⁠  ⁠

चालू घडामोडी – २९ जून २०१६

Tushar Bhambare
By Tushar Bhambare 4 Min Read
4 Min Read

देश-विदेश

सातव्या वेतन आयोगाकडून २३ टक्के पगारवाढीची शिफारस
# केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात तब्बल साडेतेवीस टक्के वाढ सुचवणारा अहवाल 7 pay commission सातव्या वेतन आयोगाने १९ नोव्हेंबर २०१५ रोजी केंद्र सरकारला सादर केला. वेतन आयोगाच्या शिफारशी जशाच्या तशा स्वीकारल्यास ४७ लाख केंद्रीय कर्मचारी व ५२ लाख निवृत्तिवेतनधारकांना त्याचा लाभ होणार आहे. १ जानेवारी २०१६ पासून या वेतन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी केली जाणार आहे.

काय आहे वेतन आयोग
१. सरकार दर दहा वर्षांनी कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीसाठी वेतन आयोगाची स्थापना करते.
२. वेतन आयोग विद्यमान वेतनात दुरुस्ती करून शिफारस अहवाल केंद्राला सादर करते.
३. थोडय़ाफार फरकाने केंद्राकडून हा अहवाल स्वीकारला जातो व त्याचीच पुनरावृत्ती राज्य सरकारेही करतात.

केंद्राच्या तिजोरीवर..
* दरवर्षी एक लाख दोन हजार कोटी रुपये ताण
* त्यातील ७३ हजार ६५० कोटी सर्वसाधारण अर्थसंकल्पावर
* तर २८ हजार ४५० कोटी रुपये रेल्वे अर्थसंकल्पावर
* वेतन आणि निवृत्तिवेतनाचा खर्च पाच लाख ३५ हजार कोटी रुपये वेतन

आयोगाने ग्रॅच्युईटीच्या मर्यादेत वाढ करण्याची शिफारस केली आहे. सध्या ही मर्यादा दहा लाख रुपये आहे. आयोगाने ती २० लाखांपर्यंत वाढवण्याची सूचना केली आहे. महागाई भत्त्यांत ५० टक्के वाढ होईल तेव्हा ग्रॅच्युईटीत २५ टक्क्य़ांनी वाढ करण्याची शिफारसही केली आहे. कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांसाठी आरोग्य विमा योजनेचीही शिफारस करण्यात आली आहे. गटविमा योजनेखाली सहभागाचे दर आणि विमाकवच वाढविण्यात आले आहे. दरमहा होणारी कपात दरमहा १२० रुपयांवरून पाच हजार रुपये इतकी करण्यात आली आहे.

संसदेचे पावसाळी अधिवेशन १८ जुलैपासून
# संसदेचे पावसाळी अधिवेशन १८ जुलैपासून सुरू होणार असून, ते १२ ऑगस्टपर्यंत चालणार आहे. संसदीय कामकाज मंत्री व्यंकय्या नायडू यांनी बुधवारी ही माहिती दिली. अधिवेशनाची तारीख आणि कालावधी निश्चित करण्यासाठी बुधवारी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या नेतृत्त्वाखाली संसदीय व्यवहार मंत्रिगटाची बैठक झाली. त्यामध्ये अधिवेशनाचा कालावधी निश्चित करण्यात आला.

नागा बंडखोर नेता आयझॅक स्वू याचे निधन
# गेल्या जवळपास तीन दशकांपासून ईशान्येत रक्तरंजित घुसखोरी करणारा नागा बंडखोर नेता आयझॅक चिशी स्वू (८७) हा मंगळवारी येथे मरण पावला. गेल्या अनेक दिवसांपासून तो विविध विकारांनी त्रस्त होता. एनएससीएन-आयएमचा अध्यक्ष असलेल्या आयझॅकवर गेल्या वर्षभरापासून एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मंगळवारी दुपारी तो मरण पावला, असे नागालॅण्ड सरकारचे प्रवक्ते कुओली मेरे यांनी सांगितले.

प्रेमनारायण ‘आयएमसी’चे नवीन अध्यक्ष
# इंडियन र्मचट्स चेंबरचे (आयएमसी) नवे अध्यक्ष म्हणून दीपक प्रेमनारायण यांची निवड करण्यात आली आहे.
चेंबरच्या मंगळवारी झालेल्या १०८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत प्रेमनारायण अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला. २०१६-१७ या आर्थिक वर्षांसाठी त्यांची निवड झाली आहे. मालमत्ता व्यवस्थापन, स्थावर मालमत्ता, आदरातिथ्य, वित्तीय सेवा आदी क्षेत्रांतील आयसीएस ग्रुपचे प्रेमनारायण हे संस्थापक आणि कार्यकारी संचालक आहेत. फर्स्टरँड बँक, ट्रिंगल रीअल इस्टेट इंडिया फंडवर ते संचालक म्हणून आहेत. चेंबरचे उपाध्यक्ष या नात्याने ते या आधी कार्यरत होते.

क्रीडा

नेमबाजपटू संजीव रजपूतला रौप्यपदक
# भारताच्या संजीव रजपूतने जागतिक चषक नेमबाजी स्पर्धेतील पुरुषांच्या ५० मीटर रायफल थ्री पोझिशनमध्ये रौप्यपदक पटकाविले. रजपूतने ४५६.९ गुणांची नोंद केली. क्रोएशियाच्या पीटर गोर्सा याने ४५७.५ गुणांसह सुवर्णपदक जिंकले. दक्षिण कोरियाच्या हिओनजुआन किम याला कांस्यपदक मिळाले. त्याला ४४५.५ गुण मिळाले. पात्रता फेरीत रजूपत हा सहाव्या स्थानावर होता. पात्रता फेरीत त्याने ११६७ गुण मिळविले होते. भारताच्या गगन नारंगला या फेरीत २३ वे स्थान मिळाले होते. त्याने ११६१ गुणांची नोंद केली. चैनसिंगने ११५९ गुणांसह ३२ वे स्थान घेतले. रिओ येथे ऑगस्टमध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेपूर्वीची ही अखेरची जागतिक स्पर्धा असल्यामुळे रजपूत याचे रुपेरी यश महत्त्वाचे मानले जात आहे.

TAGGED:
Share This Article