⁠  ⁠

आचार्य बाळशास्त्री जांभेकर

Chetan Patil
By Chetan Patil 2 Min Read
2 Min Read
आचार्य बाळशास्त्री जांभेकर

जीवन

आचार्य बाळशास्त्री गंगाधरशास्त्री जांभेकरांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील पोंबर्ले येथे इ.स. २० जानेवारी १८१२ रोजी झाला. बालपणी वडिलांकडे घरीच मराठी व संस्कृत भाषांचा अभ्यास आरंभला. इ.स.१८२५  साली त्यांचे मुंबईमध्ये आगमन झाले. मुंबईत येऊन ते सदाशिव काशीनाथ ऊर्फ ‘बापू छत्रे’ आणि बापूशास्त्री शुक्ल यांच्याकडे अनुक्रमे इंग्रजी व संस्कृत शिकू लागले. या दोन विषयांबरोबरच गणित आणि शास्त्र या विषयांत त्यांनी प्रावीण्य मिळविले.

‘बाँबे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी’च्या विद्यालयात अभ्यास करून त्यांनी विशीच्या आत कोणाही भारतीयाला तोवर न मिळालेली प्राध्यापक म्हणून नियुक्ती मिळवण्याइतपत ज्ञान कमवले. ‘बाँबे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी’मध्ये डेप्युटी सेक्रेटरी या महत्त्वाच्या पदावर रुजू झाले. इ.स. १८३४ साली एल्फिन्स्टन कॉलेजात पहिले एतद्देशीय व्याख्याते (असिस्टंट प्रोफेसर) म्हणून जांभेकरांची नियुक्ती झाली.यानंतर शिक्षकांच्या अध्यापन वर्गाचे संचालक म्हणून काम केले. मुंबई इलाख्यातील प्राथमिक शाळा तपासणीसाठी निरीक्षक म्हणून सरकारने त्यांची नियुक्ती केली होती. आचार्य बाळशास्त्री जांभेकरांना आद्य मराठी वृत्तपत्राचे जनक, आद्य इतिहास संशोधक, सुधारवाद्यांचे प्रवर्तक, शिक्षकतज्ञ, जेष्ट पत्रकार, एक प्रगमनशील व्यवहारवादी सुधारक म्हणून ओळखले जाते. ६ जानेवारी १८३२ रोजी दर्पण वृत्तपत्राच्या पहिला अंक प्रकाशित झाला, यामुळे हा दिवस दर वर्षी महाराष्ट्रात पत्रकार दिन म्हणून साजरा होतो. इ.स. १७ मे १८४६ रोजी बनेश्वर येथे त्यांचा मृत्यू झाला.

android app ad

सामाजिक कार्य

  • सार्वजनिक गंथालयांचे महत्त्व ओळखून ‘बाँबे नेटिव्ह जनरल लायब्ररी’ या ग्रंथालयाची जांभेकरांनी स्थापना केली.
  • जांभेकर यांना ज्ञानेश्‍वरीची पहिली मुद्रित आवृत्ती इ.स. १८४५ साली काढली.
  • त्यांच्या प्रकाशित साहित्यकृतींमध्ये नीतिकथा, इंग्लंड देशाची बखर, इंग्रजी व्याकरणाचा संक्षेप, हिंदुस्थानचा प्राचीन, इतिहास, शून्यलब्धी, सार संग्रह, या ग्रंथांचा समावेश आहे.
  • १८३२ मध्ये ‘दर्पण’ हे मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र सुरु केले. ‘दिग्दर्शन’ हे मासिकसुद्धा त्यांनी सुरु केले.
  • बाळशास्त्रींनी साधारणपणे इ.स. १८३० ते इ.स. १८४६ या काळात आपले योगदान महाराष्ट्राला व भारताला दिले.

नियमित अपडेट मिळवण्यासाठी ‘मिशन एमपीएससी’ला फेसबुकटेलिग्रामट्विटर आणि इंस्टाग्रामवर फॉलो करा.

samaj sudharak ad mission mpsc

Share This Article