मग भौगोलिक घटना व प्रक्रियांचा अभ्यास करावा.
  • प्राकृतिक विभाग, नदी-पर्वत प्रणाली यांचा अभ्यास नकाशा समोर ठेवून करावा. याबाबत भारत-महाराष्ट्र आणि जग अशा क्रमाने महत्त्व देऊन अभ्यास आवश्यक आहे. मान्सूनची निर्मिती व्यवस्थित समजून घ्यायला हवी. आर्थिक भूगोलामध्ये खनिजे व त्यांचे उत्पादन, महत्त्वाचे उपयोग व त्यांची स्थाननिश्‍चिती, महत्त्वाची पिके व त्यांचे उत्पादक प्रदेश यांचा actual अभ्यास तक्त्यांद्वारे करता येईल. मात्र उद्योग व पिके यांच्या उत्पादनाबाबत संकल्पनात्मक अभ्यास आवश्यक आहे.
  • पर्यटनाशी संबंधित विविध संकल्पना व महत्त्वाची स्थाने यांचा आढावा घ्यायला हवा. सामाजिक भूगोलामध्ये जमातींचा अभ्यास महत्त्वाचा आहे. चच्येच्या/बातमीचा विषय ठरल्या असतील तरच भारताबाहेरील जमातींचा आढावा घ्यावा. महाराष्ट्राच्या जमातींचे स्थान, महत्त्वाचे सण, नृत्ये, कला इत्यादींची माहिती घ्यावी. स्थलांतराची कारणे, परिणाम, समस्या, उपाय, प्रकार, प्रभाव इत्यादी महाराष्ट्राच्या विशेष संदर्भात समजून घ्यावे.

नकाशावाचन

Advertisement
  • भूगोलाच्या तयारीसाठी नकाशा-वाचन अत्यंत महत्त्वाचे आहे. आधी परीक्षांमध्ये नकाशावाचनावर थेट प्रश्‍न विचारले जायचे परंतु गेल्या काही वर्षांत असे प्रश्‍न विचारले नसले तरी त्याचे महत्त्व अजिबात कमी होत नाही. भूगोलाचा अभ्यास करताना नकाशा हा नेहमी समोर असावा. कोणत्याही घटकांचा अभ्यास करताना मग ते खंड असो अथवा भूरूपे, नदीप्रणाली, वने इ. चा जास्तीतजास्त अभ्यास नकाशावरच करावा. कारण फक्त वहीमध्ये नोट्स काढून लक्षात राहण्यापेक्षा नकाशावर जर ते भाग नमूद केले तर जास्त काळ लक्षात राहतात. तसेच उजळणीही अगदी जलद होते.

अभ्यास साहित्य

  • भूगोलाच्या संपूर्ण तयारीसाठी अभ्यास साहित्याची निवडही महत्त्वाची ठरते. सर्वप्रथम महाराष्ट्राची राज्याची सहावी ते दहावीपर्यंतची पाठ्यपुस्तके तसेच छउएठढ ची सहावी ते बरावी पर्यंतच्या क्रमिक पुस्तकांचे सखोल अध्ययन करावे. कारण भूगोलातील संज्ञा, संकल्पना या पुस्तकात अत्यंत सरळ साध्या भाषेत मांडलेल्या असतात. त्यामुळेच भूगोलातील काही विशिष्ट अशा संज्ञा, संकल्पनाचे आकलन होण्यास मदत होते. परीक्षेत येणार्‍या प्रश्‍नांचा स्त्रोत हा बहुतेक वेळा हा पुस्तकांतच असत
Advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here