⁠  ⁠

राज्यात आयटी आणि इलेक्ट्रॉनिक्स धोरणांतर्गत सहा हजार कोटींची गुंतवणूक

Saurabh Puranik
By Saurabh Puranik 3 Min Read
3 Min Read

महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक्स धोरणांतर्गत राज्यात 5053 कोटी तर माहिती तंत्रज्ञान व माहिती तंत्रज्ञान सहाय्यभूत सेवा धोरणांतर्गत राज्यात 829 कोटी एवढ्या मोठ्या प्रमाणात गुंतवणूक झाली आहे. राज्य सरकारने महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक्स धोरण-2016 व फॅब प्रकल्पांसाठी प्रोत्साहने योजना राबविण्यासाठी फेब्रुवारी 2016 मध्ये निर्णय घेतला होता. या धोरणाच्या पुढील पाच वर्षांच्या कालावधीत राज्यात 300 कोटी डॉलर्सच्या गुंतवणुकीसह 1200 कोटी डॉलर्सच्या उलाढालीचे लक्ष्य ठेवण्यात आले असून एक लाख अतिरिक्त रोजगाराची निर्मिती अपेक्षित आहे. त्यानुसार सरकारने गतीने अंमलबजावणी केल्याने या योजनेंतर्गत गेल्या दीड वर्षात आठ विशाल-अतिविशाल प्रकल्प मंजूर करण्यात आले आहेत. या प्रकल्पांमध्ये 5052 कोटी 63 लाख रुपयांची गुंतवणूक झाली आहे. त्यात औरंगाबाद ईलेक्ट्रीकल लि. (300 कोटी), जबिल सर्किट इंडिया (103.64 कोटी), सिस्का एलईडी लाईट्स (150 कोटी), कॅरिअर मिडीआ इंडिया (300 कोटी), मिडीआ इंडिया (400 कोटी), हायर अप्लाएन्सेस (इंडिया) (539 कोटी), स्टरलाईट टेक्नॉलॉजीज (3000 कोटी), प्रॅक्सएअर इंडिया (260 कोटी) या उद्योगांचा समावेश आहे.

राज्याचे माहिती तंत्रज्ञान आणि माहिती तंत्रज्ञान सहाय्यभूत सेवा धोरण-2015 ला मंत्रिमंडळाने जून 2015 मध्ये मान्यता दिली. या धोरणानुसार या क्षेत्रात राज्यात 10 लाखापर्यंत रोजगारनिर्मिती, दरवर्षी एक लाख कोटींची निर्यात आणि माहिती तंत्रज्ञान उद्यानाच्या (आयटी पार्क) स्थापनेसाठी पन्नास हजार कोटी इतकी गुंतवणूक करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या धोरणाचीही चांगल्या पद्धतीने कार्यवाही केल्यामुळे गेल्या दोन वर्षात राज्यात 26 आयटी पार्क आणि माहिती तंत्रज्ञान विषयक 1261 उद्योग घटकांना इरादापत्र (LOI) देण्यात आले आहे. या उद्योगांच्या माध्यमातून 829 कोटींची गुंतवणूक होत असून 72 हजार 500 एवढी रोजगारनिर्मिती क्षमता निर्माण झाली आहे. प्रत्यक्षात अंमलबजावणी झालेल्या 25 आयटी पार्क आणि 502 उद्योग घटकांमध्ये 479 कोटी गुंतवणूक झाली असून त्यातून 63 हजार 900 रोजगार निर्मिती अपेक्षित आहे.

माहिती तंत्रज्ञान धोरणांतर्गत ठाणे जिल्ह्यात यशराज टेक्नोपार्क, आयगेट ग्लोबल सोल्यूशन्स, रेन्बो वर्ल्ड, प्राईड-16, इम्प्रेस पॅव्हिलिअन, लोमा, ऑलिंपस, ओरिआना बिझनेस, ओपल स्क्वेअर, हाय पॉईंट, आय थिंक, विश्व ग्रीन रिअल्टर्स प्रा.लि., माईंडस्पेस जुईनगर फेज-1, तसेच मुंबईमध्ये अरमान, आर ए, नेस्को (फेज-3), एल अँड टी वेस्ट स्टार, प्रीथ्वी, इंपिटेक्स हाऊस, अरटेक हाऊस, त्याचप्रमाणे पुणे येथे महालक्ष्मी इन्फोटेक, फ्लोरिएट, इऑन फ्री झोन (फेज-2), बालेवाडी टेक पार्क, बराले, डब्लू वन स्क्वेअर अशा एकूण 26 खासगी माहिती तंत्रज्ञान उद्योगांना इरादापत्र देण्यात आले आहे. यातील 25 आयटी उद्यानांची प्रत्यक्ष अंमलबजावणी झाली आहे.

त्याचप्रमाणे नोंदणी झालेल्या (Registration Issued) 25 माहिती तंत्रज्ञान उद्यानांमध्ये ठाणे जिल्ह्यातील श्री सावन नॉलेज पार्क, टेक्नोसिटी, हावरे इन्फोटेक, कल्पतरू पार्क, अरिहंत ओरा इन्फोटेक, गिगाप्लेक्स, लॅंड मार्क, जयदीप इन्फॅसिस, अवेन्यू, आयगेट ग्लोबल सोल्यूशन्स, लोढा सुप्रीमस-2 (फेज-2), एव्हरेस्ट निवारा इन्फोटेक, तसेच पुणे येथील सिनर्जी, पॅराडाईम, क्वॉरड्रॉन बिझनेस, ए जी ट्रेड सेंटर, बोधी टॉवर, इंटरनॅशनल टेकपार्क, त्याचप्रमाणे मुंबई येथील द रुबी, क्रीशराज उर्मी, मॅरेथॉन नेक्सटजेन इनोवा, सेंच्युरी, निरलॉन नॉलेज पार्क (फेज 1 व 2), नेस्को आयटी पार्क-2, एल अँड टी यांचा समावेश आहे.

Share This Article