13 February Dinvishesh

0
9
Sarojini-Naidu-1

१३ फेब्रुवारी दिनविशेष

ठळक घटना

११३०: इनोसंट दुसरा पोपपदी.
१५७५: हेन्री तिसरा फ्रांसच्या राजेपदी.
१६६८: स्पेनने पोर्तुगालचा स्वातंत्र्य मान्य केले.
१९३४: चेलियुस्किन हे रशियाचे जहाज आर्क्टिक समुद्राच्या बर्फात अडकुन फुटले व बुडाले.
१९४५: दुसरे महायुद्ध – सोवियेत सैन्याने हंगेरीची राजधानी बुडापेस्ट काबीज केली.
१९६०: फ्रांसने पहिली परमाणुबॉम्बची चाचणी केली.
१९७१: अमेरिकेच्या सैन्याची मदत घेउन दक्षिण व्हियेतनामने लाओसवर चढाई केली.
१९७४: सोवियेत संघाने अलेक्सांद्र सोल्झेनित्सिनला हद्दपार केले.
१९८४: युरी आंद्रोपोव्ह नंतर कॉन्स्टान्टीन चेरनेन्को सोवियेत संघाचा अध्यक्ष झाला.
१९८४: भारतातील पहिले होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजची स्थापना.
१९८८: कॅनडात कॅल्गारी येथे पंधरावे हिवाळी ऑलिंपिक खेळ सुरू.
२००१: एल साल्व्हाडोरमध्ये रिश्टर मापनपद्धतीनुसार ६.६ तीव्रतेचा भूकंप. ४०० ठार.
२००८: ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधान केव्हिन रडने सरकारच्या वतीने तेथील स्थानिक आदिवासींची चोरलेल्या मुलांबद्दल माफी मागितली.
२०१०: पुणे येथे दहशतवाद्यांनी बॉम्बस्फोट घडवून आणला. १७ ठार, ६० जखमी.

Advertisement

जन्म

१५९९: पोप अलेक्झांडर सातवा.
१८४२: टेड पूली, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
१८५८: हॅरी मोझेस, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
१८७९: सरोजिनी नायडू, बंगाली कवियत्री.
१९०४: एडी डॉसन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
१९११: फैझ अहमद फैझ, पाकिस्तानी कवी.
१९१५: ऑँग सान, म्यानमारचा स्वातंत्र्यसैनिक.
१९२३: चक यीगर, नासाचा स्वनातीत विमान चालवणारा प्रथम वैमानिक.
१९३३: पॉल बिया, कामेरूनचा राष्ट्राध्यक्ष.
१९५०: लेन पास्को, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
१९५७: थेल्स्टन पेन, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.
१९६९: सुब्रोतो बॅनर्जी, भारतीय क्रिकेट खेळाडू.

मृत्यू

११३०: पोप ऑनरियस दुसरा.
१२१९: मिनामोटो नो सानेटोमो, जपानी शोगन.
१३२२: अँड्रोनिकस, बायझेन्टाईन सम्राट.
१६६०: चार्ल्स दहावा, स्वीडनचा राजा.
१८८३: रिचर्ड वॅग्नर, जर्मन संगीतकार.
१९०१: जयवंतसिंग, शरीर शास्त्रज्ञ.
१९१४: लल्फ़ान्सो बर्टिलान, मानववंश शास्त्रज्ञ.
२०१२: अखलाक मुहम्मद खान ऊर्फ कवी शहरयार, ज्ञानपीठ पुरस्कारविजेते उर्दू कवी, गीतकार.

दिनविशेषचे नियमित अपडेट मिळवण्यासाठी Mission MPSC ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्रामवर फॉलो करा.

Advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here