२७ नोव्हेंबर दिनविशेष

0
98
Harivansh-Rai-Bachchan

जन्म – 

१८५७: नोबेल पारितोषिक विजेते ब्रिटिश जैवरसायनशात्रज्ञ सर चार्ल्स शेरिंग्टन यांचा जन्म. (मृत्यू: ४ मार्च १९५२ – इस्ट्बोर्न, ससेक्स, लंडन, इंग्लंड)

Advertisement

१८७०: इतिहास संशोधक दत्तात्रय बळवंत तथा द. ब. पारसनीस यांचा जन्म.

१८७४: इस्त्राएलचे पहिले राष्ट्राध्यक्ष चेम वाइझमॅन यांचा जन्म. (मृत्यू: ९ नोव्हेंबर १९५२)

१८७८: भारतीय कवि आणि समीक्षक जतिंद्रमोहन बागची यांचा जन्म. (मृत्यू: १ फेब्रुवारी १९४८)

१८८१: प्राच्यविद्या पंडित व कायदेतज्ञ डॉ. काशीप्रसाद जायस्वाल यांचा जन्म. (मृत्यू: ४ ऑगस्ट १९३७)

१८८८: भारतीय लोकसभेचे पहिले सभापती गणेश वासुदेव मावळंकर यांचा जन्म.

१९०३: नोबेल पारितोषिक विजेते नॉर्वेचे रसायनशास्त्रज्ञ लार्स ऑन्सेगर यांचा जन्म.

१९०७: विख्यात हिंदी साहित्यिक हरीवंशराय बच्चन यांचा जन्म. (मृत्यू: १८ जानेवारी २००३)

१९१५: मराठी कथा कादंबरीकार दिगंबर बाळकृष्ण उर्फ दी. बा. मोकाशी यांचा उरण, रायगड येथे जन्म. (मृत्यू: २९ जून १९८१)

१९४०: अमेरिकन अभिनेता आणि मार्शल आर्ट तज्ञ ब्रूस ली यांचा जन्म. (मृत्यू: २० जुलै १९७३)

१९५२: भारतीय गायक-गीतकार आणि निर्माते बॅप्पी लाहिरी यांचा जन्म.

१९८६: भारतीय क्रिकेटपटू सुरेश रैना यांचा जन्म.

मृत्यू –

१९५२: तत्वचिंतक अहिताग्नी राजवाडे यांचे निधन. (जन्म: २३ ऑक्टोबर १८७९)

१९७५: गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड्स चे सहसंस्थापक रॉस मॅक्वाहिरटर यांचे निधन. (जन्म: १२ ऑगस्ट १९२५)

१९७६: प्रसिद्ध मराठी पत्रकार. समीक्षक, कादंबरीकार ग. त्र्यं. माडखोलकर तथा गजानन त्र्यंबक माडखोलकर यांचे निधन. (जन्म: २८ डिसेंबर १८९९)

१९७८: भारतीय समाजसेविका, राष्ट्रसेविका समितीच्या संस्थापक लक्ष्मीबाई केळकर यांचे निधन. (जन्म: ६ जुलै १९०५)

१९९४: स्वातंत्र्यसेनानी, रायगड मिलिटरी स्कूल चे संस्थापक दिगंबर विनायक तथा नानासाहेब पुरोहित यांचे निधन. (जन्म: २८ मे १९०७ – महाड, रायगड)

१९९५: दूरदर्शन व चित्रपट कलावंत संजय जोग यांचे निधन.

२०००: साहित्यिक, संशोधक, दैनिक गोमंतकचे पहिले संपादक बाळकृष्ण दत्तात्रेय तथा बा. द. सातोस्कर यांचे निधन. (जन्म: २६ मार्च १९०९)

२००२: भारतीय कवी आणि शैक्षणिक शिवमंगल सिंग सुमन यांचे निधन. (जन्म: ५ ऑगस्ट १९१५)

२००७: गेटोरेड चे सहनिर्माते रॉबर्ट केड यांचे निधन. (जन्म: २६ सप्टेंबर १९२७)

२००८: भारताचे ७ वे पंतप्रधान विश्वनाथ प्रताप सिंग यांचे निधन. (जन्म: २५ जून १९३१)

Advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here