⁠  ⁠

Current Affairs 02 May 2019

Chetan Patil
By Chetan Patil 5 Min Read
5 Min Read

भारताचे चांद्रयान ६ सप्टेंबरला चंद्रावर उतरणार

  • भारताच्या महत्त्वाकांक्षी ‘चांद्रयान-२’ या दुसऱ्या चांद्रमोहिमेचे प्रक्षेपण ९ जुलै ते १६ जुलै दरम्यान करण्यात येणार असल्याचे भारतीय
    अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) बुधवारी जाहीर केले. या मोहिमेसंदर्भातील सर्व यंत्रणा या काळात सज्ज होतील आणि प्रक्षेपणानंतर ६
    सप्टेंबर रोजी चांद्रयान- २ चंद्रावर दाखल होईल.
    चांद्रयान-२ मध्ये ३ मॉड्यूल ऑर्बिटर, लँडर (विक्रम) आणि रोव्हर ( प्रज्ञान) यांचा अंतर्भाव असणार आहे.
  • जीएसएलव्ही मार्क-३ द्वारे चांद्रयान-२ ऑर्बिटर आणि लँडर पृथ्वीच्या कक्षेच स्थिरावतील. या नंतर ऑर्बिटर आणि लँडर चंद्राच्या कक्षेत
    सोडण्यात येतील. चांद्रयान-२ चंद्राच्या कक्षेत पोहोचल्यानंतर लँडर चंद्राच्या जमिनीवर उतरेल. या नंतर रोव्हर बाहेर येत प्रयोग करण्यास
    सिद्ध होईल. भारताचे चांद्रयान ६ सप्टेंबर या दिवशी चंद्रावर उतरेल असे इस्रोने म्हटले आहे.
  • चांद्रयान-२ चे वजन ३२९० किलो इतके असेल. इस्रोने चांद्रयान-२ ला सन २०१७ मध्ये प्रक्षेपित करण्याचे ठरवले होते.
    चंद्राच्या कक्षेत प्रवेश केल्यानंतर त्याचे ऑर्बिटर, लँडरपासून वेगळे होईल. त्या नंतर लँडर चंद्राच्या जमिनीवर उतरेल आणि रोव्हर वेगळा
    होईल.
  • रोव्हरवर सौरऊर्जेचे उपकरण बसवण्यात आले आहे. या मुळे तो पृथ्वीपासून किती अंतरावर आहे हे कळू शकेल. या पूर्वी सन २००८ मध्ये
    चांद्रयान-१ प्रक्षेपित करण्यात आले होते. परंतु इंधनाच्या कमतरतेमुळे ही मोहीम २९ ऑगस्ट २००९ मध्ये संपुष्टात आली होती. ही मोहीम
    २ वर्षे चालेल असे इस्रोने जाहीर केले होते.

मसूद अझहर आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित

  • भारतातील अनेक हल्ल्याचा मास्टरमाईंड आणि जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय
    दहशतवादी ठरवण्यात भारताच्या कुटनितीला यश आले आहे.
  • संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेने (युएनएससी) बुधवारी (दि.१) मसूद अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित केले. भारताचा हा
    मोठा विजय मानला जात आहे.
  • संयुक्त राष्ट्रातील भारताचे राजदूत सईद अकबरुद्दीन यांनी यासंदर्भात ट्विट करुन ही माहिती दिली आहे. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा
    परिषदेच्या १२६७ समितीकडून आयएसआयएल आणि अल-कायदा यादीमध्ये मसूद अझहरचा आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून समावेश
    करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे.
  • यापूर्वी तीन वेळा चीनने आपला वीटो विशेषाधिकार वापरत या प्रस्तावाला विरोध केला होता. मात्र, यंदा पुलवामा ह्ल्ल्यानंतर भारताच्या
    या मागणीला अमेरिका, फ्रान्स, रशिया, ऑस्ट्रेलिया आणि ब्रिटनसह अनेक देशांनी पाठींबा दिला.
  • भारताने यापूर्वी २००९, २०१६, २०१९ मध्ये मसूद अझहरवर बंदी घालण्यात यावी यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत प्रस्ताव मांडला
    होता.

कुमार संगकारा ‘एमसीसी’चा पहिला ब्रिटिशेतर अध्यक्ष

  • श्रीलंकेचा माजी कर्णधार कुमार संगकाराची मेरिलिबोन क्रिकेट क्लबचा (एमसीसी) पहिला ब्रिटिशेतर अध्यक्ष म्हणून घोषणा झाली आहे.
    एक वर्षांचा कार्यकाळ असलेल्या या पदावर तो १ ऑक्टोबर, २०१९पासून कार्यरत होईल.
  • लॉर्ड्स येथे बुधवारी झालेल्या ‘एमसीसी’च्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सध्याचे अध्यक्ष अ‍ॅन्थनी व्रेफोर्ड यांनी संगकाराच्या नामांकनाची
    घोषणा केली.
  • २०१२मध्ये संगकाराला ‘एमसीसी’ने सन्माननीय आजीवन सदस्यत्व बहाल केले. याच वर्षी त्याचा ‘एमसीसी’च्या जागतिक क्रिकेट
    समितीवर समावेश करण्यात आला.

जागतिक क्रमवारीत भारताची अपुर्वी चंदेला पहिल्या क्रमांकावर

  • भारताची नेमबाजपटू अपुर्वी चंदेलाने ISSF जागतिक क्रमवारीत १० मी. एअर रायफल प्रकारात पहिला क्रमांक पटकावला आहे. १९२६
    गुणांची कमाई करत अपुर्वीने ही कामगिरी केली आहे.
  • फेब्रुवारी महिन्यात नवी दिल्लीत झालेल्या विश्वचषक स्पर्धेत चंदेलाने विश्वविक्रमी कामगिरी करत भारताला पहिलं सुवर्णपदक मिळवून
    दिलं होतं. मात्र काही दिवसांपूर्वी बिजींग शहरात झालेल्या स्पर्धेत अपुर्वीला आपल्या दिल्लीतल्या कामगिरीची पुनरावृत्ती करता आली
    नाही. अपुर्वीने पहिल्या क्रमांकावर झेप घेतल्यानंतर, भारताची दुसरी नेमबाजपटू अंजुम मुद्गीलने दुसरा क्रमांक पटकावला आहे.
  • मुद्गीलच्या खात्यात १६९५ गुण जमा आहेत.
  • २०२० साली टोकियो शहरात रंगणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी भारताच्या ५ नेमबाजपटूंनी आपलं स्थान पक्क केलं आहे. चंदेलानेही या
    स्पर्धेत आपलं स्थान निश्चीत केलं आहे. याव्यतिरीक्त अभिषेक वर्मा, सौरभ चौधरी, अंजुम मुद्गील आणि दिव्यांश सिंहनेही आपलं स्थान
    निश्चीत केलं आहे.

स्कॉटलंड पद्धतीनं बनवलेल्या भारतातील पहिल्या तोफगाड्याचं लोकार्पण

  • जळगाव जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील वेताळवाडी किल्ल्यावरील तोफेला स्कॉटलंड पद्धतीने बनविलेला भारतातील पहिल्या
    तोफगाड्याचे लोकार्पण करण्यात आले आहे. सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र या दुर्ग संवर्धन करणाऱ्या संघटनेमार्फत रविवारी 28 एप्रिल रोजी
    लोकार्पण झालं.
  • वेताळवाडी या किल्ल्यावरील अडगळीत पडलेल्या तोफेला स्कॉटलंड येथील युरोपियन पद्धतीचा बनवलेला तोफगाडा बसवण्यात आला.
  • हा तोफगाडा चाळीसगाव येथील सह्याद्रीचे शिलेदार अजय जोशी यांनी बनविला असून यासाठी आलेला खर्च संस्थेच संपर्क प्रमूख प्रकाश
    नायर यांनी स्वतः उपलब्ध करून दिला आहे.

राव यांचा भारतीय तिरंदाजी संघटनेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा

  • दिल्ली उच्च न्यायालयाकडून नियुक्त करण्यात आलेले प्रशासक एस. वाय. कुरेशी यांनी लागू केलेली घटना सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल
    ठरवल्यामुळे बीव्हीपी राव यांनी भारतीय तिरंदाजी संघटनेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.
  • ताज्या घडामोडींमुळे १० जूनला होणाऱ्या जागतिक अजिंक्यपद तिरंदाजी स्पर्धेपूर्वी भारतीय नेमबाजी संघटनेची नूतन कार्यकारिणी
    अस्तित्वात येण्याची चिन्हे आहेत

Share This Article